WFTW Body: 

"कारण सर्वकाही त्याच्याच प्रीत्यर्थ आहे." (रोम ११:३६) देव अल्फा व ओमेगा, प्रारंभ व अंत, पहिला व शेवटला आहे. आणि म्हणून, जसे सर्व सार्वकालिक स्वरूपाच्या गोष्टी ज्यांचा उगम त्याच्यात होतो, तसेच त्यांना त्याच्यामध्येच परिपूर्णता प्राप्त होते. सर्व गोष्टी देवाने त्याच्या गौरवासाठी निर्माण केल्या. याचा अर्थ असा नाही की देव स्वार्थीपणे आपल्याकडून गौरवाची इच्छा धरतो. तो स्वयंपूर्ण आहे, आणि असे काहीही नाही जे आपण त्याला देऊ शकतो ज्यामुळे त्याच्या परिपूर्णतेत भर पडेल. जेव्हा तो आपल्याला त्याचे गौरव करण्यासाठी बोलावतो, तेव्हा त्याचे कारण असे आहे की, आपल्या स्वत:च्या सर्वोच्च भल्यासाठी हाच मार्ग आहे. अन्यथा आपण आत्मकेंद्री आणि दुःखी होवू.

देवामध्ये केंद्रित असणे हा एक नियम आहे जो त्याने सृष्टीत निर्माण केला आहे. त्या नियमाचे उल्लंघन केवळ स्वतंत्र इच्छाशक्ती असलेल्या नैतिक प्राण्यांकडूनच होऊ शकते. निर्जीव सृष्टी तर आनंदाने आपल्या निर्माणकर्त्याच्या आज्ञेचे पालन करते आणि त्याचे गौरव करते. पण आदामाने त्या नियमाचे उल्लंघन केले आणि त्याचा परिणाम आपण मानवाच्या दुर्दशेत पाहू शकतो.

प्रभूने आपल्या शिष्यांना जी प्रार्थना करण्यास शिकवली त्या प्रार्थनेत पहिली विनंती, "तुझे नाव पवित्र मानले जावो"( मत्तय ६:९) ही आहे. प्रभू येशूच्या हृदयातील पहिली तळमळ ही होती. त्याने "पित्या, तुझ्या नावाचे गौरव कर" अशी प्रार्थना केली आणि मग क्रूसाचा मार्ग निवडला कारण ते पित्याच्या गौरवासाठी होते (योहान १२:२७,२८).

एका सर्वोच्च उत्कट भावनेने प्रभू येशूच्या जीवनावर राज्य केले - पित्याचे गौरव. तो सर्वकाही पित्याच्या गौरवासाठी करी. त्याच्या आयुष्यात पवित्र काम आणि ऐहिक काम असे कोणतेही वेगळे कप्पे नव्हते. प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी पवित्र होती. त्याने देवाच्या गौरवासाठी जसे उपदेश दिले, आजारी लोकांना बरे केले त्याचप्रमाणे देवाच्या गौरवासाठी त्याने लाकडी तिवई आणि बाक ही बनवले. प्रत्येक दिवस त्याच्यासाठी तितकाच पवित्र होता; आणि दैनंदिन जीवनातल्या गरजांवर खर्च केला जाणारा पैसा देवाच्या कार्याला किंवा गरिबांना दिल्या जाणाऱ्या पैशांइतकाच त्याच्यासाठी पवित्र होता.

येशू नेहमी आपल्या हृदयाच्या परिपूर्ण विसाव्यात राहत असे, कारण तो केवळ पित्याचे गौरव शोधी आणि केवळ आपल्या पित्याच्या मान्यतेची पर्वा करी. तो आपल्या पित्याच्या मुखासमोर राहत होता आणि त्याला माणसांकडून सन्मानाची किंवा स्तुतीची पर्वा नव्हती. येशूने म्हटले: "जो आपल्या मनचे बोलतो तो स्वतःचेच गौरव पाहतो." (योहान ७:१८).

एक जीवधारी ख्रिस्ती, मग तो कितीही देवाच्या गौरवाचा शोध घेणारा असे भासवू लागला, तरी आत खोल तो स्वतःच्या मानपानासाठी आतुर असतो. दुसरीकडे पाहता, येशूने कधीही स्वतःसाठी कोणताही सन्मान मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. जे काही मनुष्याच्या चतुराईत उगम पावते आणि मानवी चातुर्य आणि प्रतिभा यांच्या माध्यमातून केले जाते, त्याचा शेवट नेहमीच मनुष्याचा गौरव करण्यातच होईल. जे जिवामध्ये सुरू होते ते केवळ त्या जीवाचे गौरव करेल. परंतु अनंतयुगात स्वर्गात किंवा पृथ्वीवर असे काहीही असणार नाही की ज्यामुळे कोणत्याही मनुष्याला मान किंवा गौरव प्राप्त होईल. काळाच्या ओघात टिकून राहणारी आणि अनंतकाळाच्या प्रवेशद्वारांमध्ये प्रवेश करणारी प्रत्येक गोष्ट ही केवळ देवाकडून, देवाच्या माध्यमातून आणि देवासाठीच असेल.

देवाच्या बाबतीत तर त्या कृतीमागच्या हेतूमुळे खरे मूल्य आणि योग्यता त्या कृतीला प्राप्त होते. आपण काय करतो हे महत्त्वाचे आहे, पण आपण ते का करतो हे अधिक महत्त्वाचे आहे.