लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   नेता पुरूष
WFTW Body: 

जेव्हा पौलाने इफिसच्या वडीलवर्गाला बोलवून घेतले व त्यांना निरोप देताना तो प्रेषित 20:17-35 मध्ये जे बोलला त्याकडे लक्ष द्या. त्याने त्यांना आठवण करून दिली की तो त्यांच्यासोबत 3 वर्षे राहिला व त्याने त्यांना रात्रंदिवस बोध केला (वचन 31). 3 वर्षे म्हणजे 1000 दिवसांपेक्षा अधिक दिवस आणि जर पौलाने प्रत्येक दिवशी दोनदा संदेश दिला असेल तर त्याने नक्कीच 2000 पेक्षा जास्त वेळा संदेश दिले असतील

इफिस अशी जागा होती जेथे एकदा फार मोठे संजीवन आले होते आणि परिवर्तित ख्रिस्ती लोकांनी त्यांची जुनी जादूटोण्याची सर्व पुस्तके जाळून टाकली होती, ज्याची अंदाजे किंमत पन्नास हजार एवढी होती. ही अशी देखील जागा होती की जेथे रूमाल किंवा फडकी पौलाच्या अंगाला स्पर्श करून आणली तर त्याचा उपयोग आजार्याला बरे करण्यासाठी व दुष्टआत्मे काढण्यासाठी करीत असत. इफिस येथे देवाने पौलाद्वारे अनेक मोठे व अद्भुत चमत्कार घडवून आणले (पाहा प्रेषित 19:11,12,19). असे चमत्कार आपल्याला अन्य कुठेही झालेले दिसत नाहीत. या सर्वांच्या शेवटी पौल वडीलवर्गाला कोणती आठवण करून देत होता? त्याने दिलेल्या संदेशांची किंवा चमत्कारांची तो त्यांना आठवण करून देत होता का? नाही.

त्यांनी पौलाला ज्या दिवसापासनू बघितले त्या पहिल्या दिवसापासनू पौल नम्रतेचे जीवन जगला, ह्याची आठवण पालै त्यांना करून दते होता (प्रेषित 19:19). पौलाने दिलेले संदेश ते विसरले तरी देखील ज्या पद्धतीने तो त्यांच्यामध्ये राहनू जीवन जगला हे ते कधीच विसरू शकले नाही. पौलाच्या जीवनाचा त्यांच्यावर चिरस्थाई प्रभाव पडला होता. त्याचा कनवाळपू णा व त्याचे साधपे ण ते कधीच विसरू शकले नाही. इफिसच्या लोकांवर स्वतःचे व सहकर्मियांचे ओझे पडू नये म्हणनू व अन्य खिस्र् ती लोकांकरिता कित्ता व्हावे म्हणनू तो स्वतःच्या हाताने फार परिश्रम करून तंबू विणत असे व त्यातनू मिळकत कमवीत असे, ही गोष्ट पौलाने त्यांच्या लक्षात आणनू दिली होती (प्रेषित 19:34,35). या तीन वर्षाच्या काळामध्ये पौलाला कधीच पॆशाची, बक्षिसांची किंवा कपड्यांची हाव नव्हती, हे इफिस येथील लोक कधीच विसरले नाहीत (वचन 33).

देवाचा संपूर्ण मनोदय तडजोड न करता इफिसच्या लोकांना त्याने कशाप्रकारे सांगितला ह्याची पौल त्यांना आठवण करून देतो (प्रेषित 20:27). स्वतःच्या लोकप्रियतेकरिता तो मनुष्यांना संतोषवीत नसे. त्याने पश्चातापाचा संदेश लोकांना सांगितला आणि प्रत्येक अप्रचलीत विषयाला धरून असलेली गोष्ट त्याने लोकांना सांगितली. त्याने लोकांना हितकारक गोष्ट सांगितली, मग त्याद्वारे अनेक लोक दुखविल्या गेले असले तरी त्याने हितकारक गोष्ट सांगण्यात कसूर केली नाही (प्रेषित 20:20,21). या सर्व गोष्टींची पौलाने त्यांना आठवण करून दिली.

ज्याप्रमाणे पौलाने इफिसमध्ये राहून तीन वर्षे सेवा केली त्याचप्रमाणे तुम्ही देखील तीन वर्षांपर्यंत मंडळीत सेवा करिता व नंतर ती मंडळी तुम्ही सोडून जाता, तर तुमच्यातील कोणती गोष्ट तुमच्या कळपाला आठवेल? प्रभावी वक्ता म्हणून ते तुमची आठवण करतील की देवाचा नम्र व्यक्ती म्हणून आठवण करतील, ज्याने येशूसारखे जगून आपल्या जीवनाद्वारे ते प्रकट केले? त्यांना तुम्ही देवाजवळ आणिले व ख्रिस्तासारखे जीवन जगण्यास त्यांना आव्हान केले की ट्रॅक्स कसे वाटावे हे शिकविले यापैकी ते तुमच्याविषयी काय विचार करतील? आपले पाचारण किंवा आपले दान कोणतेही असू द्या. ख्रिस्तासारखे जीवन आपल्या अंतःकरणातून वाहायला हवे.

ज्याला रोग बरे करण्याचे दान आहे त्याने त्या दानाचा उपयोग येशूने केलेल्या पद्धतीनेच करावा. येशू नम्र होता व अगदी साधारण जीवन तो जगला, सर्व लोकांमध्ये मनापासून मिसळला, आजार्यांचा त्याला कळवळा आला व त्याने आजार बरा करण्यापूर्वी व आजार बरा झाल्यानंतर लोकांकडून कधीही पैसे घेतले नाही. त्याने पैसे न घेता लोकांना मोफत बरे केले. परंतु, माझ्या संपूर्ण जीवनात मी येशूसारख्या रोगमुक्त करणार्या एकाही व्यक्तीला कधीही भेटलो नाही. जर तुम्ही अशाप्रकारच्या कोणत्याही व्यक्तीला भेटले असाल तर कृपाकरून मला कळवा. मलासुद्धा त्या व्यक्तीला भेटण्यास खूप आवडेल. परंतु, मी अद्याप अशा व्यक्तीला भेटलो नाही. त्याऐवजी, पैशावर प्रीती करणार्या अनेक वक्त्यांना मी भेटलो आहे, जे रोग बरे करण्याचे दान असल्याचे ढोंग करितात व युक्त्यांनी लोकांना फसवितात. या सर्व गोष्टींमागील शोकांतिका अशी आहे की, ज्या तरुणांना पुढील गोष्टी स्पष्टपणे दिसत नाहीत, ते या फसविणार्या लोकांचे अनुसरण करितात व स्वतःकरिता अशाच प्रकारची सेवासंस्था सुरू करण्याच्या मागे लागतात; आणि अशाप्रकारे येणारी पिढी नाशाच्या मार्गावर जात आहे. ह्याचे मला फार दुःख वाटते

जर आपल्याला प्रेषितीय किंवा संदेष्टीय किंवा सुवार्ताप्रसार सेवेचे किंवा ख्रिस्ताच्या मेंढंरांना राखण्याचे किंवा उपदेशकीय सेवेचे, अशाप्रकारे कोणत्याही सेवेचे पाचारण असेल तर आपण ती सेवा ख्रिस्तासारख्या पद्धतीनेच करावी. प्रत्येक पाचारणात ख्रिस्ताच्या आत्म्याने आपल्याला प्रोत्साहन द्यावे

जर तुम्हाला वाटते की मंडळीवर पाळकीयपण करण्याचे पाचारण देवाने तुम्हाला केले आहे, तर ते ज्या पद्धतीने येशूने केले असते त्याच पद्धतीने तुम्ही करावे आणि तुमच्या कळपावर तुम्ही असा टिकणारा प्रभाव पडू द्यावा की तुम्ही येशूच्या तेजस्वी वैभवाने भरलेले आहात