लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

प्रभूने आम्हाला दिलेली मोठी जबाबदारी ही की, "सुवार्ता गाजवणे" (मार्क १६:१५) आणि मग "त्यांना शिष्य बनवणे आणि त्याने जी काही आज्ञा दिली ते सर्व करायला शिकवणे" (मत्तय २८:१९, २०). एका उदाहरणाचा विचार करा: जर तुम्ही १०० लोकांना लाकडाचा ओंडका घेऊन जाताना पाहिले, त्यांपैकी ९९ जणांनी ओंडक्याची एक बाजू आणि दुस-या बाजूला एकानेच धरले असेल - तुम्ही कोणत्या बाजूला मदतीला जाल ? आज, पुष्कळ देशांत, ९९ टक्के ख्रिस्ती कामकरी सुवार्तेत गुंतलेले आहेत आणि १% लोक शिष्य बनवण्यात आणि त्यांना स्थानिक मंडळीमध्ये उभारण्यात गुंतलेले आहेत. म्हणूनच मी ओंडक्याच्या १% असलेल्या बाजूला मदत करायचं ठरवले. मी ओंडक्याच्या दुस-या बाजूला असलेल्यांच्या विरोधात नाही. त्यांचीही गरज आहे. पण तिथे आधीच भरपूर लोक आहेत.

पौल आणि अपुल्लोस यांनी एकत्र काम केले आणि त्यांचे धर्मांतर प्रभूसाठी होते आणि त्यांच्या मंडळ्याही प्रभूसाठी होत्या. पौलाने रोप लावले आणि अपुल्लोसाने पाणी दिले, पण देवानेच वाढ घडवून आणली . त्यामुळे सर्व गौरव देवालाच मिळाले पाहिजे. पौल स्वतःबद्दल आणि अपुल्लोसाबद्दल म्हणतो, "आम्ही कोणीही नाही. आम्ही काहीही नाही" (१ करिंथ ३:७). म्हणूनच ते एकत्र सामंजस्याने काम करू शकत होते. दोन कोणीही जे स्वत:ला विशेष न समजणारे सहजपणे एकत्र काम करू शकतात. जेव्हा त्यांच्यापैकी एकाला आपण कोणीतरी आहोत असे वाटते तेव्हा समस्या उद्भवतात.

जर तुम्ही कुठेही स्थानिक मंडळी बांधली तर मी तुम्हांला ४० वर्षे भारतातील आणि इतर ठिकाणी प्रभूने उभारलेल्या मंडळ्या पाहून एक सल्ला देऊ इच्छितो: आधी कोणीही नसलेले बना आणि तुमचे सर्व धर्मांतरित 'कोणीही विशेष नसलेले' करा. मग तुम्ही एक अद्भुत मंडळी बांधाल- जिथे सहकार्य आहे आणि कोणतीही स्पर्धा नाही. पुढाऱ्यापासून सर्वांत नवीन धर्मांतर झालेल्यापर्यंत प्रत्येकजण जर शून्य असेल तर, ती जगातील सर्वोत्तम मंडळी असेल. पण जेव्हा तुम्ही येशूला त्या सर्वांसमोर ठेवता तेव्हा तो "१" असल्यामुळे शून्य असलेल्या नऊ जणांचीही एक अब्ज किंमतीची मंडळी बनेल - १,००,००,००,०००!! त्यामुळे तुम्ही कधीही कोणी खास होणार नाही हे ठरवा, परंतु नेहमीच कोणी विशेष नसलेले असे बना जसे पौल आणि अप्पुलोस हे कोणी विशेष नव्हते.

मग पौल पुढे पाया घालून त्यावर बांधकाम करण्याविषयी म्हणतो. पाया आणि बांधकाम या दोन्ही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पौलाने सर्वप्रथम झाड वाढवण्याच्या उदाहरणाचा उपयोग केला - रोप लावणे आणि पाणी घालणे. आता तो एका इमारतीची प्रतिमा वापरतो - पाया आणि बांधकाम (१ करिंथ ३:१०-१२). मंडळीचा पाया ख्रिस्त हा एकच आहे- त्याचे क्रुसावरचे परिपूर्ण प्रायश्चित्ताचे कार्य आहे, त्यात आमच्या कोणत्याही कृतीची भर नाही. पण मग या पायावर सार्वकालिक वास्तू कशी उभारायची हे आपल्याला माहीत असले पाहिजे. तुम्ही कोणत्या प्रकारची मंडळी बांधत आहात ? ती आकारात प्रभावी आहे का गुणवत्तेत ? प्रत्येक ख्रिस्ती कार्यकर्त्याने या एका प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे: मी संख्या पाहू की गुणवत्ता ? आपण सोने, चांदी आणि मौल्यवान पाषाण किंवा लाकूड, गवत आणि पेंढा (१ करिंथ ३:१२) यांपैकी कशानेही बांधू शकतो. शेवटच्या दिवशी गुणवत्ता ग्राह्य धरली जाईल संख्या नव्हे (१ करिंथ ३:१३, १४).

तेवढ्याच पैशाने तुम्ही सोने, चांदी आणि मौल्यवान पाषाणांपेक्षा भरपूर लाकूड, गवत आणि पेंढा विकत घेऊ शकता. त्यामुळे आता लोकांना प्रभावित करणारी एखादी भव्य इमारत उभारण्यात तुम्हांला रस असेल तर तुम्ही लाकूड, गवत आणि पेंढा निवडाल. पण काम पूर्ण होताच तुमच्या इमारतीची चाचणी अग्नीने केली जाईल हे जर तुम्हाला माहीत असेल, तर तुम्ही सोने, चांदी आणि मौल्यवान पाषाणांसारखे जे आग सहन करू शकतील असे काहीतरी बांधून ठेवाल - जरी तुमची इमारत पूर्वीच्या इमारतीच्या तुलनेत आकाराने फक्त १% असेल. आपल्या सर्वांकडे मर्यादित वेळ आहे. आपल्याकडे जगायला हजारो वर्षं नाहीत. नवा जन्म झाल्यानंतर आपल्याला परमेश्वरासाठी जगायला ६० वर्षे असू शकतात. ती ६० वर्षे तुम्ही कशी घालवाल? तुम्ही काहीतरी मोठे बांधकाम करण्यात घालवाल का, जे निकृष्ट दर्जाचे असेल, ते शेवटच्या दिवशी जाळले जाईल ?की सर्वांत तप्त आगीची चाचणी सहन करू शकेल अशी एखादी गोष्ट तुम्ही बांधाल का - जरी ती लहान असली तरी ?

पुष्कळ विश्वासू लोक मोठा आकार असलेला पण दर्जाहीन अशा मंडळ्या बांधतात. पण काही जण सुज्ञपणे बांधतात- चांगल्या दर्जाची लहान मंडळी - पश्चात्ताप आणि शिष्यत्वाचा प्रचार करणारी. लहान मंडळीची आकडेवारी मोठ्या मंडळीइतकी प्रभावी नाही. पण एके दिवशी प्रभू जेव्हा अग्नीत प्रत्येक गोष्टीची चाचणी करेल तेव्हा लाकूड, गवत आणि पेंढा यांच्या विशाल वास्तू पूर्णपणे जाळल्या जातील आणि काहीही शिल्लक राहणार नाही. पण ज्यांनी आपले आयुष्य शिष्य बनवण्यात घालवले व त्यांचे कार्य फारसे मोठे नसल्यामुळे इतर ख्रिस्ती लोकांकडून ज्यांचा तिरस्कार झाला त्यांना असे दिसून येईल की त्यांच्या लहान वास्तू व रचना अग्नीतून वाचेल आणि अनंत काळ टिकून राहते.

मग तुम्ही तुमचे आयुष्य कसे घालवणार आहात? येशूने म्हटले: "तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य बनवा." तुम्ही सदासर्वकाळ टिकेल असे काहीतरी उत्पन्न करत आहात का? हाच प्रश्न नेहमी आपल्या मनात असला पाहिजे. येशूने शिकवलेल्या तत्त्वांनुसार मी ज्या पद्धतीने बांधकाम करावे अशी देवाची इच्छा आहे त्याप्रमाणे मी बांधत आहे का? मी येशूवर इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करणारे शिष्य बनवत आहे की मी फक्त धर्मांतरित गोळा करत आहे , जे फक्त म्हणतात "प्रभू येशू, माझा तुझ्यावर विश्वास आहे" पण शिष्य बनण्यात त्यांना स्वारस्य नाही ? तुम्हांला होणार्‍या पस्ताव्याचा विचार करा जेव्हा तुम्ही परमेश्वरासमोर उभे राहाल, आणि जर त्या दिवशी तुमचे संपूर्ण जीवनकार्य जाळले जाईल. तुम्हांला वाचवले जाईल आणि तुम्ही स्वर्गात जाल, पण देवाने तुम्हाला दिलेले पृथ्वीवरील जीवन तुम्ही वाया घालवल्याबद्दल तुम्ही अनंत काळ स्वर्गात पस्तावा करत राहाल. मला तो पस्तावा नको आहे. मला सोने, चांदी आणि मौल्यवान पाषाण यांनी बांधायचे आहे. मला प्रभूसाठी आता दर्जेदार काम करायचे आहे.