लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   पुरूष
WFTW Body: 

दया ही परूशी वृत्तीला आळा घालणारी महत्वपूर्ण औषधी आहे. ज्यांनी आपले वाईट केले त्यांची केवळ क्षमा करणेच दया नव्हे तर त्यापलीकडे ती आहे. दया म्हणजे जे गरजेत आहेत त्यांची मदत करणे. चांगल्या शोमरोन्याच्या दाखल्यात येशूने दयेचा अर्थ स्पष्ट करून सांगितला आहे (लूक 10:25-37, वचन 37 मध्ये दयेचा उपयोग बघा).

सार्वकालिक जीवन कसे प्राप्त करून घ्यावे असा प्रश्न धर्मशास्त्र पंडिताने येशूला विचारला. येशूने उत्तर दिले की आपण पूर्ण मनाने देवावर प्रीती करावी व स्वतःवर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती करावी. परंतु, धर्मशास्त्र पंडीत काही विशिष्ट वर्गाच्या लोकांवर प्रीती करीत नव्हता. आजचे बायबलपंडीत देखील असेच करितात (वचन 29). त्या धर्मशास्त्र पंडिताने 'शेजारी' शब्दाचा अर्थ विचारला. त्याला वाटत होते की परूशीच त्याचे शेजारी आहेत. येशूने एका उदाहरणाचा उपयोग करून त्याला उत्तर दिले.

या दाखल्यामध्ये प्रथम आपण बघतो की एक याजक आहे (देवाच्या घरातील पुढारी). रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या पुरुषाकडे या याजकाने दुर्लक्ष केले. त्याने त्या पुरुषाची गरज बघितली परंतु त्याकडे दुर्लक्ष केले. त्याला वाटले की देवाने त्या पुरुषाला त्याच्या गुप्त पापांबद्दल शिक्षा केली असावी. कदाचित त्याने असाही विचार केला असावा की त्या वाटेने मध्यरात्री एकटा प्रवास करण्याची चूक त्याने केली आहे. हा याजक त्या तीन सल्लागारांप्रमाणे वागला ज्या सल्लागारांनी ईयोबाला सल्ला दिला होता. अनेक वेळा आपण देखील गरजेत असलेल्या लोकांची मदत करण्याऐवजी त्यांचा न्याय करितो व त्यांच्या चुका शोधतो. मानवीय गरजांकडे आपण किती वाईट रीतीने दुर्लक्ष करितो! प्रभु आपल्याला म्हणतो, 'ट्टी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खाण्यास काही दिले नाही. मी तान्हेला होतो तेव्हा तुम्ही मला पिण्यास पाणी दिले नाही. माझ्या अंगावर वस्त्र नव्हते तेव्हा तुम्ही मला घालण्यास वस्त्र दिले नाही. मी आजारी होतो तेव्हा तुम्ही माझी दखल घेतली नाही. तुम्ही माझी स्तुतीगिते गाईली व आवेशाने संदेश नक्कीच दिले परंतु, मी अडचणीत व गरजेत असता तुम्ही माझी मदत केली नाही.

त्या याजकाला यरूशलेमेतील सभेमध्ये वेळेवर पोहंचण्याची घाई होती. गरजेत असलेल्याला मदत करण्याऐवजी त्याला वेळेवर सभेत हजर राहण्याची इच्छा होती. लक्षात ठेवा, अनेक लोक जे वेळेवर सभेत हजर राहतात त्यांच्यापैकी पुष्कळ नरकात राहतील. त्यानंतर लेवीय त्या वाटेने गेला (लेवी म्हणजे देवाच्या घरातील बंधू). देवाने त्याची देखील पारख केली. या चाचणीत तो खरा उतरला नाही. तो देखील सभेला वेळेवर हजर राहण्यास आवेशी होता. त्याने गरजवंताकडे दुर्लक्ष केले. या दोन्ही धार्मिक पुरुषांना सभेमध्ये देवाचे वचन ऐकण्याची आतुरता लागली होती आणि त्याकरिता ते घाईत होते. सभेला पोहंचत असताना वाटेतच देव त्यांच्याशी बोलला ह्याची थोडीसुद्धा जाणीव त्यांना झाली नाही. देवाच्या वाणीकडे त्यांच्ये कान नव्हते. देवाच्या वाणीकरिता त्यांचे कान बहिरे झाले होते. त्यांची स्तुतीगिते, प्रार्थना व धार्मिक गोष्टी व्यर्थ होत आहेत असे सांगणारी देवाची वाणी त्यांच्या कानी पडली नाही. कारण संकटात व गरजेत असलेल्या पुरुषाकडे त्यांनी दुर्लक्ष केले. धार्मिकांचे दुःख उपयोगात आणून देव अशा लोकांची पारख करितो जे दुरून ते दुःख पाहतात.

आपल्यापैकी कोणीही या याजकाच्या व लेवीच्या अंगावर धोंडा फिरकावू शकत नाही. अनेक वेळा आपण देखील असेच वागलो आहोत. जर आपण या लेवी व याजकासारखे वागलो आहोत तर आपण पश्चात्ताप करावा व आपल्यामध्ये परिवर्तन घडून येण्याची इच्छा बाळगावी. या याजकासारखे व लेव्यासारखे देवाने आपल्याला सुद्धा पृथ्वीवर ठेवले आहे जेणेकरून आपण देवाचे प्रतिनिधीत्व करावे. परंतु, आपण देवाचे प्रतिनिधीत्व करण्यात उणे पडलो हे कबूल करून पश्चात्ताप करावा.

शेवटी, तुच्छ समजल्या गेलेला शोमरोनी (याजक व लेव्यासारखे शुद्ध सिंद्धाताचे ज्ञान नसलेले इतर लोक) त्या वाटेने आला. देवाने त्याचा उपयोग करून घेतला. त्या शोमरोन्याने जखमी माणसाची मदत केली. तो मंडळीतील वडील किंवा प्रचारक नव्हता किंवा पुढारीही नव्हता.

तो त्या लोकांपैकी होता जे शांत राहून गरजवंतांची मदत करितात व मदत केलेली इतरांना कळू देत नाहीत. त्याने जखमी माणसाचा न्याय केला नाही किंवा त्याच्या चुका शोधल्या नाहीत. त्याला वाटले की त्या जखमी माणसावर संकट आले म्हणून तो जखमी झाला. त्याने जखमी माणसाप्रती दया दाखविली. गरजेत असलेल्या त्या जखमी माणसाची मदत करण्याकरिता शोमरोन्याने आपल्या वेळेचा व पैशाचा त्याग केला.

अशाप्रकारे आपल्या देहाद्वारे आपण नवीन व जिवंत मार्गाचे अवलंबन करू शकतो. ख्रिस्ताने आपल्या देहाद्वारे प्रीती प्रगट केली. त्याठिकाणी आपल्या देहाद्वारे दया प्रकट झालेली दिसते. आपल्या देहाद्वारे चांगुलपणा प्रकट होतो.