लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

खरी मंडळी केवळ तेच बांधू शकतात, जे येशूप्रमाणे, त्यासाठी सर्वकाही सोडण्यास तयार आहेत.

"ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले" (इफिस ५:२५). आज मंडळी बांधू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला तीच किंमत मोजावीच लागेल - दररोज स्वत:च्या आत्मजीवनाचा संपूर्ण त्याग. ख्रिस्ताचे शरीर बांधण्याचा कोणताही सोपा मार्ग नाही. हे तत्त्व आपण माणसाच्या इतिहासाच्या सुरुवातीपासूनच पाहतो.

काईनाने देवाला केवळ "अर्पण" आणले - आणि देवाने ते नाकारले. हाबेलाने "आपल्या कळपातील सर्वात उत्तम " आणले - आणि देवाने ते स्वीकारले (उत्पत्ती ४: ३-५). काईन धार्मिक ख्रिस्ती लोकांचे प्रतीक आहे जे देवाला अर्पणे आणतात ज्याची किंमत त्यांच्यासाठी फारच कमी किंवा काहीच नसते . परंतु, हाबेल आध्यात्मिक विश्वास ठेवणाऱ्यांना सूचित करतो जे देवाला अर्पणे आणतात, ज्यासाठी त्यांना सर्वस्व मोजावे लागते.

अब्राहामाने देवाच्या पाचारणानुसार, मोरिया डोंगरावरील वेदीवर इसहाकाला अर्पण केले तेव्हा त्याने अर्पण केले असते असे सर्वात किंमती अर्पण होते. तो हाबेलाच्या पावलावर पाऊल ठेवून चालला होता (उत्पत्ती २२).

एक हजार वर्षांनंतर, दाविदाने मोरिया पर्वतावर (अरवना यबूसी याच्या खळ्यात) त्याच ठिकाणी अर्पण दिले आणि संपूर्ण वचनबद्धतेचे हे शब्द म्हटले, " मी आपला देव परमेश्वर ह्याला फुकटचे होमबली अर्पण करणार नाही” (२ शमुवेल २४:२४).

अब्राहाम व दावीद यांनी अर्पण केलेली किंमती अर्पणे देवाने पाहिली आणि शलमोनाला, या दोन माणसांनी ज्या ठिकाणी आपली किंमती अर्पणे दिली होती त्याच ठिकाणी— मोरिया पर्वतावरील अरवानाच्या खळ्यात —देवाचे मंदिर बांधण्यास सांगितले (पाहा २ इतिहास ३:१).

त्यातून देव दाखवत होता, की त्याचे घर केवळ अशा लोकांद्वारेच बांधले जाऊ शकते, ज्यांच्याकडे संपूर्ण त्यागाची ही भावना आहे. तेच फक्त ख्रिस्ताची वधू निर्माण करतील - यरूशलेम (प्रकटीकरण २१:२). इतर सर्व ख्रिस्ती बाबेलची गणिका बांधतील (प्रकटीकरण १७ व १८).

काईन व हाबेल यांनी या दोन प्रवाहांची सुरुवात केली - धार्मिक लोक व आध्यात्मिक लोक. हे दोन प्रवाह नंतर इस्राएलच्या इतिहासातील खोट्या आणि खऱ्या संदेष्ट्यांमध्ये दिसून आले; आणि मग परूशी व येशूमध्ये; आणि शेवटी बाबेल व यरूशलेम येथे संपेल(प्रकटीकरण १७, १८ व २१).

पुष्कळ विश्वासू लोक देवदूतांचे व येशूच्या भौतिक रूपाचे दृष्टान्त पाहण्यास उत्सुक असतात. आपली उत्कटता मात्र येशूच्या जीवनाचे वैभव पाहण्याची- तो ज्या प्रकारे पृथ्वीवर राहत होता त्या मार्गात, ते पाहण्याची असली पाहिजे. हे आपल्यासाठी अनुसरण करण्यासाठी उदाहरण आहे.

पौलाने म्हटले: "माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही…...किती मी कष्टी माणूस!" (रोम ७:१८, २४). यामुळेच त्याला स्वत:ला पूर्णपणे शुद्ध करण्याची एक ज्वलंत भावना मिळाली. आपल्या देहाच्या भ्रष्टपणाचे हे प्रकटीकरण आपल्यालाही आवश्यक आहे. तरच आपण "देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू" असा प्रयत्न करू(२ करिंथ.७:१).- आणि अशा प्रकारे मंडळीचे पावित्र्यात जतन करण्याचा प्रयत्न करू.

आपण ज्या शुद्ध धर्मसिद्धान्तांवर विश्वास ठेवतो आणि ज्यांचा प्रचार करतो, त्यांचा आपण केवळ धर्मसिद्धान्त म्हणून विचार केला, तर ते सहजासहजी सुभक्तीच्या सामर्थ्याशिवाय असलेल्या रूपात रूपांतरित होऊन क्षीण/ भ्रष्ट होऊ शकतात. ते आपल्यासाठी केवळ धर्मसिद्धान्तांपेक्षा कितीतरी पटीने अधिक असले पाहिजेत. ते आपल्यासाठी प्रकटीकरण बनले पाहिजेत - असे प्रकटीकरण जे आपल्या जीवनात वाढतच जाते. आपल्या जीवनातील निरनिराळ्या क्षेत्रांत आपण जितक्या विश्वासूपणे तोंड देतो आणि मोहाविरुद्ध लढतो, तितकेच आपल्या आंतरिक जीवनात ख्रिस्तासारख्या नसलेल्या अनेक क्षेत्रांत आत्म्याचे प्रकटीकरण आपल्याला प्राप्त होईल- ज्या गोष्टींपासून आपण स्वतःला शुद्ध केले पाहिजे.

अशा सततच्या प्रकटीकरणाशिवाय मंडळी - ख्रिस्ताचे शरीर बांधणे अशक्य होईल. आपल्या देहातील भ्रष्टपणाचे हे प्रकटीकरण न होता आपल्याला जी 'पवित्रता' प्राप्त होते, ती केवळ जुन्या करारातील संतांसारखीच (उत्तमातील) – नियमशास्त्रातील बाह्य नीतिमत्तेसारखी असेल. यामुळे कदाचित आपल्या सहविश्वासणाऱ्या बांधवांत आपली ख्याती होईल, पण ती "देवाच्या दृष्टीने पूर्ण" असणार नाही (प्रकटी ३:१, २).

मोहाच्या क्षणी जर आपण येशूला आपले उदाहरण म्हणून 'पाहत' नसू , तर आपण मागे फिरलो आहोत हे आपण मानले पाहिजे.