WFTW Body: 

नवीन कराराचे शुभवर्तमान मूलत: असे आहे: की आपण दैवी स्वभावाचे सहभागी होऊ शकतो. देवाचा स्वभाव प्रीती आहे - आणि प्रीतिचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ती स्वतःचा लाभ शोधत नाही. येशूने स्वतःच्या लाभाचा शोध न घेतल्यामुळेच तो आपल्याला वाचवण्यासाठी स्वर्गातून पृथ्वीवर आला. देवाने आपल्यावरील त्याच्या प्रीतिची तुलना तान्हया बाळावरील आईच्या प्रीतिशी केली आहे (यशया ४९:१५). आईची आपल्या नवजात बाळावरची प्रीती हे प्रीतिचे सर्वात मोठे उदाहरण आहे जे पृथ्वीवर पाहायला मिळते - कारण एक चांगली आई आपल्या लेकरासाठी निःस्वार्थपणे प्रत्येक गोष्ट करते , त्या बदल्यात कशाचीही अपेक्षा करत नाही. देवाचीही प्रीती अशीच आहे - आणि याच स्वभावाचे आपण भागीदार असले पाहिजे. मग आपण स्वतः येशूप्रमाणेच देवाच्या लोकांची सेवा करू शकू.

प्रीती हे ख्रिस्ती जीवनाला धावण्यासाठी लागणारे इंधन आहे. इंधनाची टाकी रिकामी असताना गाडी ढकलावी लागते. तसेच, जेव्हा परमेश्वराबद्दलची उत्कट प्रीती संपते, तेव्हा त्याच्यासाठी आपले श्रम गाडी ढकलण्यासारखे जड आणि ओझे असे बनते. मग आपल्या आजूबाजूच्या इतरांच्या उणिवा आणि चुका सहन करणेही कठीण होऊन बसेल. त्यामुळे आपल्याला इंधन मिळण्याच्या ठिकाणी भरण्यासाठी पुन्हा पुन्हा जात राहणे आवश्यक आहे. "आत्म्याने परिपूर्ण व्हा"(इफिस ५:१८).

रागावर आणि डोळ्यांची वासना यांवर विजय मिळवणे हे आपल्यासाठी मात्र केवळ अंतिम ध्येय गाठण्याची तयारी आहे ज्यामुळे आपण स्वतः दैवी स्वभावाचे सहभागी होऊ. आपले शरीर पूर्णपणे स्वार्थी आहे आणि या स्वार्थी स्वभावाला रोजच मारावे लागते. आपण आपला स्वत:चा फायदा, सन्मान किंवा आपली सोय किंवा स्वत:ची अशी कोणतीही गोष्ट शोधू नये - कारण तो सार्वकालिक मृत्यूचा मार्ग आहे. जीवनाचा मार्ग म्हणजे आपल्या जीवनासाठी केवळ देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करण्याचा मार्ग आहे, ज्याची आपल्याला काहीही किंमत मोजावी लागली तरी. आपण दररोज आणि दररोज अनेक वेळा स्वतःचा न्याय केला पाहिजे - अंतर्मुख होऊन नव्हे, तर येशूकडे वर पाहून - आणि अशा प्रकारे आपण अशा क्षेत्रांचा शोध लावला पाहिजे जिथे आपण देवाचे वैभव नव्हे तर स्वतःचा लाभ शोधत आहोत. मग आपण त्या स्वतःच्या लाभाच्या शोधापासून स्वत:ला शुद्ध करू शकतो. हा परिपूर्णतेकडे नेणारा मार्ग आहे. फार कमी लोकांना देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून स्वतःला इतक्या विश्वासूपणे शुद्ध करण्यात रस असतो (२ करिंथ ७:१) आणि म्हणूनच फार कमी लोकांची खऱ्या अर्थाने भक्तिमान जीवनापर्यंत वाढ होते.

येशूने म्हटले होते की केवळ " हल्ला करणाऱ्या माणसांना" देवाचे राज्य प्राप्त होईल (मत्तय ११:१२). याचा अर्थ असा होतो, की देवाच्या आज्ञांचे पालन करण्याच्या आड येणाऱ्या आपल्या स्वतःतील प्रत्येक गोष्टीवर आपण हल्ला केली पाहिजे. मोठमोठ्या आज्ञांचे पालन करूनच आपण आपली आज्ञाधारकता सिद्ध करतो असे नाही. नाहीच. येशूने म्हटले आहे की जो लहानातल्या लहान आज्ञांचे पालन करतो व इतरांना करण्यास शिकवतो त्याला देवाच्या राज्यात महान म्हटले जाईल (मत्तय ५:१९). लहान मुलाच्या आज्ञाधारकतेची परीक्षा त्याने कोणाचीही हत्या न करणे किंवा शाळेत व्यभिचार न करणे यांमुळे केली जात नाही. नाहीच. तर त्याने त्याच्या आईच्या आज्ञेचे पालन करण्याने केली जाते जेव्हा ती त्याला मदत करण्यासाठी बोलावते, आणि त्याला स्वत: ला खेळायचे असते. देवासोबतच्या आपल्या नात्यातही असेच आहे. दैनंदिन जीवनातील लहानसहान गोष्टींमध्येच आपण विश्वासू राहायचे असते. अन्यथा आपण अवज्ञाकारी आहोत.

मत्तय १३:४३ मध्ये येशूने म्हटले, की "नीतिमान सूर्याप्रमाणे प्रकाशतील". सूर्य सतत लाखो अंशाला अग्नीने तप्त होत असतो. त्यामुळे त्यावर कोणतेही जंतू किंवा जीवाणू जिवंत राहू शकत नाहीत. अशा प्रकारे परमेश्वराची अशी इच्छा आहे की आपणही असेच असावे - त्याच्यासाठी नेहमी पेटलेले राहावे, पवित्रतेसाठी, इतरांची सेवा करण्यासाठी आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, स्वतःला नम्र करण्यासाठी, सभांमध्ये साक्ष द्यावी यासाठी नेहमी आवेशी आणि उत्कट असावे आणि मंडळी बांधण्यासाठी नेहमी पेटलेले राहावे. या बाबतीत तुम्ही आघाडीवर असायला हवे . पुढील तीन वचनांत (मत्तय १३:४४ ते ४६) येशूने दोन दृष्टान्तांद्वारे (एक शेतातील ठेवीविषयी व दुसरा मोलवान मोत्याविषयी) आपण नेहमी कशा प्रकारे पेटलेले राहू शकतो हे स्पष्ट केले आहे. या दोन्हींमध्ये आपल्याला हे एकच वाक्य वारंवार उच्चारलेले दिसते - " त्याने आपले सर्वस्व विकले ". हेच रहस्य आहे. आपल्याला आपली स्व-इच्छाशक्ती, आपले हक्क, आपला सन्मान, आपले विशेषाधिकार, सर्व काही सोडून द्यावे लागेल. तरच आपण सूर्यासारखे होऊ शकू - नेहमी पेटलेले.