WFTW Body: 

विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे, मग तुमच्याकडे दुसरे काहीही असले तरी (इब्री ११:६). हव्वेचे बागेतील अपयश हे विश्वासाचे अपयश होते. जेव्हा तिला त्या झाडाच्या आकर्षकपणाचा मोह झाला होता, तेव्हा जर तिने केवळ देवाच्या परिपूर्ण प्रीतीवर आणि शहाणपणावर भरवसा ठेवला असता तर, एक प्रेमळ देव तिला ते खाण्यास का मनाई करेल हे जरी तिला समजू शकले नसते, तरी तिने पाप केले नसते. पण सैतानाने एकदा तिला देवाच्या प्रीतीबद्दल शंका घेण्यास भाग पाडले तेव्हा ती खूप लवकर पापात पडली.

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या देवाने आपल्यासाठीही निषिद्ध केल्या आहेत, आणि आमच्याअनेक प्रार्थना ज्या त्याला पूर्ण करण्यायोग्य वाटत नाही. अशा वेळी आपण त्याच्या परिपूर्ण प्रीतीवर आणि शहाणपणावर भरवसा ठेवला पाहिजे. येशूने वधस्तंभावर असतानाही जेव्हा पित्याने त्याचा त्याग केला तेव्हाही त्याने पित्यावर भरवसा ठेवला होता. तो म्हणाला नाही, "हे देवा, तू माझा त्याग का केलास? त्याने म्हटले , 'माझ्या देवा ..... "याचा अर्थ असा आहे की, "तू मला का सोडून दिलेस हे जरी मला समजत नसेल, तरी तू अजूनही माझा देव आहेस. येशूने विचारलेल्या प्रश्नाला स्वर्गातून काहीच उत्तर आले नाही. पण विश्वासातच तो मरण पावला. तो म्हणाला, “हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो!”(लूक २३:४६) शेवटपर्यंत विश्वासात टिकून राहणे याचा हाच अर्थ आहे.

येशूने पेत्राला सांगितले की, सैतानाने त्याला चाळण्याची परवानगी मागितली होती. सैतानाने ईयोबाला (जुन्या करारात) चाळण्याची परवानगी देवाकडे मागितली होती, तशीच ही गोष्ट होती. देवाच्या परवानगीशिवाय सैतान आपल्याला काहीही (आपल्याला मोहातही पाडू शकत नाही)करू शकत नाही. पण पेत्राला चाळले जाणार होते तेव्हा येशूने त्याला आश्वासन दिले की त्याचा विश्वास ढळू नये म्हणून तो त्याच्यासाठी प्रार्थना करील (लूक २२:३१,३२). इतकेच महत्त्वाचे आहे. आपण मोहात पडू नये किंवा आपले आरोग्य, संपत्ती किंवा नोकरी अपयशी ठरू नये म्हणून येशू प्रार्थना करत नाही, तर केवळ आपला विश्वास उणा पडू नये एवढीच प्रार्थना करतो.

यास्तव, येशूच्या नजरेत विश्वास हा आपला सर्वात महत्त्वाचा खजिना आहे. जर आपल्याजवळ विश्वास असेल, तर आपण कधीही निराश होणार नाही, पेत्राप्रमाणे आपणही दयनीयरित्या अपयशी ठरलो तरीसुद्धा. आपण उडी मारू (फक्त उठून उभे राहणार नाही तर उडी मारून उठू ) आणि कोकऱ्याच्या रक्ताविषयीच्या आपल्या साक्षीच्या शब्दाने सैतानावर मात करू, जे, आपण जेव्हा आपल्या पापातून वळून देवाकडे कबूली देतो तेव्हा आपल्याला पूर्णपणे शुद्ध करते (प्रकटीकरण १२:११). आपण सैतानाला सांगितले पाहिजे की, येशूच्या रक्ताने आपण शुद्ध झालो आहोत आणि देव आपले भूतकाळातील कोणतेही पाप यापुढे आठवत नाही (इब्री ८:१२). आपण सैतानाला हे आपल्या मुखाने सांगितले पाहिजे, कारण तो आपले विचार ऐकू शकत नाही. अशा प्रकारे आपण त्याच्यावर मात करू आणि तो आपल्यापासून पळून जाईल.

"अगे माझ्या वैरिणी, माझ्यामुळे आनंद करू नकोस; मी पडले, तरी पुन्हा उठेन; मी अंधारात बसले, तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल. परमेश्वर माझा तंटा लढून माझा हक्क संपादन करील, तोपर्यंत मी त्याचा राग सहन करीन; कारण मी त्याच्याविरुद्ध पाप केले आहे; मला तो प्रकाशात नेईल, मी त्याचे न्यायीपण पाहीन. जी मला म्हणाली होती की, “तुझा देव परमेश्वर कोठे आहे?” ती माझी वैरीण ते पाहील व ती लज्जेने व्याप्त होईल; माझे डोळे तिला पाहतील, तिला रस्त्यांतल्या चिखलासारखे तुडवतील." (मीखा ७:८-१०).

आपण नेहमी धैर्याने असे म्हटले पाहिजे की,“प्रभू मला साहाय्य करणारा आहे, मी (कोणत्याही मनुष्याला, दुरात्म्याला, परिस्थितीला किंवा इतर कशाला )भिणार नाही; कारण त्याने स्वतः म्हटले आहे, “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही." (इब्री १३:६,५). ही आपल्या विश्वासाची धाडसी कबुली आहे.