WFTW Body: 

"जे सौम्य (किंवा जे नम्र आणि सौम्य आहेत) ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील” (मत्तय ५:५). माझा असा विश्वास आहे की हे अशा लोकांबद्दल आहे जे त्यांच्या हक्कांसाठी लढत नाहीत, जे वाईट वागणूक मिळाल्यावर बदला घेत नाहीत. येशूचे हक्क काढून घेण्यात आले तेव्हा त्याने नम्रता काय असते हे दाखवले, त्याने त्याचा प्रतिकार केला नाही. ज्यांनी त्याला शाप दिला त्यांना त्याने शाप दिला नाही. ज्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले त्यांच्यावर देवाचा न्याय व्हावा अशी त्याने प्रार्थना केली नाही. तो मत्तय ११:२९ मध्ये आपल्याला सांगतो, "माझ्याकडून शिका, कारण मी मनाचा सौम्य व लीन आहे - मी नम्र आणि कोमल मनाचा आहे." हा शब्द मराठी मध्ये पूर्णपणे भाषांतरित करणे सोपा नाही आणि म्हणूनच लोकं ह्या शब्दासाठी अनेक वेगवेगळी भाषांतरे वापरतात - “सौम्य” (माझ्या बायबलच्या समासात “विनम्र, नम्र” असे लिहिले आहे). सर्वसाधारण त्याचे असे चित्र आहे की जो पृथ्वीवरील आपल्या हक्कांसाठी लढत नाही, कारण वचन सांगते की एके दिवशी तो पृथ्वीचे वतन भोगेल. देव त्यांना पृथ्वीचे वतन देतो जे त्याच्यासाठी लढत नाहीत. हा देवाचा मार्ग आहे.

जे त्यांच्या हक्कांसाठी लढतात, देव त्यांना भरपूर आशीर्वाद देतो असे नाही, तर जे त्यांचे हक्क सोडून देतात त्यांना ते तो देतो. येशू वधस्तंभावर गेला; त्याने त्याचे सर्व अधिकार सोडून दिले. त्याने स्वतःला मृत्युपर्यंत, अगदी वधस्तंभावरील लज्जास्पद मृत्युपर्यंत स्वतःला त्याने नम्र केले यात त्याची नम्रता आणि सौम्यता दिसून येते (फिलिप्पैकरास पत्र २:८). त्याला अपमानित आणि लज्जित केले गेले, आणि कारण तो अशा प्रकारे, त्या पातळीपर्यंत खाली जाण्यास तयार असल्याने, फिलिप्पैकरास पत्र २:९ मध्ये म्हटले आहे, "देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले." आज ख्रिस्ताला पित्याच्या उजव्या हाताला उंचावण्याचे कारण हे नाही की, तो नेहमीच सर्वकाळ तिथे होता. तो नेहमीच देव म्हणून तिथे होता पण जेव्हा तो मानव म्हणून पृथ्वीवर आला तेव्हा त्याने पित्याच्या उजव्या हाताकडे राहण्याचा अधिकार मिळवला. ते समजून घेणे खूप महत्वाचे आहे. त्याने त्याच्या पृथ्वीवरील जीवनात देवाचे स्वरूप इतके परिपूर्णपणे प्रदर्शित केले, सर्व प्रकारच्या प्रलोभनांना तोंड देणारा माणूस म्हणून, आणि त्याने स्वतःला मृत्यूपर्यंत, अगदी वधस्तंभावरील मृत्यूपर्यंत नम्र करून त्याने पित्याच्या उजव्या हाताकडे परत येण्याचा अधिकार मिळवला. तो त्याच्या हक्कांसाठी लढला नाही आणि म्हणूनच, एके दिवशी संपूर्ण पृथ्वीचे वतन त्याला दिले जाईल.

सध्या त्याला असे नाव देण्यात आले आहे जे सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ आहे, जेणेकरून स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली असलेला प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकेल. ते अजून घडले नाही. आज बरेच लोक येशूच्या नावाचा तिरस्कार करतात आणि त्याच्या नावापुढे नतमस्तक होत नाहीत. भुते आणि पृथ्वीवरील बरेच लोक त्याच्या नावापुढे नतमस्तक होत नाहीत. पण असा दिवस नक्कीच येईल जेव्हा प्रत्येक गुडघा येशूच्या नावापुढे टेकेल आणि प्रत्येक जीभ कबूल करेल की येशू ख्रिस्त हाच प्रभु आहे आणि संपूर्ण पृथ्वी त्याला दिली जाईल. तो नम्र होता म्हणून ती त्याचीच असेल. आणि म्हणूनच, जे नम्रतेच्या मार्गाने त्याचे अनुसरण करतात त्यांना येशू म्हणतो, "माझ्याकडून शिका" (मत्तय ११:२९). त्याने आपल्याला एकच गोष्ट त्याच्याकडून शिकायला सांगितली आहे आणी ती म्हणजे सौम्यता आणि नम्रता. "माझ्याकडून शिका, कारण मी सौम्य आणि नम्र आहे, सौम्य आणि मनाचा लीन आहे." हे आपण स्वतः येशूकडून शिकले पाहिजे. तो आपल्याला पुस्तकातून शिकायला सांगत नाही. तो म्हणतो, "माझ्याकडे पहा आणि बघा की ,मी माझ्या हक्कांसाठी कसा लढलो नाही, मी माझे हक्क कसे सोडले आणि मी कसा नम्र आणि लीन होतो, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिवांना विसावा मिळेल". मला असे वाटते, बरेच ख्रिस्ती लोक इतके अशांत, तणावग्रस्त आणि काहींना तीव्र नैराश्य असण्याचे एकच कारण आहे : ते नम्र नाहीत. ते आतल्या आत कश्यासाठीतरी लढत आहेत. ते त्यांचे हक्क शोधत आहेत, आणि म्हणूनच ते अशांत आहेत.

नम्रता हा अशा गुणांपैकी एक आहे ज्याची सहजपणे नक्कल केली जाऊ शकते. खरी नम्रता ही अशी गोष्ट नाही जी इतरांना आपल्यात दिसते. ती देव आपल्यामध्ये पाहतो - आणि ती आपल्या आत आहे. येशूच्या जीवनात त्याचे उदाहरण आहे. फिलिप्पैकरास पत्र २:५-८ आपल्याला सांगते की येशूने देव म्हणून आपले सर्व लाभ आणि अधिकार त्यागले आणि तो सेवक बनला आणि माणसांच्या हातून वधस्तंभावर खिळण्यासही तयार झाला. आपण नम्रतेच्या त्या मार्गाने त्याचे अनुसरण केले पाहिजे.

येशूने स्वतःला ३ टप्प्यात नम्र केले.

१. तो माणूस म्हणून जन्माला आला.
२. तो सेवक बनला.
३. वधस्तंभावर, गुन्हेगारासारखी वागणूक स्वीकारण्यास तो तैयार होता.

तिथे आपल्याला ख्रिस्ती जीवनाचे तीन रहस्ये दिसतात: नम्रता, नम्रता आणि नम्रता.

येशू पृथ्वीवर ३३ वर्षे जगला आणि त्याला इतक्या नम्रतेने इतरांची सेवा करताना आणि धीराने दुःख, अपमान आणि जखमा सहन करताना जेव्हा देवदूतांनी पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले असेल. वर्षानुवर्षे स्वर्गात त्याची उपासना करण्याची त्यांना सवय होती. पण जेव्हा त्यांनी पृथ्वीवरील त्याचे वर्तन पाहिले तेव्हा देवाच्या स्वभावाबद्दल त्यांना अधिक शिकायला मिळाले – त्याची लीनता आणि नम्रता – जे येशू स्वर्गात असताना त्यानी कधीही पाहिले नव्हते किंवा त्यांना समजले नव्हते. आता देव स्वर्गातील देवदूतांना आपल्याद्वारे मंडळीतून ख्रिस्ताचा तोच आत्मा दाखवू इच्छितो (जसे इफिसकरास पत्र ३:१० मध्ये म्हटले आहे). देवदूतांना
आपल्यात आणि आपल्या आचरणात काय दिसते? आपल्या वर्तनामुळे देवाचे गौरव होते का?

लक्षात ठेवा की नम्रता हा सर्वांत मोठा गुण आहे. नम्रता हे मान्य करते कि आपल्याकडे जे काही आहे आणी आपण जे काही आहोत ते सर्व देवाचे दान आहे. नम्रता आपल्याला सर्व मानवांना, विशेषतः दुर्बल, असंस्कृत, मंद आणि गरीबांना, मूल्य आणि आदर देणारी बनवते. केवळ नम्रतेच्या त्या मातीवरच आत्म्याचे फळ आणि ख्रिस्ताचे गुण वाढू शकतात. म्हणून तुम्ही स्वतःचे सतत मूल्यांकन करत जगले पाहिजे, जेणेकरून उच्च विचारांचे, सन्मान मिळवण्याचे किंवा देवाला दिले जाणारे गौरव घेण्याचे विष कधीही तुमच्या हृदयात प्रवेश करू नये. येशूच्या नम्रतेवर खूप मनन करा. हि माझी तुम्हाला सर्वात आग्रहाची विनंती आहे.