लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

प्रकटीकरणाच्या पुस्तकात दिलेल्या स्वर्गातील सातही झलकांमधून आपण स्वर्गातील रहिवासी सतत उच्च स्वरात देवाची स्तुती करताना पाहतो - कधीकधी ढगांच्या गडगडाटाप्रमाणे आणि कधी गर्जणाऱ्या नदीप्रमाणे आवाज ऐकू येतो. हे स्वर्गातील वातावरण आहे - कोणत्याही तक्रारी किंवा मागण्यांशिवाय सतत स्तुती करणारे. आणि हेच पवित्र आत्मा आपल्या अंत:करणात, आपली घरे आणि आपल्या मंडळ्यांमध्येही आणू इच्छितो. अशा प्रकारे सैतान या सर्व ठिकाणांपासून पळून जाईल.

स्वर्गातील एक पैलू प्रकटीकरण ४:१० मध्ये दिसतो. तिथे आपण वाचले की वडीलजनांनी "देवापुढे आपले मुकुट खाली ठेवले". स्वर्गात येशूशिवाय कोणाच्याही डोक्यावर मुकुट असणार नाही. आम्ही बाकीचे सर्व सामान्य बंधू आणि बहिणी म्हणून तिथे राहू. स्वर्गात कोणतेही विशेष बंधू किंवा भगिनी नाहीत. जे लोक मंडळीमध्ये खास बंधू किंवा भगिनी बनण्याचा प्रयत्न करतात ते नरकाचे वातावरण मंडळीमध्ये आणतात. जेव्हा आपण पित्यासमोर उभे राहतो तेव्हा आम्ही कधीही बढाई मारणार नाही. आपल्याकडे जे काही आहे ते आम्ही त्याच्यासमोर ठेवू. स्वर्गात, त्याच्याजवळ असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल "ते माझे आहे" असे कोणीही कधीही म्हणणार नाही (आपल्याला मिळालेल्या मुकुटाबद्दलही नाही). जेव्हा स्वर्गाचे वातावरण आपल्या मंडळींना व्यापू लागते, तेव्हा आपणसुद्धा आपल्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल, “हे माझे आहे” असे पुन्हा कधीही म्हणणार नाही. सर्व काही देवाचे मानले जाईल आणि म्हणूनच ते पृथ्वीवर देवाच्या राज्यासाठी मुक्तपणे उपलब्ध होईल.

स्वर्गात देवाची इच्छा कशी पूर्ण होते ? मी चार गोष्टी नमूद करतो. सर्व प्रथम, देवदूत देवाच्या आज्ञांसाठी सतत प्रतीक्षेत असतात. ते प्रथम देव बोलण्याची प्रतीक्षा करतात - आणि त्यानंतरच ते कार्य करतात. तर, जेव्हा आपण प्रार्थना करतो "जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो." (मत्तय ६ :१०) तेव्हा याचा अर्थ असा आहे की, सर्वप्रथम देवाचे म्हणणे काय आहे हे आपण ऐकू इच्छित आहोत. दुसरे म्हणजे, देव बोलतो तेव्हा देवदूत त्वरेने आज्ञा पाळतात. तिसरी गोष्ट, जेव्हा देव स्वर्गात काही आज्ञा देतो तेव्हा ते पूर्णपणे केले जाते. आणि शेवटी, देवदूतांचे आज्ञापालन आनंददायक आहे.

स्वर्गातील सहभागिता आशीर्वादित आहे. तिथे इतरांवर एकमेकांचे कसलेही प्रभुत्व नाही. प्रत्येकजण इतरांचा सेवक असतो. स्वर्गात पूर्णपणे वेगळा आत्मा आहे, कारण देव तिथे एक बाप आहे. तो लोकांवर अधिराज्य गाजवत नाही परंतु प्रेमळपणे त्यांचे पालन करतो आणि त्यांची सेवा करतो. हाच तो स्वभाव आहे ज्यात आपण सहभागी होऊ शकतो. जर आपण आता विश्वासू असू तर आम्हाला स्वर्गात मुगुट देण्याचे वचन देण्यात आले आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे का आपण नंतर लोकांवर राज्य करू? नाही बिलकुल नाही. याचा अर्थ असा की ज्याला पृथ्वीवर आपल्या बांधवांची सेवा करण्याची तीव्र इच्छा होती, परंतु विविध मर्यादा असल्यामुळे ते पूर्णपणे करू शकले नाहीत, त्यांना स्वर्गात या सर्व मर्यादा नाहीशा झालेल्या आढळतील आणि आपण इतरांची उत्तम प्रकारे सेवा करण्यास सक्षम होऊ. अशा प्रकारे आपल्या अंतःकरणाची उत्कट इच्छा पूर्ण होईल. स्वर्गातील सर्वांत महान व्यक्ती स्वतः येशू होईल आणि तो सर्वांचा महान सेवक होईल. त्याचा आत्मा सदैव सेवेचा आत्मा असेल. इतरांना चव मिळावी म्हणून स्वर्गातील एक नमुना म्हणून पृथ्वीवर मंडळी ठेवली आहे. कोणत्याही मंडळीमधील सर्वात मौल्यवान भाऊ आणि बहीण अशी आहे जी स्वर्गाचे वातावरण एखाद्या मंडळीमध्ये आणू शकेल आणि जो त्या मंडळीमधील बंधू-भगिनींमधील सहभाग वाढवू शकेल. आणि ही गोष्ट आवश्यक नाही की वडील भाऊ असावा. आपल्या सर्वांनाच असे बहुमूल्य बंधू व भगिनी बनण्याची संधी आहे. मंडळीमध्ये एखादा भाऊ किंवा बहीण आहे का, जेव्हा जेव्हा तो / ती सभेत किंवा घरात येतो/येते तेव्हा खोलीतून स्वर्गातून वाहणाऱ्या शुद्ध झुळुकीसारखे आहे. अशी व्यक्ती किती अनमोल भाऊ / बहीण आहे! जरी तो थांबला आणि आपल्याकडे अवघ्या पाच मिनिटांसाठी भेटला तरीही आपणास ताजेतवाने वाटते. आपल्या घरात जणू पाच मिनिटांसाठी स्वर्ग आला असं तुम्हाला वाटतं! त्याने तुम्हाला प्रवचन किंवा धर्मशास्त्राच्या प्रकटीकरणाचा शब्दही दिला नसेल. पण तो शुद्ध होता. तो लहरी किंवा उदास नव्हता आणि त्याला कोणाविरुद्धही तक्रार नव्हती.