लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   मूलभूत सत्य
WFTW Body: 

येशू 30 वर्षांचा झाला तेव्हा देवाने प्रमाण दिले की देवाची मर्जी त्याच्यावर आहे कारण मागील सर्व वर्षांमध्ये येशूने विश्वासूपणे मोहावर विजय मिळविला व परीक्षते यशस्वी झाला. येशूचे जीवन स्वकेंद्रित नसनू पित्याच्या मर्जीप्रम्राणे होते. तो स्वतःला संतोषवू इच्छित नव्हता (रोम 15:3). येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी पित्याने येशूविषयी पुढीलप्रमाणे म्हटले, ''हा माझा 'पुत्र' मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयीं मी संतुष्ट आहें'' दवे असा म्हटला नाही, ''हा माझा 'पत्रु ' मला परमपिय्र आहे ह्याला मी आशीर्वादित केले'' अशी साक्ष अर्थहीन झाली असती. येशूकरिता देवाची साक्ष फार मोलाची होती की देव त्याच्याविषयी संतुष्ट आहे. येशूला अनुसरणे म्हणजे आपल्याकडून त्याच साक्षीची अपेक्षा करणे आदामाची संतती या नात्याने आपण स्वाकेंद्रित असे जन्मलो. आपण मोठे असता अपेक्षा बाळगतो की सर्वकाही आपल्याभावे ती फिरावे व सर्वांनी आपली सेवा करावी. जेव्हा आपण परिवर्तित होतो तेव्हा अपेक्षा करितो की देवाने आपली सेवा करावी व अनेक प्रकारे आपल्याला आशीर्वादित करावे सुरुवातीला आपण त्याची क्षमा मागतो त्याच्या क्षमेचा आशीवार्द आपल्याला हवा असतो त्यानतंर आपण आरोग्याचा आशीर्वाद त्याला मागतो. पुढे आपण धनसंपत्तीसाठी, घरासाठी, नोकरीसाठी व जगातील अनेक गोष्टींसाठी प्रार्थना करू लागतो. आपल्या दृष्टीत व लोकांच्या दृष्टीत आपण धार्मिक असलो तरी आपल्या ठायी स्वकेंद्रित स्वभाव असू शकतो. आपल्या भोवती फिरणार्या वर्तुळात देव सुद्धा असतो व आपण अपेक्षा करितो की त्याच्याकडून पुष्कळ गोष्टी प्राप्त कराव्या. उधळ्या पुत्र अन्न मिळावे म्हणून बापाकडे परत आला. परंतु पित्याने त्याचा स्वीकार केला. आपले उद्देश स्वार्थी असले तरी देव आपला स्वीकार करितो, कारण तो आपल्यावर विपुल प्रीती करितो. त्याला आशा असते की आपण परिपक्व होऊ व आपल्याला कळेल की खरी आत्मिकता त्याच्या स्वभावाचे वांटेकरी होण्यात आहे. त्याचा स्वभाव घेण्याचा नसून देण्याचा आहे. देवाचे अनेक लोक स्वकेंद्रित जीवन जगत असतात. ते स्वतःचा आणि स्वतःचाच विचार करितात. त्यानं भौतिक आणि शारीरिक आशीवार्द च हवे असतात. परिपक्व व्यक्तीचे मन नवीन झालेले असते. परिपक्व व्यक्ती स्वकेंद्रित नसतो व देवाकडून काही मिळेल अशी अपेक्षा करीत नसतो तर त्याच्या जीवनात त्याला देवाकरिता काय करता येईल ह्याचा विचार करीत असतो. मनाच्या या नवीनीकरणालाच परिवर्तन म्हणावे (रोम 12:2). 1,44,000 लोक यामुळेच सियोन पर्वतावर कोकारासोबत उभे राहण्यास पात्र झाले (प्रकटीकरण 14). रागावर, मोहावर, विचारावंर व पैशाच्या लोभावर केवळ विजय मिळविणे म्हणजचे खरी आत्मिकता नसनू स्वत्याग करणे खरी आत्मिकता आहे खरी आत्मिकता म्हणजे स्वाथर्र हीत असणे कवे ळ स्वतःचचे हीत न पाहणे, केवळ स्वतःचीच इच्छा पूर्ण न करणे, केवळ स्वतःच्याच हक्कासाठी न लढणे व केवळ स्वतःच्याच आत्मिकतेचा विचार न करणे तर इतरांच्या देखील आत्मिकतेचा विचार करणे. येशूच्या शिष्यांनी येशूला विनंती केली की त्याने त्यांना प्रार्थना करण्यास शिकवावे. येशूने त्यांना जी प्रार्थना शिकविली त्यात ''मी'', ''माझा'' असे शब्द नव्हते (लकू 11:1-4). त्याच्या प्रार्थनेमध्ये पित्याच्या नावाला, राज्याला व पित्याच्या इच्छेला महत्व दिले आहे. त्यानंतर आपल्या सोबतच्या विश्वासणार्यांना महत्व दिले आहे. या प्रार्थनेमध्ये आम्ही, आमचे, आमच्या, आम्हांस असे शब्द उपयोगात आणले आहेत. ही प्रभुची प्रार्थना मुखोगत करणे व पोपटासारखी बोलून दाखविणे सोपे आहे. परंतु हि प्रार्थना मनापासनू करण्याकरिता खर्या स्वत्यागाची गरज असते ही प्रार्थना खर्यारीतीने करण्याकरिता आपल्या हृदयाच्या केंद्रस्थानी देव हवा असतो. रोम 7:22 मध्ये पुढीलप्रमाणे लिहिले आहे. ''माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करितो तरी माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनांतल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करितो”.

देवाने शिकविले की सर्वप्रथम आपण देवाचे राज्य मिळविण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच आपण स्वतःला राजासनावरून खाली आणावे आपण् आपल्या हृदयाच्या राजासनावर देवाला बसू द्यावे व आपल्या जीवनात त्याच्या इच्छेंना प्राधान्य असावे. पृथ्वीवर पित्याची इच्छा पूर्ण करण्याकरिता येशूने स्वर्गातील सुख सोडले. प्रेषित होऊन सेवा करण्याकरिता व प्रभुकरिता दुःख सहन करण्याकरिता पौलाने तार्ससमधील आपला व्यवसाय व सुख सोडले. सर्व प्रेरीतांशी देव केंदित्र त्यागमय जीवन स्वीकारले. पृथ्वीवर देवाचे राज्य स्थापीत व्हावे म्हणून त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला. गावोगावी जाऊन प्रचार करणारे प्रसिद्ध ख्रिस्ती वक्ते तसे मुळीच करीत नाहीत. अशी पवित्रता जी आपल्याला स्वार्थी करून ठेविते व आपल्या ठायी स्वतःचेच हीत पाहण्याची वृत्ती कायम ठेविते ती खोटी पवित्रता आहे. आपण रागावर व वाईट विचारांवर विजय मिळविला परंतु, स्वार्थीच राहिलो तरी काही उपयोग नाही. ही गोष्ट अनेकांना कळली नाही म्हणून सैतान त्यांना फसवू शकतो. अनेक ख्रिस्ती लोक परदेशात पैसे मिळविण्याकरिता जातात व सुखी होण्याकरिता जातात. देवाचा आशीर्वाद त्यांच्यावर असतो. परंतु, देव त्यांच्याविषयी संतुष्ट नसतो. कारण एकाच वेळी देवाची सेवा करणे व जगाची सेवा करणे शक्य नाहीजर आपल्याला वाटत असेल की देवाने आपल्यावर व आपल्या लेकरांवर भौतिक आशीर्वादांचा वर्षाव केला आहे म्हणून आपण देवाच्या पसंतीस उतरले आहाते तर हा तुमचा गैरसमज आहे आणि सतै ानाने तुम्हाला फसविले आहे. देवाचे आशीर्वाद व देवाची मर्जी ह्या दोन्ही पूर्णपणे वेगवगळ्या गोष्टी आहते. जगातील आपल्या जीवनाच्या शेवटी आपल्याविषयी पुढीलप्रमाणे हनोखासारखी साक्ष दिली जावी, ''तो देवाला संतोशवीत असे' (इब्री 11:5). केवळ चार शब्द... परंतु या साक्षीपेक्षा अधिक प्रभावी साक्ष त्याच्या काळात नव्हती. अशी साक्ष येशू व पौलाविषयी देण्यात आली. “देवाने त्याला आशीर्वादित केले” अशी साक्ष महत्वाची नाही. अविश्वासणार्या लाखों लोकांविषयी अशी साक्ष देण्यात येते व देता येईल. परंतु देवाला असे लोक हवे आहेत जे आशीर्वादांची अपेक्षा करीत नसून अशी अपेक्षा करितात की देवाला त्यांचाविषयी संतोष वाटावा.