''देवानें पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठीं नव्हे, तर त्याच्या द्वारें जगाचें तारण व्हावें म्हणून पाठविलें'' (योहान 3:17). जेव्हा आपण देवाचे वचन सांगतो किंवा संदेश देतो तेव्हा आपल्या बोलण्यातून आपण लोकांना दोष देऊ नये किंवा त्यांच्यात दोषाची भावना जागृत करू नये.
बायबल सांगते, ''जोपर्यंत 'आज' म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेंकाना प्रतिदिवशीं बोध करा; हेतु हा कीं, पापाच्या फसवणुकीनें तुम्हांतील कोणी 'कठीण होऊं' नये'' (इब्री 3:13). याचा अर्थ असा की आपल्या प्रत्येक संदेशातून आपण विश्वासणार्यांना धीर द्यावा व प्रोत्साहन द्यावे. असे केल्यावरच पापापासून ते तारल्या जातील. परंतु, सैतान आपल्याला फसवितो व आपण विचार करितो की आपल्या संदेशातून आपण लोकांना दोष दिल्यास ते अधिक पवित्र होतील व देवाला समर्पीत होतील. परंतु, ही फसवणूक आहे.
पवित्र आत्मा देवाच्या वचनातून देवाच्या लोकांना पापाबद्दल टोचणी करून देतो. परंतु, त्याच वेळी तो लोकांना धीर सुद्धा देतो. आपण आताच वाचले की देवाने त्याच्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्या द्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविलेदेवाने त्याचा आत्मा मंडळीमध्ये न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर धीर देण्यासाठी पाठविला आहे. देव हा धीर देणारा देव आहे. तो आपल्या आत्म्याला धीर देतो व आपल्यामध्ये आशा उत्पन्न करितो (पाहा रोम 15:5 व 2 करिंथ 1:3,4). न्यायनिवाड्याची सेवा जुन्या कराराची सेवा होय. ती लोकांना आत्मिक मरणाच्या वाटेवर नेते (पाहा 2 करिंथ 3:7-9). नवीन कराराची सेवा जीवनाची सेवा होय. ही सेवा लोकांना नीतिमत्वाच्या वाटेवर नेते
संदेश देत असताना आपण सहज रीतीने लोकांचे पाप उघडे करू शकतो आणि विश्वासणार्यांमध्ये दोषाची भावना जागृत करू शकतोजर आपण असे करितो तर आपण सवे ते अपयशी झालो आहाते कारण असे केल्यास आपण लोकांना दोषी भावनेच्या जाळ्यात अडकवितो. या जाळ्यातून लोक स्वतः सुटू शकत नाहीत.
नवीन वक्ते, ज्यांना अनुभव नाही ते लोकांपुढे पवित्रतेचा अव्यवहारीक मापदडं ठेवितात आणि लोकामधील दोषी भावना जागतृ करितातते असे जीवन जगण्यास सांगतात जे अशक्यच आहे. अशारीतीच्या जीवनाविषयी येशूने व त्याच्या शिष्यांनी देखील शिक्षण दिले नाहीहे वक्ते स्वतः आपल्या संदेशाप्रमाणे जीवन जगत नाहीत. दुर्बळ विश्वासणारे असे संदेश ऐकतात व फार निराश होतात
ख्रिस्ती वर्तुळामध्ये विश्वासणार्यांना मोठमोठे आव्हान दिले जाते. त्यांना सागं ण्यात येते की त्यांनी पूर्णकालीन प्रभूची सेवाच करावी. इतर कामधंदा न करता केवळ प्रभूची सेवा करण्यास प्रकृत्त केले जाते. हा एक दोषी भावनेचा फासच म्हणावे. जगातील वेगवेगळ्या प्रांतांविषयी सांगितल्या जाते ज्या ठिकाणी अद्याप सुवर्ता पोहंचली नाही. एके णार्यांच्या मनात दोषी भावना उत्पन्न केली जाते आणि मग अनके लाके आपली नाके री सोडून पूर्णकालीन सुवार्तीक बनतात. येशूने व त्याच्या शिष्यांनी अशा पद्धतीचा कधीही उपयागे केला नाही. अशा रीतीने येशूने लोकांना सेवेकरिता पाठविले नाही. येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले की त्यांनी जगातील सर्व राष्ट्रांमध्ये जावे व शिष्य बनवावे. येशूने कोणाच्याही मनात दोषी भावना उत्पन्न केली नाही. दोषी भावना उत्पन्न करणारे प्रचारक पाके ळ स्वरूपाचे ख्रिस्ती कर्म्चारी तयार करितात. अनेकांना वाटले की नोकरी करणे चुकीचे आहे म्हणनू त्यांनी नाके री साडे ली व ते सवे के रिता बाहरे पडले. पुष्कळांन तर देवाने सेवेकरिता पाचारण केलेले नसते तरी देखील ते दोषी भावनेमुळे पूर्णकालीन सेवेत येतात. पूर्णकालीन सेवा एक विशेष सेवा आहे. त्याकरिता देवाचे स्पष्ट पाचारण हवे असते.
अनके वेळा दशमांशाविषयी शिक्षण देऊन विश्वासणार्यांच्या मनात दोषी भावना उत्पन्न केली जाते. देवाच्या सवे के रिता आपण दान देत नाही अशी दोषी भावना उत्पन्न करण्याकरिता अनेक प्रयत्न केले जातात आणि लोक प्रचारकांना हजारो रुपये देतात. ख्रिस्ताच्या नावाखाली अनेक प्रचारक लोकांकडून पैसे उकळतात आणि आपली तिजोरी भरतात. येशूने अशी पद्धत वापरली नाही. येशू म्हणाला, ''माझ्यावर तमु ची पी्र ति असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल'' (याहे ान 14:15). त्याने पेत्राला म्हटले, ''योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापक्षां तूं माझ्यावर अधिक प्रीति करितोस तर माझीं कोंकरें चार'' (योहान 21:15-17). जे लोक आनंदाने देवाची आज्ञा पाळतात त्यांच्यावर देव प्रीती करितो (2 करिंथ 9:7).
नवीन करारामध्ये हा देवाचा मार्ग आहे. हा मार्ग स्वातंत्र्याचा आहे, आनंदाने सेवा करण्याचा मार्ग आहे. या मार्गामध्ये दबाव नाही. पवित्र आत्म्याचे सौम्य मार्गदर्शन व प्रचारकांचा दबाव यातील भिन्नता आपल्याला कळावी. जेव्हा दुष्ट आत्मा कोणाला धरितो तेव्हा तो मनुष्य स्वतंत्र नसतो. दुष्ट आत्मा त्याचे नियंत्रण करितो. लोक दुष्ट आत्म्याने ग्रस्त होतात, परंतु, पवित्र आत्मा कोणालाही ग्रस्त करीत नाहीपवित्र आत्मा विश्वासणार्यांना भरतो. पवित्र आत्मा निवड करण्याचे आपले स्वातंत्र हिरावून घेत नाही. आपण पवित्र आत्म्याने भरल्यावर देखील आपल्याला निवड करण्याचे पूर्ण स्वातत्रं असते. सॆतानाप्रमाणे पवित्र आत्मा आपल्यावर दबाव आणीत नाही. परंतु, अनके प्रचारक असे करताना दिसतात.
दोषी भावना उत्पन्न करणारे संदेश आपण ताबडताबे आळे खावे व त्यांचा नकार करावा. पवित्र आत्म्याच्या स्वातंत्र्यांत आपल्याला वाटचाल करायची असल्यास आपण दबाव आणणारे संदेश ऐकू नये.
नवीन कराराचा दास म्हणजे काय हे मला पूर्वी कळत नव्हते तेव्हा मी सुद्धा नीतिनियमानचे चालत असे. मी लोकांच्या मनात दोषी भावना उत्पन्न करीत होतो;परंतु, सत्य कळल्यावर मी पश्चाताप केला आणि ही वाइर्ट सवय कायमची साडे ली. ''मी मलू होतों तेव्हां मुलासारखा बाले तं असें मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत; आतां प्रौढ झाल्यावर मीं पारे पणाच्या गोष्टी साडे नू दिल्या आहते'' (1 करिंथ 13:11). दोषी भावना उत्पन्न करणारे संदेशा लोकांना बंदिस्त करतील. येशू व पवित्र आत्मा लोकांना मुक्त करण्याकरिता आला.
जो प्रचारक संदेशातून दबाव आणितो तो नियम केंदी्र त आहे. त्याला ह्याची जाणीव नसते. जुन्या कराराच्या आत्म्याद्वारे नवीन कराराचा संदेश सांगणारे अनेक प्रचारक आहेत. त्यांना वाटते की ते नवीन करार सांगत आहेत; परंतु, सैतानाने त्यांना फसविले असते. ते नवीन कराराच्या आत्म्याने नवीन कराराचा संदेश सांगत नाहीत. नवीन कराराचा संदेश आत्म्याचा संदेश आहे. येशू जे शब्द बोलला ते शब्द आत्मा आणि जीवन होते (योहान 6:63). आत्म्याची सेवा ही बळजबरीची किंवा न्यायनिवाड्याची सेवा नाही. आत्म्याची सेवा ही धीर देण्याची व आशा उत्पन्न करण्याची सेवा असते. देव आपल्याला उंच्च करितो. तो आपल्याला वाकवीत नाही (स्तोत्र 3:3). आपण देवाची आज्ञा पाळावी म्हणून तो आपल्याला बळजबरी करून लज्जीत करीत नाही. विद्यार्थ्याने आज्ञा पाळाव्या म्हणनू शाळेतील शिक्षक विद्यार्थ्याला सवार्सं मारे शिक्षा करतात व अपमानीत करतात. परंतु, आपला प्रेमळ पिता असे कधीही करणार नाही. देवाची इच्छा आहे की आपण आनंदाने त्याची आज्ञा पाळावी. पिता आपल्या मुलांना धीर देतो (1 करिंथ 4:14,15). आपल्या कळपापती असलेल्या आपल्या वृत्तीतून दिसते की आपण शिक्षक आहोत की पिता आहोत. आपल्या मंडळ्यांना शिक्षकांची नव्हे तर वडील जनांची गरज आहे.
नियमशास्त्राचा न्यायनिवाडा आणि पवित्र आत्म्याचा बोध यातील भिन्नता आपल्याला कळावी. आपल्या मनात दोषी भावना उत्पन्न करणारे प्रचारक आपल्याला निराश करितात. म्हणून आपण आत्म्याच्या प्रेरणेने स्वतंत्र जीवन जगू शकत नाही व विजयी होऊ शकत नाही
जो प्रचारक संदेशातून न्यायनिवाडा करितो व आपले दोषच दाखवितो तो प्रभूला ओळखीत नाही. त्याला पवित्र आत्म्याचा मार्ग माहिती नसतो. त्याला बायबलचे फारच कमी ज्ञान असते. तो अप्रामाणिक असतो कारण स्वतःच्या संदेशाप्रमाणे वागण्यास तो स्वतः असमर्थ असतो. येशूने आधी आचरण केले आणि मग शिक्षण दिले (प्रेषित 1:1). परंतु, दोषी भावना उत्पन्न करणारे प्रचारक परुश्यांप्रमाणे आहेत. ''कारण ते सांगतात पण तसें आचरण करीत नाहींत. जड अशीं ओझीं बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु तीं काढण्यास तें स्वतः बोटहि लावावयाचे नाहींत'' (मत्तय 23:3-4).
दोषी भावना उत्पन्न करणार्या प्रचारकासोबत खरी मैत्री करणे अशक्यच आहे कारण तो आत्म्याने दीन नसतो. ''जे आत्म्यानें 'दीन' ते धन्य, कारण स्वर्गाचें राज्य त्यांचें आहे'' (मत्तय 5:3). दीन लोक स्वतःला अपात्र समजतात व लीन समजतात. असे फार थोडे प्रचारक आहेत जे स्वतःला अपात्र समजतात. फार थोडे प्रचारक नम्र असतात. अनेक प्रचारक स्वतःला विशेष समजतात. सर्व साधारण विश्वासणार्यांपेक्षा ते स्वतःला श्रेष्ठ समजतात. अशा प्रचारकांकडून आपल्याला कोणताच आत्मिक लाभ प्राप्त होत नाही. अशा गर्विष्ठ लोकांकडे सार्वकालिक मोलाचे काहीच नसते. त्यांना दोषी देणाय्रा सैतानाचा रागे जडलेला असतो. ते स्वतःला संदेष्टे समजतात; परंतु, त्याच्या ठायी संदेष्टचांमधील करुणा नसते. अशा प्रचारकांना स्वर्गाचे राज्य प्राप्त होऊ शकत नाही (मत्तय 5:3). ते लोकांन स्वातंत्र्याच्या मार्गावर नेऊ शकत नाही. ते ख्रिस्ताच्या शरीराची बांधणी करू शकत नाही. ते कवे ळ स्वतःच्या चाकोलीतील मंडळी तयार करितात. अशा खोट्या शिक्षकांपासून प्रभू आपल्याला सुरक्षीत ठेवो.
मी बघितले आहे की तरुणांमध्ये फार लवकर दोषाची भावना उत्पन्न होते. परंतु, मी असे देखील बघितले की जे तरुण या दोषी भावनेपासून दूर असतात आणि कृपेमध्ये वाढू इच्छितात ते पुढे चालून मंडळीचे वडील बनतात.
म्हणून आपण सुद्धा इतरांच्या मनामध्ये दोषी भावना उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू नये व कोणाला तशी परवानगीही देऊ नये. आपण नियम केंद्रीत शिक्षक होतो. आता आपण पश्चाताप करून पित्याच्या स्वभावाचे होण्याचा प्रयत्न करावा. प्रभुचे गौरव येशूच्या जीवनातून व शब्दातून व्यक्त होणार्या कृपेत व सत्यात पूर्णपणे स्पष्ट दिसते (योहान 1:14). आपल्या जीवनाद्वारे देखील प्रभूचे गौरव स्पष्टपणे व पूर्णपणे दिसून येवो. आमेन