लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   नेता पुरूष
WFTW Body: 

जेव्हा मोशेने निवासमंडप बांधला तेव्हा पर्वतावर मोशेला मिळालेल्या आराखड्याप्रमाणे त्याने अगदी तंतोतंत तसाच निवासमंडप बांधला की नाही हे बघण्याकरिता देवाने त्याची पारख केली. देवाचे गौरव निवासमंडपावर येणे हे देव मोशेच्या कार्याशी संतुष्ट आहे ह्याचे दृश्य प्रमाण होते. आपण जे करितो व प्रभूकारिता आपण जे बांधतो त्याविषयी ते कसे प्रमाणित होते? काय ते वचनात सांगितल्या प्रमाणे अगदी तसेच आहे? की आपण जगाच्या ज्ञानानुसार त्यात काही परिवर्तन आणले आहे? जर तसे असेल तर देवाचे गौरव आपल्या जीवनात दिसत नसण्याचे ते एक कारण नक्कीच आहे.

देवाने दुसर्या क्षेत्रात देखील मोशेची परीक्षा घेतली. इस्राएली लोकांच्या खर्चाबाबतीत मोशे स्वतःचे गौरव करू पाहत आहे की नाही हे बघण्याकरिता देवाने दोन दा त्याची पारख केली. दोन्ही वेळा मोशे उत्तीर्ण झाला. पहिला पहिला प्रसंग तो जेव्हा इस्राएली लोकांना सोन्याचे वासरू बनविण्याद्वारे देवाविरुद्ध बंड केला. तेव्हा देव मोशेला म्हणाला, ''तर आता मला आड येऊ नको; मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म करितो; आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करितो'' (निर्गम 32:10).

दुसरा प्रसंग तो जेव्हा इस्राएली लोकांनी कनानमध्ये प्रवेश करण्यास नकार दिला. तेव्हा देव मोशेला म्हणाला, ''मी त्यांचा मरीने संहार करून त्यांचा वारसा नष्ट करीन आणि तुझेच त्यांच्याहून मोठे व प्रबळ राष्ट्र करीन'' (गणना 14:12).

दोनशी प्रसंगी देवाने मोशेला की तो इस्राएलाचा नाश करील आणि मोशे व त्याच्या सतंतीपासून मोठे राष्ट्र निर्माण करील. देवाने अब्राहामाला व इस्राएलाच्या बारा गोत्रांना जी अभिवचने दिली होती तिचा हक्कदार हक्कदार होण्याची मोशेला संधी होती. लोक या चाचणीत अपयशी झाले होते परंतु मोशे नव्हे. दोन्ही प्रसंगी मोशेने देवाला विनंती केली की त्याने इस्राएल्यांना क्षमा करावी व त्यांचा नाश करू नये. एका प्रसंगी तर तो म्हणाला की इस्राएली लोकांना तारण्याकरिता त्याला सार्वकालिक नरकात जावे लागले तरी तो तयार आहे. ''मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, हाय! हाय! ह्या लोकांनी घोर पातक केले आहे; ह्यांनी आपल्यासाठी सोन्याचे देव बनविले. तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करिशील तर -; न करिशील तर तू लिहिलेल्या पुस्तकांतून मला काढून टाक'' (निर्गम 32:31-32). खरोखर मोशेमध्ये ख्रिस्ताचा आत्मा होता. आपले तारण व्हावे म्हणून तो वधस्तंभावर जाण्यास तयार झाला आणि त्याला कल्पना होती की पिता त्याचा त्याग करणार. मोशेच्या निस्वार्थीपणाबद्दल देव संतुष्ट झाला आणि देवाने त्यापुढे मोशेसोबत घनिष्टता जोपासली. ''मित्रांशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलले (निर्गम 33:11).

देवाने मोशेला आपले गौरव पाहण्याची अमुल्य संधी देशील दिलि. मोशेने ने पुढील प्रमाणे प्रार्थना केली , "कृपा करून मला तुझे तेज दाखीव'' परमेश्वर म्हणाला, ''माझ्यापाशी एक जागा आहे, येथे या खडकावर उभा राहा; असे होईल की, माझे तेज जवळनू चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन; मी निघून जाईपयर्तं आपल्या हाताने तुला झाकीन; मग मी आपला हात हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेन; पण माझे मुख दिसावयाचे नाही'' (निर्गम 33:18-23).

देवाच्या दासाचा सर्वात महत्वाचा गुण असा की तो स्वार्थ पाहत नाही. आपल्या सर्वांमध्ये स्वतःचे हीत पाहण्याचा व स्वतःला उंच करण्याचा वाईट गुण इतका मुळावलेला आहे की तो काढून फेकणे अवघड झाले आहे. देव आपल्याला त्यातून मुक्त करू इच्छितो. तो आपल्याभोवती अशी परिस्थिती निर्माण करितो की आपल्याला आपली चूक कळावी, आपण स्वतःची पारख करावी व स्वार्थीपणाच्या पापापासनू स्वतःला शुद्ध करावे. दवे त्याच्या वचनातनू आपल्यासाबे त बाले तो आणि त्याचा पवित्र आत्मा आपल्यासाबे त सदा बोलत असतो त्याकरिता आपल्याला कान हवते . पवित्र आत्मा आपल्याला सांगतो की आपण स्वार्थीपणा सोडावे. तरी देखील फार थोडके लोक पवित्र आत्म्याच्या वाणीकडे कान लोक आणि देवाच्या पसंतीस उतरतात. मोशे तसा होता. पौल व तीमथ्य देखील तसेच होते. देवाच्या पसंतीस उतरलेले पुष्कळ लोक नसून थोडे आहेत. जुन्या कराराच्या काळामध्ये मोशेच्या ठायी मध्यस्थीचा आत्मा होता. तसा आज आज लोकामध्ये दिसत नाही. कारण प्रत्येक जन स्वतःच्या हिताचाच प्रयत्न करितो. जेव्हा आपण आपण गुप्त रीतीने इतरांकरिता प्रार्थना करितो तेव्हा आपल्याला आदर मिळत नाही. म्हणून फार थोडकेच लोक गुप्तपणे इतरांकरिता प्रार्थना करितात. ह्याठिकाणी देव आपली पारख करितो. जे लोक स्वार्थी आहेत त्यांच्या बाजूने देव उभा राहत नाही