WFTW Body: 

गुप्त ठिकाणी देवाच्या सानिध्यात जगा आणि हृदयात सतत त्याच्यासाठी एक आर्त् हाक असू द्या. जेव्हा देवासाठीची ही तळमळ निघून जाते तेव्हा ख्रिस्ती जीवन हे एक कोरडा, रिक्त धर्म बनतो. म्हणून देवासाठीची ती तळमळ कोणत्याही किंमतीत जपून ठेवा. तो तुमच्या विश्वासाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. तहानलेल्या हरणाप्रमाणे आपण सतत देवाची आस धरली पाहिजे.


आपल्यासाठी देवाच्या शिक्षणात अनेक गोष्टींचा समावेश होतो ज्यांना जग "निराशा" म्हणतात. पण या आमच्यासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी "त्याच्या-नियुक्त्या" आहेत. जर आपण अशा निराशेचा सामना केला नाही तर आपण इतरांना कधीही सल्ला देऊ शकणार नाही. जीवनाच्या शिक्षणात अपयश देखील समाविष्ट आहे, कारण ज्या जगात ९९.९% लोक अपयशी आहेत अशा जगात इतरांना मदत करायची असेल तर अपयश आवश्यक आहे. अपयशाचे दोन उद्देश आहेत (१) आपल्याला नम्र करणे (आपल्याला तोडणे) आणि (२) आपल्याला इतरांबद्दल दयाळू बनवणे.


तुमच्या अध्यात्मिक लढायाही तुमच्या शिक्षणाचा भाग आहेत. जर तुम्ही जगिक पदव्यांसाठी इतके कठोर परिश्रम करतात, तर सार्वकालिक, स्वर्गीय पदवीसाठी किती जास्त कठोर परिश्रम करण्याची तुमची इच्छा असली पाहिजे . वेळ कमी आहे आणि दिवस वाईट आहेत. आपल्या सर्व पृथ्वीवरील कामांमध्ये आपण सार्वकालिक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. स्वत:चे सतत परीक्षण करून आणि परमेश्वरासोबत नेहमी शुद्ध भावाने चाला.

पौलाने तीमथ्याला सांगितले, "आपणांमध्ये वस्ती करणार्‍या पवित्र आत्म्याच्या योगे तुझ्या स्वाधीन केलेली ती चांगली ठेव सांभाळ." (२ तीम. १:१४). देवाने आपल्याला आपले शरीर एक पवित्र खजिना म्हणून दिले आहे जे आपण आपल्या पृथ्वीवरील प्रवासादरम्यान त्याच्यासाठी जतन केले पाहिजे. एक दिवस आपण जीवनाचा प्रवास पूर्ण करेपर्यंत ते सर्व पापांपासून शुद्ध व्हावे आणि पवित्रतेत जतन केले जावेत यासाठी आपण हे दररोज त्याच्यासमोर सादर केले पाहिजे.

उदाहरणार्थ्: एखाद्या कंपनीने आम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षितपणे नेण्यासाठी पाच लाख रुपये दिल्यासारखे आहे. पण आपण त्यातला काही भाग वाया घालवला आणि उरलेला वाटेत गमावला. आता आपण पश्चात्ताप करतो आणि अपयशाने परमेश्वराकडे परत येतो. तो काय करतो? तो आपल्याला नाकारत नाही. त्याऐवजी तो आम्हाला माफ करतो आणि आम्हाला आणखी पाच लाख रुपये देतो आणि आमच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत ते सुरक्षितपणे घेऊन जाण्यास सांगतो. देव किती चांगला आहे.

ख्रिस्ती म्हणून आपली साक्ष जगाच्या दर्जापेक्षा खूप वरची असली पाहिजे. आपण असे कोणतेही कृत्य करू नये ज्यामध्ये वाईटाचे स्वरूपही असेल. जेव्हा शंका असेल तेव्हा विरुद्ध बाजूने न जाता सावधगिरीने आणि विवेकाच्या बाजूने चूक करणे बरे.