प्रामाणिक राहा
मत्तय ५:२८ मध्ये येशू म्हणतो, “ जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे ”. यातून सुटका मिळवण्यासाठी आपल्याला देवाकडे जावे लागेल आणि त्यासाठी पहिली पायरी आहे प्रामाणिक राहणे. जर तुम्हाला राग आला असेल तर प्रामाणिक राहा. ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही चुकीचे वागला आहात त्याच्याकडे जा आणि म्हणा, “भावा, मला माफ कर. मी तुझ्याशी ज्या पद्धतीने बोललो त्याबद्दल मला माफ कर,” आणि जर तुम्ही दिवसातून दहा वेळा रागाच्या भरात पाप केले असेल तर त्या व्यक्तीकडे दहा वेळा जा आणि त्याला माफी मागा. जर देवाला तुम्ही प्रामाणिक आणि नम्र असल्याचे दिसले तर तो तुम्हाला त्यापासून मुक्त होण्याची शक्ती देईल.
पण जर तुम्ही लपवले , सबब सांगितली आणि तुमचे राग करणे कसे योग्य होते हे ठरवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कधीही मुक्त होणार नाही. तुमचा राग तेव्हाच न्याय्य आहे जेव्हा तो स्वतःशी संबंधित नसून केवळ देवाच्या गौरवाशी संबंधित असतो.
जेव्हा स्त्रियांकडे वासनेणे बघण्याच्या बाबतीत असेल तेव्हा तुम्ही कधीही न्याय्य ठरत नाही. तुम्ही तुमच्या पत्नीकडे पाहून तिचे कौतुक करू शकता, पण इतर कोणत्याही स्त्रीचे नाही. ती देवाची इच्छा नाही. देव म्हणतो की तुम्ही याबाबतीत कट्टरपंथी असले पाहिजे. सर्वप्रथम, तुम्ही प्रामाणिक असले पाहिजे आणि म्हटले पाहिजे, " प्रभु, मी व्यभिचार केला आहे." कधीही असे म्हणू नका की, " मी एका सुंदर चेहेऱ्याची प्रशंसा केली ." त्याऐवजी असे म्हणा, "मी व्यभिचार केला आहे ."
जर तुम्ही प्रामाणिक असाल, तर देव तुम्हाला सोडवेल.
कट्टरपंथी असा
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कट्टरपंथी असले पाहिजे. पवित्र शास्त्र म्हणते, " जारकर्माच्या प्रसंगा पासून पळून जा" (१ करिंथकरास पत्र ६:१८). जर तुम्ही संगणकावर काम करत असाल आणि तुम्हाला मोह झाला तर एकतर तेथून निघून जा किंवा ते बंद करा आणि म्हणा, "प्रभु, मी काय गमावतो आहे याची मला पर्वा नाही, पण मी येथे पडू इच्छित नाही." जेव्हा येशू म्हणतो, "जर तुमचा उजवा डोळा तुम्हाला अडखळवतो, तर तो फाडून टाका," तेव्हा तो आपल्याला आपला उजवा डोळा शारीरिकरित्या काढून टाकण्यास सांगत नाही. हे स्पष्ट आहे कारण तुम्ही अजूनही डाव्या डोळ्याने वासना करू शकता. याचा अर्थ असा आहे की तुम्ही पापाबद्दल कट्टरपंथी वृत्ती बाळगली पाहिजे, तुमच्या जीभेबद्दल आणि डोळ्यांबद्दल कट्टरपंथी वृत्ती बाळगली पाहिजे.
तुम्हाला मोह होतो तेव्हा एका आंधळ्या आणि मुक्या माणसासारखे व्हा. एक मुका माणूस आवाज उठवून एखाद्यावर ओरडू शकतो का? एक आंधळा माणूस वासना करू शकतो का? नाही. आंधळ्या माणसासारखे व्हा आणि म्हणा, "प्रभु, तू मला स्त्रियांची वासना करण्यासाठी डोळे दिले नाहीत. तू मला तुझे वैभव पाहण्यासाठी डोळे दिलेस." येशू म्हणतो की जर तुम्ही असे केले नाही, तर तुम्ही तुमच्या शारीरिक अवयवांचे जतन करू शकता, परंतु तरीही तुम्हाला नरकात टाकले जाईल. तुमच्या शरीराच्या एखाद्या अवयवाला गमावणे आणि देवाच्या राज्यात जाणे तुमच्यासाठी चांगले आहे (म्हणजे, तुमच्या शरीराला हव्या असलेल्या पापी सुखांना स्वेच्छेने नकार देणे).
त्याचप्रमाणे, येशू म्हणतो, "जर तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे " (मत्तय ५:३०). कल्पना करा की तुमचा हात कापलेला आहे आणि तुम्ही तुमच्या उजव्या किंवा डाव्या हाताने पाप करू शकत नाही. येशू फार नम्र आणि व्यावहारिक होता. येशू तुम्हाला सांगतो की तुमचे आचरण असे असू द्या की जणू तुम्ही आंधळे आहात, जणू काही तुमच्या शरीराचे भाग कापलेले आहेत, कारण पाप खूप गंभीर आहे. जर आपण असा कट्टरपंथी दृष्टिकोन स्वीकारला तर देव आपल्याला पूर्णपणे मुक्त होण्यास मदत करेल आणि वैवाहिक जीवनही चांगले असेल असा माझा विश्वास आहे.लग्नामुळे वासनेची समस्या सुटेल असे समजू नका. असे बरेच विवाहित लोक आहेत जे सतत त्यांच्या विचारांमध्ये व्यभिचारात पडतात. असे बरेच विवाहित लोक आहेत जे दररोज इंटरनेटवर अश्लील चित्रपट पाहतात. लग्नामुळे ती समस्या सुटत नाही कारण ती एक आंतरिक इच्छा आहे. जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्याच्याशी लढले नाही तर तुम्ही पराभूत व्हाल आणि तुम्ही आयुष्यभर स्वतःला असे भ्रमित कराल की तुम्ही आध्यात्मिक ख्रिस्ती आहात, परंतु तुम्ही तसे नाही आहात.
येशू ज्या ख्रिस्ती शिकवणीबद्दल बोलत आहे ती पदव्युत्तर स्तराची आहे का? नाही, तो फक्त नरकापासून कसे वाचायचे याबद्दल बोलत आहे. नरकापासून वाचणे हा काही पदव्युत्तर ख्रिस्ती अभ्यास नाही. ते प्राथमिक आहे. येशू म्हणतो की तुमचे संपूर्ण शरीर नरकात टाकले जाण्यापेक्षा तुमच्या शरीराचा भाग नष्ट होणे चांगले. नरकपासून मुक्तता ही किमान गोष्ट आहे आणि येशू आपल्याला प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक शिष्याला हेच शिकवू इच्छितो. हे किती शिकवले जात आहे? क्वचितच, आणि म्हणूनच देवाने वैयक्तिकरित्या मला नियुक्त केले आहे की मी माझ्या सेवेत यावर जोर देत राहावे .