WFTW Body: 

पौलाने म्हटले, की त्याने स्वतःचे हित साधण्याचा प्रयत्न केला नाही, तर पुष्कळांचे हित साधण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्यांचे तारण होईल, आणि मग तो ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुकरण करत असताना त्याच्या उदाहरणाचे अनुकरण करण्यास त्याने आम्हाला सांगितले (१ करिंथ १०:३३ आणि ११:१ एकत्र वाचा).

वासना, क्रोध, कटुता, द्रव्याचे प्रेम इत्यादींवर मात करणे अशा काही विशिष्ट क्षेत्रांत येशूचे अनुकरण करणे आणि तरीही देहात पापाचे मूळ नष्ट न करणे आपल्याला शक्य आहे. ल्युसिफर व आदाम यांनी पाप केले - व्यभिचार करून किंवा खून करून, किंवा निंदा करून किंवा वायफळ गप्पा करून किंवा डोळ्यांनी वासना करून नव्हे. स्वत:चे हित साधून आणि लाभ मिळवून त्या दोघांनी पाप केले. हे सर्व पापाचे मूळ आहे - आपल्या स्वतःच्या हिताचा शोध घेणे.

या दुष्ट मुळाशी जेव्हा कुऱ्हाड घातली जाईल, तेव्हाच आपल्या जीवनाची मूलभूत दिशा बदलेल. तोपर्यंत, आपण बऱ्याच क्षेत्रांमध्ये विजय मिळवू शकतो आणि तरीही आपला स्वतःचे हित ,लाभ आणि सन्मान शोधत असू. म्हणूनच पापावर विजयाचा प्रचार करणाऱ्यांपैकी पुष्कळ जणांचा परूशी म्हणूनच शेवट होतो.

पण जे लोक स्वतःच्या हिताचा शोध घेऊन त्यातच शेवट होण्याबद्दल गंभीर आहेत, त्यांना पौलाप्रमाणे असे दिसून येईल, की ते "इतरांचे तारण होईल अशा प्रकारे पुष्कळांचे हित " पाहण्याचा प्रयत्न करू लागतात (१ करिंथ १०:३३). पौल आधीच्या वचनात (१ करिंथ १०:३२) "यहुदी, हेल्लेणी आणि देवाची मंडळी" या तीन वर्गांच्या लोकांचे वर्णन करतो - म्हणजे जुन्या कराराखालील , कोणत्याही कराराखाली नसलेले आणि नवीन कराराखाली असलेले लोक. त्या सर्वांचे तारण व्हावे , अशी त्याची तीव्र इच्छा होती. आजही आपल्या आजूबाजूला अशाच तीन प्रकारचे लोक आहेत - पापावर विजय न मिळवलेले (जुना करार), विश्वास न ठेवणारे (कोणताही करार नसलेले ) आणि विजयात जगणारे येशूचे शिष्य (नवीन करार) . लोकांच्या या तीनही गटांप्रती आपली मनोवृत्ती अशी असली पाहिजे: "मी स्वतःचे हित शोधत नाही, तर त्यांचे हित शोधतो, ह्यासाठी की, त्यांच्या शरीरात वास करणाऱ्या सर्व पापांपासून त्यांचे तारण व्हावे." खुद्द येशू स्वर्गातून आला तेव्हा त्याची हीच मनोवृत्ती होती.

जेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांची अशी मनोवृत्ती असते: "मी माझे स्वतःचे हित शोधत नाही, तर पुष्कळांचे हित शोधतो की त्यांचे तारण होईल" तेव्हाच ते ख्रिस्ताचे शरीर म्हणून मंडळीची उभारणी करू शकतील. अन्यथा सभांमध्ये गहन विषयांबद्दल त्यांची विचारांची देवाणघेवाणही केवळ त्यांच्या स्वत:च्या सन्मानासाठीच होईल.

येशूने कधीही स्वतःचे हित शोधले नाही. त्याने नेहमी आपल्या पित्याच्या गौरवाचा शोध घेतला . हीच फक्त खरी आत्मिकता आहे - आणि यापेक्षा कमी असलेली कोणतीच गोष्ट नाही. एखादी व्यक्ती ज्या अंतिम हेतूसाठी जगत आहे, तो हेतू ती व्यक्ती पापभिरू आहे की पापी आहे हे ठरवते - आणि वासना आणि क्रोध इत्यादींवर त्याला इकडे तिकडे मिळणारे छोटे-छोटे विजयच नव्हेत - जरी हेही महत्त्वाचे आहेत, कारण तेदेखील सिद्ध करतात की एखादी व्यक्ती स्वत:चे सुख शोधत नाही. येशूने दुसऱ्या एका संदर्भात म्हटल्याप्रमाणे, "ह्या करायच्या होत्या, तरी त्या सोडायला पाहिजेत असे नाही. "(मत्तय २३:२३)