WFTW Body: 

याकोबाची देवाबरोबर दोनदा गाठ पडली - एक बेथेल येथे (उत्पत्ति २८) आणि दुसरी पनीएल येथे (उत्पत्ति ३२).

बेथेलचा अर्थ "देवाचे घर" (मंडळीचा एक प्रकार) आणि पनीएल म्हणजे "देवाचे मुख". देवाच्या मंडळीमध्ये प्रवेश करण्यापलीकडे देवाचे मुख पाहण्यापर्यंत आपण सर्वांनी जाण्याची गरज आहे. बेथेल येथे असे म्हटले आहे की, "सूर्य मावळला" (२८:११) - ही केवळ भौगोलिक परिस्थिती आहे, परंतु याकोबाच्या जीवनात काय घडत होते याचेही द्योतक होते , कारण पुढील २० वर्षे त्याच्यासाठी दाट अंधाराचा काळ होता. मग पनीएल येथे त्यात म्हटले आहे, "सूर्योदय झाला" (उत्पत्ति ३२:३१) - पुन्हा एक भौगोलिक परिस्थिती, आणि याकोबदेखील शेवटी देवाच्या प्रकाशात आला होता.

बेथेल येथे याकोबाने पृथ्वीवर उभारलेल्या शिडीचे स्वप्न पाहिले ज्याचा वरचा भाग स्वर्गात पोहोचत होता. योहान १:५१ मध्ये येशूने, त्या शिडीचा अर्थ तो स्वत: - पृथ्वीपासून स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग असा स्पष्ट केला. त्यामुळे याकोबाने जे पाहिले ते खरे तर येशूने स्वर्गाचा मार्ग खुला करण्याची भविष्यसूचक दृष्टांत होता. त्यानंतर परमेश्वराने त्या स्वप्नात याकोबाला अनेक गोष्टी देण्याचे वचन दिले. पण याकोब इतका ऐहिक होता की, तो केवळ पृथ्वीवरची सुरक्षा, शारीरिक आरोग्य आणि आर्थिक समृद्धीचा विचार करू शकत होता. आणि म्हणून तो देवाला म्हणाला, "प्रभू, तू जर या प्रवासात माझी काळजी घेतलीस आणि मला अन्न आणि कपडे दिलेस आणि मला सुखरूप घरी आणले तर मी तुला माझ्या कमाईच्या १०% देईन." याकोबाने देवाला पहारेकऱ्यासारखे वागवले. आणि जर देवाने तसे केले तर याकोब त्याला त्याचे वेतन देईल - त्याच्या उत्पन्नाच्या १०%!!

आजही कितीतरी विश्वासणारे लोक देवाला असेच वागवतात. त्यांना त्याच्याकडून फक्त भौतिक सुखसोयी हव्या आहेत. आणि परमेश्वराने त्यांना या गोष्टी दिल्या तर ते विश्वासूपणे मंडळीच्या सभांना उपस्थित राहतात आणि त्यांचे काही पैसे परमेश्वराच्या कामासाठी देतात. असे विश्वासणारे लोक कोणत्याही ऐहिक व्यावसायिकाप्रमाणेच स्वत:चा दिलासा आणि नफा शोधत देवाबरोबर व्यवसाय करत आहेत.

याकोबाने आपल्या आयुष्याची २० वर्षे पृथ्वीवरील गोष्टी बळकावण्यात घालवली. त्याने लाबानाच्या कुटुंबातून स्वतःसाठी पत्नी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला दोन मिळाल्या! त्याला दोन नको होत्या, पण तरीही त्याला दोन मिळाल्या !! मग त्याने लाबानाला फसवले आणि त्याच्या मेंढ्या मिळवल्या आणि अशा प्रकारे तो खूप श्रीमंत माणूस बनला. तो लाबानच्या घरी दरिद्री गेला होता, पण तिथे तो एक अतिशय श्रीमंत माणूस म्हणून बनला. आज अनेक विश्वासणारे लोक जसे आपल्या समृद्धीचे श्रेय देवाच्या आशीर्वादाला देतात, तसेच त्याने ही गोष्ट दिली यात शंका नाही!! पण "देवाच्या आशीर्वादाची" खरी खूण काय आहे? समृद्धी आहे का? नाही. त्याचा अर्थ आपले रूपांतर ख्रिस्ताच्या प्रतिरूपात करायचे आहे. जर तुमचे आयुष्य अजूनही देवासाठी आणि माणसासाठी निरुपयोगी असेल तर चांगली नोकरी, चांगले घर आणि अनेक सुखसोयी असण्याचा काय उपयोग आहे? पण देवाने याकोबाशी व्यवहार पूर्ण केला नव्हता. पनीएल येथे तो त्याला दुसऱ्यांदा भेटला.

मी तुम्हाला सांगू इच्छितो, माझ्या बंधू-भगिनींनो, तुमच्यापैकी अनेकांना देवाशी दुसऱ्या भेटीची गरज आहे - एक भेट जी तुम्ही तुमच्या आयुष्यात अगदी खालच्या थराला पोहोचल्यावर होईल - आणि जेव्हा देव, तुमचा न्याय करण्याऐवजी आणि नरकात पाठवण्याऐवजी, तुम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याने भरतो!

आम्ही उत्पत्ति ३२ मध्ये वाचतो की याकोब घाबरलेला होता कारण त्याने नुकतेच ऐकले होते की एसाव (ज्याची त्याने २० वर्षांपूर्वी ज्येष्ठपणाच्या हक्काची फसवणूक केली होती) त्याला भेटण्यासाठी येत आहे. एसाव त्याला ठार करेल याची त्याला खात्री होती. जेव्हा देव आपल्याला घाबरवणाऱ्या काही परिस्थितीचा सामना करण्यास परवानगी देतो तेव्हा हे आपल्यासाठी चांगले असते. कारण, जेव्हा आपल्याला भीती वाटते की मनुष्य आपले काहीतरी करतील, तेव्हा आपण देवाच्या जवळ जाऊ. पनीएल येथे याकोब एकटाच होता (उत्पत्ति ३२:२४). देवाने आपल्याला भेटण्यापूर्वी आपल्याला सर्वप्रथम एकटे व्हावे लागते . म्हणूनच सैतानाने आजच्या जगात जीवन इतके घाईचे आणि व्यस्त (विशेषत: शहरांमध्ये) करण्याचे आदेश दिले आहेत की, अनेक विश्वासणाऱ्या लोकांनाही देवाबरोबर एकांतात घालवायला वेळ मिळत नाही. त्यांचे जीवन इतके व्यस्त झाले आहे की, कमी प्राधान्याच्या (देवासारख्या) बाबी त्यांच्या वेळापत्रकातून पूर्णपणे बाहेर झाल्या आहेत! आजच्या ख्रिस्ती धर्मजगतातील ही शोकांतिका आहे.

त्या रात्री देवाने याकोबाशी अनेक तास झुंज केली, पण याकोबाने हार मानली नाही. ती झुंज मागील २० वर्षांपासून याकोबाच्या आयुष्यात जे काही चालले होते त्याचे प्रतीक होते. आणि जेव्हा देवाने पाहिले की याकोब हट्टी आहे, तेव्हा शेवटी त्याने त्याच्या जांघेचा सांधा निखळवला. त्या वेळी याकोब फक्त ४० वर्षांचा होता आणि तो खूप बलवान माणूस होता. त्याचे आजोबा अब्राहम १७५व्या वर्षापर्यंत जगले होते. तर, आपण असे म्हणू शकतो की, याकूब त्याच्या तारुण्याच्या मुख्य भागात होता, त्याच्या आयुष्याचा ७५% भाग अजूनही त्याच्यापुढे होता. इतक्या लहान वयात जांघेचा सांधा निखळणे ही त्याला हवी असलेली शेवटची गोष्ट असती - कारण यामुळे त्याने त्याच्या भविष्यासाठी केलेल्या सर्व योजना विस्कळीत झाल्या असत्या. आजच्या काळात हे म्हणजे २० वर्षांच्या तरुणाचा जांघेचा सांधा निखळणे आणि त्यानंतर त्याने कायमची कुबडी वापरणे असे आहे !! हा एक विदारक अनुभव असू शकतो. याकोब आयुष्यभर कुबडीशिवाय कधीच चालू शकला नसेल. देवाने याकोबाला मोडण्याचा अनेक मार्गांनी प्रयत्न केला होता पण तो यशस्वी झाला नव्हता; आणि म्हणून शेवटी त्याने त्याला कायमचे शारीरिक अपंगत्व दिले. शेवटी याकोबाला तोडण्यात यश आले.

देवाने याकोबाचा सांधा निखळल्यानंतर तो त्याला म्हणाला, "ठीक आहे, मी माझे काम केले आहे. आता मला जाऊ दे. तुला मी कधीच नको होता. तुला फक्त स्त्रिया आणि पैसा हवा होता." पण याकोब आता देवाला सोडून देणार नव्हता. तो बदलला गेला होता - शेवटी! हा माणूस ज्याने आपले आयुष्य स्त्रिया आणि मालमत्ता हडप करण्यात घालवले होते तो आता देवाला धरून ठेवतो आणि म्हणतो "तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही."(उत्पत्ति ३२:२६).याकोबाचा सांधा निखळल्यावर त्याच्या अंतःकरणात किती मोठे काम झाले, जेणेकरून त्याला आता फक्त देवाचीच इच्छा राहिली. जुन्या म्हणीप्रमाणे, "जेव्हा तुमच्याकडे देवाशिवाय काहीही उरत नाही, तेव्हा तुम्हाला आढळेल की देवच पुरेसा आहे"!! ते खरे आहे. येथे असे म्हटले आहे की याकोबाने त्या ठिकाणाचे नाव "पनीएल" ठेवले कारण त्याने शेवटी देवाचा चेहरा पाहिला होता. बेथेल येथे त्याला देवाच्या घराकडे नेण्यात आले होते. तुम्ही अनेक वर्षे देवाच्या घरात असाल आणि तरीही तुम्ही देवाचा चेहरा पाहिला नसेल. मग तुम्हाला देवाबरोबर दुसऱ्या भेटीची गरज आहे - जिथे तुम्ही त्याचे मुख पाहता. याकोब उत्साहाने म्हणतो, "या ठिकाणी मी देवाला समक्ष पाहिले आहे, तरी माझा जीव वाचला आहे." (उत्पत्ति ३२:३०).