WFTW Body: 

पौल त्या "पवित्रतेबद्दल" बोलतो "ज्यात काही भ्रम नाही आहे" (इफिस. 4:24 - जे.बी. फिलिप्स भाषांतर). हे सिद्धांताच्या समजण्याने येत नाही तर येशू द्वारे, तो जसा जगला तसे जगून ते येते. 1 तीमथ्य 3:16 मध्ये सांगितलेले सुभक्तीचे रहस्य हे येशू आपल्या देहात आला हा सिद्धांत नाही तर तो स्वतः येशू जो आपल्या देहात आला आहे. कोणत्याही सिद्धांताकडे न पाहता येशूकडे पाहण्याने आपण त्याच्या प्रतिरूपात रूपांतरित होणार आहोत (2 करिंथ 3:18). हे आयुष्यभर लक्षात ठेवा.

प्रत्येक सिद्धांत तुम्हाला चुकीच्या मार्गाने नेऊ शकते: (1) जर तुम्ही तुमची नजर फ़क्त प्रभूवर ठेवली नाही, आणि (2) जर तुम्ही त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांवर प्रेम करत नसाल तर, मग ते कोणत्याही गटातले असोत आणि ते कोणत्याही शिकवणीला धरून चालत असले तरी. येशू स्वतः मंडळीचा प्रमुख आहे जे त्याचे शरीर आहे. पण जर एखादी शिकवण प्रमुख बनली, तर लोक परुशी होतील - आणि शिकवण जितकी शुद्ध असेल तितके जास्त परुशी निर्माण होतील! एका गीतातील हे शब्द लक्षात ठेवा: "एकेकाळी आशीर्वाद होता, आता परमेश्वर आहे".

मंडळी म्हणून आपण जी प्रतिमा सादर करतो ती येशूने पित्याच्या सादर केलेल्या प्रतिमेशी सुसंगत असणे आवश्यक आहे - विशेषत: आपण योहान 8:1-12 मध्ये पाहतो, जिथे तो धार्मिक परुश्यांविरुद्ध पश्चात्ताप करणाऱ्या व्यभिचारिणीच्या बाजूने होता. येशूने पृथ्वीवर पवित्रतेच्या सर्वोच्च दर्जाचा उपदेश केला आणि तरीही तो सर्वात वाईट पापी लोकांमध्ये मिसळला (उदा. मग्दालीया मरीया, जिला उठलेल्या प्रभूला पाहण्याचा सर्वात पहिला विशेषाधिकार देण्यात आला होता). त्यानी एकदाही अशा पापींवर टीका केली नाही किंवा त्यांना त्यांच्या भूतकाळाची आठवण करून दिली नाही. येशूने ज्या पवित्रतेचा उपदेश केला त्याच दर्जाचा प्रचार करने, आणि सर्वात वाईट पापी लोकांशी आणी मागे घसरणाऱ्या (निराश होनाऱ्याशी)उदार आणी प्रेमळ राहून त्यांना परमेश्वराकडे जवळ आणणे हे सुद्धा मंडळी म्हणून आपल्याला आवाहन आहे.

आमची मंडळी रुग्णालयासारखी आहे, जिथे सर्वात वाईट परिस्थितीत असलेल्यांचे स्वागत केले जाते. ते सर्व बरे होऊ शकतात. कोणालाही असे वाटण्याची गरज नाही की तो किंवा ती अशा दुर्दैवी अवस्थेत आहे कि आता त्याचे काहीच होऊ शकत नाही. काही मंडळी एखाद्या गटा सारखी (क्लब सारखी) असतात जिथे श्रीमंत आणि आत्मसंतुष्ट एकत्र येतात. पण आम्हाला सर्वात वाईट पापी लोकांसाठी रुग्णालय व्हायचे आहे.

देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास नेहमी झटा. मग तुम्ही कराल त्या प्रत्येक गोष्टीत तुमची भरभराट होईल आणि देव तुमच्यासाठी पराक्रमी विराप्रमाने काम करेल (यीर्मया 20:11). हेच मी माझ्या आयुष्यभर अनुभवले आहे.

देवाचे राज्य शोधणे हा मुख्यतः सुवार्तिक किंवा मिशनरी कार्य करणे असे नाही. याचा अर्थ देवाला तुमच्या जीवनाचा शासक बनवणे, नेहमी देवाच्या अधिकाराखाली जगणे आणि त्याच्या स्वर्गीय मूल्यांना पैसा, जगिक सुख आणि मनुष्याच्या सन्मानावर प्राधान्य देणे होय.

देवाच्या धार्मिकतेचा प्रथम शोध घेणे म्हणजे त्याचा स्वभाव तुमच्या आंतरिक जीवनात आणि तुमच्या बाह्य वर्तनाच्या प्रत्येक भागामध्ये प्रकट व्हावा अशी इच्छा बाळगणे.

ह्या सत्याची तुमचयावर सर्व दिवस पकड राहू दे. आणि जेव्हा तुम्हाला मुले होतील, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांनाही हे सत्य शिकवले पाहिजे, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या जीवनात हाच परिणाम मिळू शकेल. अशा प्रकारे, पिढ्यानपिढ्या परमेश्वराला पृथ्वीवर परत येईपर्यंत साक्षीदार असतील.