WFTW Body: 

पौल २ करिंथ २:१४ मध्ये म्हणतो, "देवाला धन्यवाद असो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हास विजयाने नेतो." लिव्हिंग बायबल दुसऱ्या शब्दांत असे सांगते, की "देवाला धन्यवाद असो! कारण ख्रिस्ताने जे काही केले आहे त्याद्वारे त्याने आपल्यावर विजय मिळविला आहे. " म्हणून देवाने आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्यावर विजय मिळविला पाहिजे, जेणेकरून आपण विजयात जगू.

एके दिवशी प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जाईल, आणि प्रत्येकजण कबूल करील की येशू हा प्रभू आहे (फिलिप्पै २:१०‭-‬११). पण सध्या तरी, तुमच्या शरीरातील प्रत्येक इच्छेचा गुडघा टेकला पाहिजे व तुम्ही कबूल केले पाहिजे की येशू हा प्रभू आहे. ज्या वासना तुमच्यावर राज्य करतात त्यांनी झुकले पाहिजे आणि त्यांनी कबूल केले पाहिजे की येशू तुमच्या शरीराचा प्रभू आहे.‬‬

"परमेश्वराची तलवार म्यानातून निघून सर्व जीवाविरूद्ध मस्तक (उत्तर) ते पाय (दक्षिण) भागात बाहेर पडेल मग सर्व जीवांना कळेल की परमेश्वराने ही तलवार त्यांच्याविरुद्ध बाहेर काढली आहे."(यहेज्केल २१:४‭-‬५).‬‬

देव ज्या ध्येयाच्या दिशेने कार्य करत आहे ते असे आहे की, "येशू ख्रिस्ताला प्रत्येक गोष्टीत पहिले स्थान असावे" (कलस्सै १:१८). जर तुम्ही हेच ध्येय ठेवाल, तर मग तुम्ही प्रत्येक वेळी देवाची मदत मिळवण्यासाठी देवावर विसंबून राहू शकता - तुमच्या जीवनात आणि तुमच्या साक्षकार्यात ही.

तुम्ही ज्याप्रकारे तुमचा वेळ आणि तुमचा पैसा खर्च करता यामध्ये, वाचलेल्या पुस्तकांमध्ये, ऐकता त्या संगीतामध्ये, दूरदर्शनवरील कार्यक्रमामध्ये, तुम्ही ज्या मित्रांसोबत वेळ घालवता त्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, व प्रत्येक गोष्टीत प्रथम ख्रिस्ताला स्थान दिले पाहिजे. येशूला सर्व गोष्टींचा प्रभू बनवण्याचा हाच अर्थ होतो. तरच तुम्ही असे म्हणू शकता की प्रत्येक क्षेत्रात देवाने तुमच्यावर विजय मिळवला आहे. हे असे नाही जे एका रात्रीत घडू शकते. पण ह्याला तुमचे दीर्घकालीन ध्येय बनवा आणि त्या दिशेने काम करत राहा. मग तुम्ही दिवसेंदिवस आणि वर्षानुवर्षे त्या ध्येयाच्या जवळ आणि जवळ येत राहाल.

येशू हा देवाचा कोकरा होता ज्याने जगाची पापे आपणावर घेतली. आता इतर जे आपल्याविरुद्ध पाप करतात ती आपणावर घेऊन, आपल्याला "वधावयाची मेंढरे" असे संबोधले जाते (रोम ८:३६). मोरिया डोंगराप्रमाणे होमार्पणाची लाकडे आणि अग्नी हे (आपल्या जीवनातील परिस्थिती) सर्व काही तयार आहे. पण प्रश्न (इसहाकाने आपल्या वडिलांना विचारल्याप्रमाणे) असा आहे की, "कोकरू कोठे आहे?" (उत्पत्ती २२:७). याचे उत्तर आहे, "तुम्हांला कोकरू बनायचे आहे ".