लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

दानीएलाच्या पुस्तकात, आपण बाबेल ते यरूशलेम या प्रवासा साठी देवाच्या लोकांच्या हालचालीची सुरूवात पाहतो. हे एक असे उदाहरण आहे ज्यात आपणास आज देवभीरू लोक देवाच्या ‘बाबेलमधून निघा' (प्रकटीकरण १८:४). या बोलावण्याला प्रतिसाद देऊन ख्रिस्ती जगताशी तडजोड करणाऱ्या लोकांपासून नवीन कराराच्या मंडळीकडे जाताना दिसतात.

प्राचीन बाबेलमध्ये त्या चळवळीची सुरुवात दानिएल - एका तडजोड न करणाऱ्या मनुष्यापासून झाली. त्याला देवाच्या हेतूंबद्दल काळजी होती आणि त्याने ते पूर्ण होण्यासाठी उपवास व प्रार्थना केल्या. कोणत्याही ठिकाणी देवासाठी शुद्ध मंडळीची उभारणी सहसा अशा एका मनुष्यापासून होते ज्याच्यावर प्रार्थनेचे ओझे असते, देवासमोर एक अशी प्रार्थना की, “प्रभु, तुझ्यासाठी मला या ठिकाणी शुद्ध मंडळी पाहिजे आणि मी त्यासाठी कोणतीही किंमत देण्यास तयार आहे.” ते पूर्ण होण्यापूर्वी हे ओझे आपल्याला बर्‍याच काळासाठी वाहावे लागते. एखादी आई तिच्या पोटात ज्याप्रमाणे बाळाला वाहते त्याप्रमाणे आपल्याला हे ओझे आपल्या अंत:करणात वाहावे लागते. अशाच प्रकारे दानिएलाने हा भार वाहिला.

दानिएलाच्या जीवनातील एक वैशिष्ट्यपूर्ण गुण म्हणजेः "आपणास विटाळ होऊ द्यायचा नाही असा दानिएलाने मनात निश्‍चय केला (दानीएल १:८). देवाच्या वचनातील अगदी लहान आज्ञादेखील पाळण्याबाबतीत तो अजिबात तडजोड न करणारा होता. येशू म्हणाला, “ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञांतील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील." (मत्तय ५:१९) नवीन कराराची मंडळी उभारण्यासाठी देव अशा लोकांचा उपयोग करील जे परमेश्वराच्या मोठ्या आज्ञांचे आज्ञापालन करायला लोकांना शिकवतील जसे की क्रोध व लैंगिक अपवित्रता यांचा त्याग करणे (मत्तय ५: २२, २८) तसेच प्रभुच्या अगदी लहान आज्ञांचे पालन करण्यास शिकवतील, जसे की जेव्हा स्त्रिया प्रार्थना करतात आणि सभांमध्ये संदेश देतात तेव्हा त्यांनी आपले डोके झाकावे (1 करिंथ .११: १- १६).

सुरुवातीला दानिएलाला एकटे उभे रहावे लागले, इतर सर्व यहुद्यांनी तडजोड केली. परंतु जेव्हा हनन्या, मीखाएल आणि अजऱ्या (शद्रख, मेशख आणि अबेद्नगो या त्यांच्या बाबेली नावांनी ते अधिक ओळखले जातात) यांनी जेव्हा दानीएलाने देवाची बाजू घेतलेली पाहिली, तेव्हा त्यांना धैर्य आले आणि ते त्याच्याबरोबर सामील झाले (दानीएल १:११).

मला विश्वास आहे की हनन्या, मीशाएल आणि अजऱ्या यांच्यासारखे बरेच लोक आज बर्‍याच ठिकाणी आहेत, ज्यांना आपल्या भागात परमेश्वरासाठी चांगली साक्ष होण्याची इच्छा आहे. पण स्वतःहून पुढाकार घेण्याची त्यांच्यात हिंमत नाही. त्यांचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना दानीएल आवश्यक आहे. जेव्हा दानीएल त्यांच्या गावातून किंवा शहरातून उभा राहील, तेव्हा ते बाहेर येतील आणि त्याला सामील होतील.

बाबेलमधील हजारो तडजोड करणारे यहूदी लोक जे राजाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करीत होते त्यांच्यापेक्षा चार तरुण लोक जे देवाला पूर्ण अंतःकरण देणारे होते ते देवासाठी अधिक सामर्थ्यवान साक्षीदार होते. तेथील दानीएल आणि त्याचे तीन मित्र जे देवासाठी उभे होते त्यांचा त्यांच्या काळातील सर्वांत शक्तिशाली राष्ट्र (बाबेल) आणि तेथील शासकांवर प्रभाव होता.

देवाला अर्धे अंतःकरण देणारे ख्रिस्ती - त्यांच्यापैकी हजारोसुद्धा - कोणत्याही शहरात किंवा देशात परमेश्वरासाठी प्रकाश असू शकत नाही. देवाला पूर्ण अंतःकरण देणाऱ्या विश्वासणाऱ्यांची गरज आहे - कारण "देव त्याचे कार्य हे मानवी सामर्थ्याने किंवा संख्येने नव्हे तर त्याच्या आत्म्याने करतो"(जखऱ्या ४: ६ पहा).

आज देव अशा लोकांचा शोध घेत आहे, ज्यांना त्यांच्या भागात नवीन कराराची मंडळी बांधण्याचे ओझे आहे - आणि जे काहीही किंमत द्यावी लागली तरी कधीही तडजोड करणार नाहीत.