WFTW Body: 

ही एक माझ्या म्हणींमधील एक म्हण आहे: "शहाणा माणूस इतरांच्या चुकांमधून शिकतो. एक सामान्य माणूस स्वतःच्या चुकांमधून शिकतो. परंतु मूर्ख स्वतःच्या चुकांमधूनही शिकत नाही.

एक वडील म्हणून मला इतर मुलांच्या वडिलांमध्ये असलेल्या चुकांचे निरीक्षण करून मला शिकायचे असायचे. आणि मी स्वतःला विचारले की मी माझ्या मुलांसाठी कोणत्या प्रकारचे उदाहरण ठेवले आहे, ज्याचे ते अनुसरण करू शकतात. मला आशा आहे की, ते हे आहे: प्रथम देवाचे राज्य शोधणे आणि आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत सर्व लोकांवर शहाणपणाने प्रेमात टिकून राहणे.

शहाणपण म्हणजे त्रासदायक लोकांपासून चांगले अंतर ठेवणे - आणि शहाणपणाने तुमच्या प्रेमावर नियंत्रण ठेवले पाहिजे. तुमचे हृदय (पेट्रोल ची टाकी) प्रेमाने भरलेली असली पाहिजे, परंतु शहाणपण ड्रायव्हरच्या सीटवर असले पाहिजे. अन्यथा मानवी प्रेम अनेक मूर्ख गोष्टी करू शकते. तुमचे प्रेम "ज्ञानाने (शहाणपणाने) भरली पाहिजे" (फिलि. 1:9). तुम्ही कधीही कोणाचाही द्वेष करू नये किंवा कोणाशीही उद्धट वागू नये. जे तुम्हाला अभिवादन करत नाहीत त्यांचे अभिवादन करा. सर्व लोकांशी नेहमी आदराने बोला (जसे 1 पेत्र 2:17 मध्ये सांगते). जे तुमचे वाईट करतात त्यांच्याशी चांगले वागा.

जेव्हा परुशी येशूला “बाल्जबूल” म्हणत, तेव्हा त्याने त्यांना क्षमा केली (मत्तय.12;24,32). जेव्हा त्यांनी त्याला न्यायालयात खेचले आणि तेथे त्याच्यावर खोटे आरोप केले, तेव्हा त्याने त्यांना कधीही धमकावले नाही, परंतु त्याने स्वतः ला पितयाच्या स्वाधीन केले (1 पेत्र.2:23). आपण येशूच्या पावलावर पाऊल ठेवले पाहिजे.

म्हणून जर काही परुशी तुमच्यावर आरोप लावत असतील (किंवा एके दिवशी तुम्हाला कोर्टात घेऊन जातील) तर, येशूने काय म्हटले ते लक्षात ठेवा: "सर्वजण तुमचा तिरस्कार करतील... ते तुम्हाला कोर्टात खेचतील... पण सापासारखे शहाणे आणि कबुतरासारखे निरुपद्रवी व्हा.... तेव्हा तुम्हाला बोलण्यासाठी शब्द दिले जातील (म्हणून तुम्हाला तिथे गप्प बसण्याची गरज नाही!) ... लोकांना घाबरू नका, कारण जे काही झाकलेले आहे ते उघड होईल... पण जो सहन करतो तो (प्रेमात प्रत्येकासाठी) शेवटपर्यंत जतन केले जाईल... अशी वेळ देखील येईल जेव्हा तुम्हाला मारणारे विचार करतील की ते देवाची सेवा करत असत" (मत्तंय. 10:16-30; मत्तय् 24:9-13; योहान 16:2).
तर, नेहमी:
(१) प्रथम देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व शोधा. आणि
(२) नेहमी इतरांप्रती शहाणपणाच्या प्रेमात रुजलेले आणि आधारलेले राहा.

ख्रिस्ती धर्मजगतातील प्रत्येक गट आपले बायबल धरून म्हणतो, "आम्ही बरोबर आहोत. देव आपल्या पाठीशी आहे." त्यापैकी कोण बरोबर आहे? मला परमेश्वराकडून स्पष्ट उत्तर मिळाले: "जे नेहमी सत्य बोलतात (जरी ते त्यांच्या विरोधात गेले तरी) देव त्यांच्याबरोबर असतो आणि जे नेहमी इतरांबद्दल शहाणपणाच्या प्रेमात राहतात (म्हणजे, जे कधीही इतरांचे नुकसान करत नाही किंवा करू इच्छित नाहीत.)"

तुम्ही तुमचे जीवन देवाचे राज्य शोधण्यात प्रथम व्यतीत करा. याचा अर्थ तुमचा अभ्यास किंवा काम चांगले करणे आणि ख्रिस्ति लोक सर्व क्षेत्रात चांगले काम करतात हे दाखवून देणे, जीवनात सरळपणाने जगणे आणि इतरांवर निस्वार्थ प्रेम करणे.

मला तुमच्यासाठी काही सल्ला आहे की जेव्हा कोणी तुमच्यावर कोणत्याही विषयावर टीका करत असेल तेव्हा काय करावे. स्वतःच्या बचावात काहीही बोलू नका. यशया 54:17 नुसार प्रभुला स्वतःच तुमचा बचाव करू द्या: "'तुझ्याविरूद्ध तयार केलेले कोणतेही शस्त्र यशस्वी होणार नाही; आणि प्रत्येक जीभ जी तुमच्यावर न्यायनिवाड्यात आरोप करेल तिला दोषी ठरवले जाईल. त्यांचा न्याय माझ्याकडून आहे,' प्रभु घोषित करतो." सर्व लोकांना प्रकरणे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणे निरर्थक आहे. देव सर्वशक्तिमान आहे आणि त्याचे सत्य अग्नीसारखे आहे ज्याला आपल्यासारख्या क्षुद्र लोकांपासून संरक्षणाची गरज नाही.