WFTW Body: 

आपण भविष्याकडे पाहतो तेव्हा आपल्याला ते आपल्या आयुष्याच्या आतापर्यंत गेलेल्या वर्षांपेक्षा अधिक चांगले असावे असे वाटते. पण, जर आपण देवाच्या वचनांवर दावा केला तरच ते अधिक चांगले असेल. आपण ज्यावर विश्वास ठेवतो ते आपण आपल्या तोंडाने कबूल केलेच पाहिजे – पण आपली कबुली ही देवाच्या वचनांवर आधारित असली पाहिजे (रोमकरांस १०:८-९).

जेव्हा देवाने अब्राहामाला वचन दिले – असे वचन जे पूर्ण होणे अशक्य वाटत होते ( दैहीक दृष्टीने बघितले तर ) – तेव्हा अब्राहामाने काय केले ? विश्वासात दुर्बळ न होता, आपले निर्जीव झालेले शरीर तो सुमारे शंभर वर्षाचा होता व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली परंतु देवाच्या अभिवंचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले; आणी देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासहि समर्थ आहे अशी त्याची पक्की खातरी होती. (रोमकरांस पत्र ४:१९-२१).

म्हणून देवाने दिलेल्या वचनावर विश्वास ठेवून, आपण खाली दिलेले आठ वचन कबुल् करू या. हे स्वतःलाही व त्या सैतानालाही, वारंवार आणि मनापासून सांगा:

1. पिता-परमेश्वराणे जसे येशूवर प्रेम केले तसेच प्रेम तो माझ्यावर करतो.
– म्हणून मी सर्वदा आनंद करीन (योहान १७:२३).

2. देवाने माझे सर्व पाप क्षमा केले आहेत.
– म्हणून मी कधीही अपराधिपणाच्या भावनेत जगणार नाही (१ योहान१:९; इब्री ८:१२).

3. देव मला त्याच्या पवित्र आत्म्याने भरेल.
– म्हणून प्रत्येक कार्यासाठी मी बळकट राहीन (लूक ११:१३).

4. देवाने माझ्या जीवनाच्या सर्व सीमा निश्चित केल्या आहेत.
– म्हणून मी नेहमी समाधानी राहीन (प्रेषितांची कृत्ये १७:२६; इब्री १३:५).

5. देवाच्या सर्व आज्ञा माझ्या भल्यासाठी आहेत.
– म्हणून मी देवाच्या सर्व आज्ञांचे पालन करू इच्छितो (१ योहान ५:३; अनुवाद १०:१३).

6. देव माझ्यावर परिणाम करणाऱ्या सर्व लोकांवर आणि घटनांवर नियंत्रण ठेवतो.
– म्हणून मी नेहमी धन्यवाद देईन (रोमकरांस ८:२८).

7. येशूने सैतानाला पराभूत करून मला त्याच्या सामर्थ्यापासून मुक्त केले आहे.
– म्हणून मी कधीही घाबरणार नाही (इब्री २:१४-१५; इब्री १३:६).

8. देव मला आशीर्वादाचा स्रोत बनवू इच्छितो.
– म्हणून मी इतरांसाठी आशीर्वाद ठरेन (उत्पत्ती १२:२; गलतीकरांस ३:१४).

"विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे." (इब्री ११:६).