लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   मूलभूत सत्य
WFTW Body: 

कलस्सै 3:15 मध्ये असे लिहिले आहे, ''खिस्र् ताची शांती तमु च्या अतं :करणात राज्य करो''. तुम्ही नाशाच्या मार्गाकडे जात आहात हे तुम्हाला कसे कळते? देवाची इच्छा तुम्ही गमाविली हे तुम्हाला कसे कळते? एखादी गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे दाखविण्याकरिता तमु च्या अंत:करणात एक मार्गदर्शक आहे. तुम्ही कधी फुटबॉलचा सामना बघितला आहे का? फुटबॉलचा सामना रेफरीशिवाय असू शकत नाही, कारण जर रेफरी नसेल तर प्रत्येक जण चुका करतील. परंतु, जर त्याठिकाणी रेफरी असेल तर तो लगेच कोणी चूक केल्यास शिटी वाजवेल.

असे समजा की तुम्ही फटु बॉलचा सामना खेळत आहात व रेफरीने शिटी वाजविली. प्रत्येक व्यक्ती खेळणे थांबवितो. परंतु, तुम्ही रेफरीच्या शिटीची दाद न घेता म्हणता, ''हे किती अद्र्भुत आहे! आता खेळाडू थांबले आहते, आता मी जातो आणि गाले करितो''. तुम्ही गाले कडे चेंडू फेकाल; परंतु, रेफरी तुम्हाला म्हणेल, ''चेंडू मागे घ्या. हा गोल होऊ शकत नाही, कारण 2 मिनिटांपूर्वीच तुम्ही चुका केल्या आणि जापे यर्तं ह्या चुका दुरूस्त हाते नाही, तापे यर्तं हा गाले गणल्या जाणार नाही''. नंतर तुम्हाला नम्रपणे तो चेंडू मागे घ्यावा लागले व चुकांची दुरूस्ती करावी लागेल. तुम्ही केलेल्या सर्व गोलांचे अंक गणल्या जाणार नाहीत, कारण रेफरीने शिटी वाजविलेली असते.

आपल्या ख्रिस्ती जीवनात हे कशाप्रकारे लागू होईल? जेव्हा तुम्ही काहीतरी चकू करिता, तेव्हा तमु च्या विवेकात मागर्द शर्क शिटी वाजवितो. कदाचीत तुम्ही तमु च्या पत्नीसाबे त ताठरतेने बोलले असाल किंवा तुम्ही अयोग्यरीतीने पैसे मिळविले असतील. जर तमु च्या अंत:करणात शिटी वाजत असेल तर त्यापुढे तुम्ही जे काही प्रभुसाठी कराल ते गणल्या जाणार नाही. प्रभु म्हणतो, ''परत ये, केलेल्या चुका प्रथम दुरूस्त कर. पत्नीकडे जा व तिची क्षमा माग. पत्नीची प्रथम क्षमा मागितल्याशिवाय कोणत्याही प्रकारे सुवार्ता प्रसाराचे कार्य करू नको. अन्यथा, तू केलेले सर्व गोल गणल्या जाणार नाहीत''.

ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात रेफरीची भूमिका बजाविते. जर तुम्ही या रेफरीचे ऐकाल तर तुम्ही कधीच चुकणार नाही. आणखी किती काळ तुम्ही रफे रीकडे दुर्लक्ष कराल? सामन्यात खेळाडू रफे रीसाबे त वाद करिताना तुम्ही कधी बघितले आहे का? परंतु, एक लक्षात असू द्या की त्यांच्या वादामध्ये नहे मी रफे री जिकंतो. रफे रीचा निर्णय हा अंतिम असतो. कधीकधी खेळाडू जर अधिक वाद घालत असेल तर सामन्यातनू खेळाडूला बाहरे पाठविण्यात येते, म्हणून रफे रीसाबे त वाद घालू नका, अन्यथा तो तुम्हाला क्षेत्राच्या बाहरे पाठवून देइर्ल. त्याऐवजी असे म्हणा, ''हे प्रभु, तू जे म्हणशील तसेच मी करेन''. प्रथम सर्व गोष्टी सुव्यवस्थित करा व नंतर पुढे चला. शिटी वाजली हे तुम्हाला कसे कळले? तमु ची शांती तुम्ही गमवाल. शांती तुमचा रफे री आहे. जर तुम्ही निराश आहात किंवा कशाने तरी व्यथीत आहात, तेव्हा अंतःकरणाच्या त्या निराशमय स्थितीत तुम्ही चचर्च् या सभते या. तुम्ही तुमचे मुख उघडू नका. तमु च्या मुखातून निराशा बाहरे येइर्ल. जेव्हा तुम्ही निराश असता तेव्हा बोलू नका. घरीदेखील कोणत्याही गोष्टीकरिता जर तुम्ही निराश असाल तर आपले मुखा बंद ठेवनू तुम्ही तुमच्या पत्नीकरिता आशीर्वादाचा उत्तम मार्ग होऊ शकता. जेव्हा तुम्ही निराश आहात तेव्हा तुमच्या अंत:करणात शिटी वाजले. सर्वप्रथम आपली चूक सुधारा. प्रत्येक वेळी तुमचे अंतःकरण निराश होत असेल तर ते चुकीचे आहे. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो.