WFTW Body: 

जगातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे देवाला जाणणे. कारण जेव्हा आपण देवाला ओळखतो, तेव्हा येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीत काय करायचे हे आपल्याला कळेल. संपूर्ण जग जरी आपल्या विरोधात असले, तरी आयुष्याला सामोरे जाण्यासाठी आपण धाडसी असू, कारण आपण मजबूत पायावर उभे आहोत, हे आपल्याला माहीत आहे. देवाला ओळखायला वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही तरुण असतानाच सुरुवात केलेली बरी. देवाला जाणून घेण्यासाठी, या जगातील प्रत्येक गोष्ट देवाच्या तुलनेत कचरा आहे असे मानण्यास तुम्ही तयार असले पाहिजे. याचा अर्थ असा की, ज्या गोष्टींना ऐहिक लोक महान मानतात, त्या गोष्टींबद्दल तुम्हांला आकर्षण तर नसावेच, तर त्यांकडे तुम्ही कचरा म्हणून पाहिले पाहिजे! पौलाच्या बाबतीतही असेच होते (पाहा फिलिप्पै ३:८).

जर आपण या जगात पैसा, आनंद, सन्मान किंवा महानता या गोष्टींच्या मागे पडलो , तर एके दिवशी आपल्याला सार्वकालिक अशा स्पष्ट प्रकाशात कळेल की, आपले हात कचऱ्याने भरलेले आहेत. तेव्हा आपल्याला कळेल की, जेव्हा देव आपल्याला त्याची संपत्ती मिळवण्यास सांगत होता त्यावेळी आपण आपले पृथ्वीवरील जीवन कचऱ्याला चिकटून राहण्यात घालवले होते,. म्हणून शहाणे व्हा - आणि पृथ्वीच्या वस्तू फक्त वापरा (कारण आम्हाला येथे राहण्यासाठी त्यांची आवश्यकता आहे) परंतु त्यापैकी कोणत्याही गोष्टीच्या कधीही अधीन होऊ नका , अन्यथा तुम्ही आपला ज्येष्ठत्वाचा हक्क वरणाच्या एका वाडग्यासाठी विकता.

तुम्ही तुमच्या ख्रिस्ती जीवनाबद्दल गंभीर आहात हे जर देवाला दिसले, तर तो तुमच्या जीवनात जे काही हलवून टाकता येईल ते सर्व काही हलवून टाकेल, जेणेकरून त्याच्यासोबतच्या तुमच्या नातेसंबंधाविषयी तुमची फसवणूक होणार नाही. त्याला तुमच्या आत्म्याची ईर्षा वाटते.तुम्ही त्याला वैयक्तिकरीत्या ओळखावे अशी त्याची इच्छा आहे, एखाद्या पुस्तकातून (पवित्र शास्त्र ) किंवा दुस-या व्यक्तीद्वारे नव्हे.

देवाच्या प्रीतीबद्दल देवाची स्तुती करा, जी आपल्याला आपली खरी स्थिती दाखवते, जेणेकरून जिथे सुधारणा आवश्यक आहे ते आपण आताच सुधारू शकू. आपण पापाचा तिरस्कार करतो आणि स्वतःला शुद्ध ठेवतो हे पुरेसे नाही. नाही. आपण प्रभू येशूसोबत गहिरा वैयक्तिक नातेसंबंध जोडला पाहिजे. अन्यथा आपली सर्व शुद्धी केवळ 'नैतिक आत्म-सुधारणा कार्यक्रम' बनू शकते. परमेश्वराशी घनिष्ट नातेसंबंध निर्माण करण्यासाठी सर्वप्रथम, कोणत्याही ज्ञात पापाची जाणीव होताच शोक करण्याद्वारे आणि त्याची कबुली देऊन, आपला विवेक स्पष्ट ठेवण्याची तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे. मग तुम्ही दिवसा वारंवार परमेश्वराशी बोलण्याची सवय लावून घेतली पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा एक दिवस तुमच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीचा चुरा होत असताना आणि पडत असताना , तेव्हा तुम्ही एकटे असला तरी उभे राहू शकाल.

ही माझी सर्वात मोठी तळमळ आहे - परमेश्वराला जाणून घेण्याची, कारण केवळ हेच सार्वकालिक जीवन आहे (योहान १७:३). जेव्हा मला भारतात आणि परदेशात ख्रिस्ती गट आणि धर्मोपदेशकांकडून विरोध केला गेला आणि मला अपमानित केले गेले, तेव्हा केवळ परमेश्वराबद्दलच्या या ज्ञानामुळेच,मला विचलित न होता, स्वस्थपणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रीतीत उभे राहण्यास मदत झाली आहे . माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही परमेश्वराला त्याच प्रकारे ओळखाल - आणि मी त्याला ओळखतो त्यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे.