लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   तारुण्य
WFTW Body: 

गीतरतन 4:12 मध्ये वर वधूला ‘‘बंद असलेली बाग’’ - केवळ बाग, फक्त वराची बाग, संबोधतो. ती कोणाचीही नाही. ती केवळ त्याच्या स्वामीची आह.

प्रभुसोबत तुमचे नाते असे आहे का? ‘‘तुम्ही माझी वैयक्तिक बाग आहात, केवळ माझीच’’, असे प्रभु तुम्हाला म्हणेल काय? जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्यांच्याकडे आकर्षित करतात - उदा. गरजेपेक्षा अधिक पैसा मिळविण्याची संधी, जगामध्ये सामर्थ्य व नावलौकिक मिळविण्याची संधी व स्वतःचे नाव कमविण्याच्या संध्या, इत्यादी. अशाप्रकारच्या मोहांची तुलना आपण अशा पुरुषासोबत करू शकतो जो आपल्या वधूला वाममार्गाला लावण्याचा प्रयत्न करतो. परंतु, ह्याठिकाणी ही वधू त्याकडे आकर्षित होत नाही. ती केवळ तिच्या प्राणप्रियासोबत जुळते. ती केवळ तिच्या वराचीच आहे.

फारच कमी विश्वासणार्‍यांचे ख्रिस्तासोबत असे नाते आहे. ज्यांचे ख्रिस्तासोबत असे घनिष्ट नाते नाही ते ख्रिस्ताला जवळून जाणू शकत नाही व त्याचे वचन त्यांना समजत नाही.

पवित्र शास्त्र कसे समजेल ह्याचे रहस्य देवासोबत आपले असलेले घनिष्ट नाते होय. त्याच्या वचनाचा अर्थ तोच आपल्याला चांगल्याप्रकारे स्पष्ट करून सांगू शकतो. प्राचीन शिष्य ज्याप्रकारे त्याच्यासोबत चालले तसे तुम्ही चाला व तो जे बोलतो ते ऐकण्याची उत्कंठा बाळगा. तरच त्यांच्यासारखे तुमचे डोळे उघडतील व तुमचे हृदय त्यांच्यासारखे पेटून उठेल. मागील चाळीस व त्याच्यापेक्षाही अधिक वर्षात देवासोबत चालत असतांना हेच मला गवसले आहे.

वधू नंतर उत्तरवायूला व दक्षिणवायूला तिच्या बागेवरून वाहण्यास आमंत्रण देते (4:16). उत्तरवायू हा दुःखाचा, विरोधाचा व परीक्षेंचा थंड वारा आहे तर दक्षिणवायू हा आशीर्वादाचा, प्रोत्साहानाचा, भरभराटीचा व आनंदाचा वारा आहे. यापैकी कोणताही वारा वाहो. परिणाम एकच आहे आणि तो म्हणजे परिमल पसरणे. आपले जीवन आरामदायक व सोपे जीवन असो की ते कठीण समस्या किंवा परीक्षेंनी भरलेले असो, देवाची कृपाच ख्रिस्ताचा परिमल आपल्यामधून दरवळू देईल. देवाचा धन्यवाद, स्तुती व भक्ती आपल्या जीवनाद्वारे येईल, मग परिस्थिती कशीही असो.

‘‘माझा वल्लभ आपल्या बागेत येऊन आपल्या आवडीची फळे सेवन करो’’ (4:16). आपल्या जीवनातील (आपल्या बागेतील) सर्वच उत्पन्न हे प्रभुचे आहे - आपण किती आत्मिक आहोत हे इतर लोकांवर आपला ठसा उमटवण्यासाठी नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाची साक्ष देता तेव्हा तुम्ही किती अद् भुत व्यक्ती आहात असे दाखविण्याचा प्रयत्न करू नका. तर तुमच्याकडे किती अद् भुत तारणारा आहे हे त्यांना स्वतःला दिसू द्या! अन्यथा तुमच्यातील फळे मनुष्यांसाठी होतील प्रभुसाठी होणार नाही. याठिकाणी वधू म्हणते, ‘‘माझ्या बागेतील सर्वकाही केवळ माझ्या प्राणप्रियाचे आहे.’’

एखाद्या व्यक्तीला ख्रिस्ताकडे आणण्यासाठी देवाने तुमचा उपयोग केला आहे का? तुम्ही जे केले त्याविषयी आनंदीत होऊ नका. तर पाप्याने पश्चात्ताप केला म्हणून दूतांसोबत आनंद करा. तो देवाचा परिवर्तित आहे, तुमचा नव्हे. जर तुम्ही देवासाठी त्याग केला असेल तर तो इतरांना कळू देऊ नका. आम्ही आपल्या त्यागांची जाहीरात का करावी? जी पत्नी आपल्या पतीवर खूप प्रेम करते, तिने आपल्या पतिसाठी जो त्याग केलेला असतो त्याविषयी ती जगाला ओरडून सांगते काय? पती पतनीमध्ये अनेक प्रीतीचे गुपीत असतात. आपल्यात व प्रभुतही असे अनेक प्रीतीचे गुपीत असायला हवे. तुम्ही प्रभुसोबत एकट्यात वेळ घालवीत असाल. हे फार चांगले आहे. मग इतरांना हे कां कळावे? आपल्या पतीवर खूप प्रेम करणार्‍या पतनीमध्ये असे कधीच वाटणार नाही की तिने जो वेळ आपल्या पतीसोबत घालविला आहे तो इतरांना कळावा. म्हणूनच येशू आपल्याला म्हणाला की जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपण दार बंद करावे. आपण आपल्या प्रियासोबत जो वेळ घालवितो तो कोणालाही कळू नये.

अशाप्रकारचे ख्रिस्ती लोक फारच कमी प्रमाणात आढळतात. पुष्कळांना असे वाटते की त्यांनी केलेला त्याग व त्यांची सेवा इतरांना कळावी व त्याद्वारे त्यांचे गौरव व्हावे यासाठी ते आसुसलेले असतात. देवासोबत त्यांचे प्रेमळ घनिष्ट नाते नसण्याचा हाच स्पष्ट पुरावा आहे. अशा ख्रिस्ती लोकांसाठी गीतरतन हे फार महत्त्वाचे पुस्तक आहे. मी मनातून देवाला धन्यवाद देतो की जेव्हा माझ्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात झाली तेव्हा देवाने मला सर्वप्रथम ह्या पुस्तकावर अभ्यास करण्यात सहाय्य केले. देवासोबतचे हे प्रेमळ नातेच आपण करीत असलेल्या देवाच्या सेवेचा पाया असायला हवे.