मत्तय २८:२० मध्ये आपण वाचतो की शिष्यांना आपल्या प्रभूने दिलेल्या प्रत्येक आज्ञा पाळांवयास आणी जीवनात त्याप्रमाणे आचरण करण्यास शिकवले पाहिजे. हा शिष्यत्वाचा मार्ग आहे. येशूने दिलेल्या काही आज्ञा बघाण्यासाठी , एखाद्याला केवळ मत्तंय 5, 6, आणी 7 वाचायचे आहे - ज्यांचे पालन करण्याची तसदी बहुतेक विश्वासणारे घेत नाहीत. शिष्य हा शिकणारा आणि त्याप्रमाणे अनुसरण करणारा (अनुयायी) असतो.
ज्यांना देवाच्या संपूर्ण उपदेशाची घोषणा करण्याच्या आवाहनाने ग्रासले आहे, अशा लोकांची आज गरज आहे, जे स्वतः येशूने दिलेल्या सर्व आज्ञांचे पालन करतात आणि जे इतरांनाही येशूच्या सर्व आज्ञांचे पालन करण्यास शिकवण्यास उत्सुक असतात - आणि अशा प्रकारे ख्रिस्ताचे शरीर बनवतात.
येशूने म्हटले की त्याचे सर्व शिष्य एकाच चिन्हाने ओळखले जातील – त्यांची एकमेकांवर असलेली प्रीती (योहान १३:३५). लक्षात ठेवा! येशू ख्रिस्ताचे शिष्य त्यांच्या प्रचाराच्या किंवा त्यांच्या संगीताच्या गुणवत्तेवरून किंवा त्यांच्या "अन्यभाषेत बोलण्यावरून" किंवा त्यांच्या सभांमध्ये बायबल घेऊन जाण्यावरून किंवा त्यांच्या सभांमध्ये ते किती आवाज करतात ह्यावरून ओळखले जाणार नाहीत!! त्यांची ओळख त्यांच्या एकमेकांवरील असलेल्या उत्कट प्रीतीवरून होते.
सुवारतेच्या सभा, ज्या लोकांना ख्रिस्ताकडे आणतात त्याचे रूपांतर त्या परिसरात अश्या एका मंडळीची स्थापनेत झाले पाहिजे, जिथे शिष्य एकमेकांवर प्रीती करतात. दुःखाची गोष्ट ही आहे की, अनेक ठिकाणी जिथे वर्षानुवर्षे वारंवार सुवारतेच्या सभा घेतल्या जातात, तिथे अशी एखादी मंडळी मिळणे कठीण आहे ज्याबद्दल असे म्हणता येईल की त्यातील सदस्य एकमेकांशी भांडत नाहीत किंवा एकमेकांची निंदा करत नाहीत, इत्यादी.. , परंतु एकमेकांवर प्रेम करतात.
नवीनच ख्रिस्ता कडे आलेले लोक जर अश्या प्रकारचे विजयी जीवन लगेचच जगू शकत नाही, तर हे समजू शकते. परंतु जर आपल्या मंडळीतील वडीलधारी आणि ख्रिस्ती नेत्यांमध्येही कलह आणि अपरिपक्वता दिसून येते तर त्याला आपण काय म्हणावे?
हा सर्वात स्पष्ट पुरावा आहे की महान आज्ञेचा दुसरा आणि सर्वात महत्वाचा भाग - शिष्यत्व आणि येशूच्या आज्ञांचे पूर्ण पालन करणे - पूर्णपणे दुर्लक्षित केला गेलेला आहे.
महान आज्ञेच्या पहिल्या भागावर (मार्क १६:१५) सहसा सर्वत्र जास्त जोर दिला जातो. तेथे, सुवार्तेवर भर दिला गेलेला आहे, प्रभूने केलेल्या चिन्हे आणि चमत्कारांद्वारे संदेशाची पुष्टी केली जाते .
तथापि, मत्तय २८:१९,२० मध्ये, शिष्यत्वावर भर दिला गेलेला आहे - शिष्याचे जीवन येशूच्या आज्ञांचे पूर्ण पालन करून प्रकट होते. अनेक ख्रिस्ती ह्या आज्ञेच्या पहिल्या भागावरच जोर देतात, परंतु खूप कमी ख्रिस्ती लोक नंतरच्या भागावर जोर देतात . जरी पहिला भाग नंतरच्या भागा शिवाय अर्ध्या मानवी शरीरा प्रमाणे अपूर्ण आणि निरुपयोगी आहे. पण किती जणांनी हे पाहिले आहे ?
येशूच्या सेवेत आपण वाचतो की, त्याच्या सुवारतेच्या, बरे करण्याच्या सेवेमुळे मोठ्या संख्येने लोक त्याच्या मागे येत होते. तेव्हा तो नेहमीच मागे वळून त्यांना शिष्यत्वाबद्दल शिकवत असे (लूक १४:२५,२६ पहा). आजचे सुवार्तिकही असेच करतील का - ते स्वतः किंवा प्रेषित, संदेष्टे, शिक्षक आणि मेंढपाळ यांच्या सहकार्याने, सुवार्तिकांनी सुरू केलेले काम ते पूर्ण करू शकतात.
शिष्यत्वाचा संदेश घोषित करण्यास प्रचारक का कचरत आहेत ? कारण त्यामुळे त्यांच्या मंडळ्यांमधील संख्या कमी होईल. पण त्यांना हे कळत नाही की त्यांच्या मंडळ्यांचा दर्जा खूपच चांगला होईल!!
जेव्हा येशूने लोकसमुदायाला शिष्यत्वाचा उपदेश केला, तेव्हा तो लोकसमुदाय संख्येने कमी होऊन त्यातील केवळ अकरा शिष्य राहिले (योहान ६:२ ची ६:७० शी तुलना करा). इतरांना हा संदेश खूप कठीण वाटला आणि त्यांनी त्याला सोडले (योहान ६:६०,६६ पहा). परंतु त्याच्यासोबत राहिलेल्या त्या अकरा शिष्यांद्वारेच देवाने शेवटी जगात त्याचा जो उद्देश होता तो पूर्ण केला.
आज पृथ्वीवर ख्रिस्ताचे शरीर म्हणून, आपल्याला पहिल्या शतकात त्या अकरा प्रेषितांनी सुरू केलेली सेवा चालू ठेवायची आहे. लोकांना ख्रिस्ताकडे आणल्यानंतर, त्यांना शिष्यत्व आणि आज्ञाधारकतेकडे नेले पाहिजे. अशा प्रकारे ख्रिस्ताचे शरीर बांधले जाईल.
जीवनाकडे जाणारा मार्ग अरुंद आहे ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.
ज्याला ऐकायला कान आहेत, त्याने ऐकावे.