WFTW Body: 

तुमच्या जीवनाकरता असलेली देवाची परिपूर्ण योजना पूर्ण करणे यापेक्षा काहीही मोठे तुम्ही पृथ्वीवर साध्य करू शकत नाही. माझी अशी प्रार्थना आहे की, देव एक दिवस तुम्हाला त्याच्या हातातील साधन म्हणून वापरेल आणि तुमचे जीवन आणि श्रमांद्वारे जगाच्या एखाद्या भागात आपली मंडळी बांधील. तुमचे शिक्षण आणि व्यवसाय हे केवळ उपजीविकेचे साधन आहे - जेणेकरून तुम्हाला तुमच्या भौतिक गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. पण तुमच्या जीवनातील पाचारण म्हणजे देवासाठी जगणे. त्यामुळे तुमच्या व्यवसायाला तुमची मूर्ती बनवू नका.

देवाने तुमच्या पृथ्वीवरील जीवनाच्या प्रत्येक तपशिलाची योजना आधीच केली आहे. त्यात तुमचे शिक्षण - तुम्ही ज्या शाळेत आणि महाविद्यालयात प्रवेश घेणार होता, त्या शाळा आणि महाविद्यालयातील अभ्यासक्रमाचाही समावेश होतो. तो या सर्वांत सार्वभौमपणे इतर गोष्टी बाजूला सारतो आणि हे सुनिश्चित करतो की तुम्ही शेवटी योग्य व्यवसायाकडे जावे म्हणून मार्गदर्शन करतो. तर एखाद्या परिस्थितीत, आपण सर्वतोपरी प्रयत्न करूनही, आपल्याला अपेक्षित असलेले किंवा हवे असलेले अभ्यासक्रम किंवा मोकळ्या वाटा मिळाल्या नाहीत तर केवळ परमेश्वराची स्तुती करा. अनेक वर्षांनंतर तुम्हाला समजेल की देव तुमच्याकडे पाहत होता आणि तुमच्या जीवनाच्या तपशिलांवर सार्वभौमपणे नियंत्रण ठेवत होता (जरी तुम्हाला ते माहिती नव्हते ) आणि त्याने तुमच्यासाठी ज्या प्रकारे कार्य केले ते खरोखरच तुमच्यासाठी देवाचे सर्वोत्तम होते (रोम ८:२८). देवाच्या या वचनावर विश्वास ठेवून जगा.

तुमच्यासाठी देवाचा मुख्य उद्देश हा आहे की, तुम्ही त्याचे साक्षीदार व्हावे - येशूचे जीवन प्रकट करून - येथे पृथ्वीवर. त्यामुळे तुमच्या महत्त्वाकांक्षांना कधीही भौतिक बनू देऊ नका. आयुष्याला गांभीर्याने घ्या. देवाच्या परिपूर्ण इच्छेचा शोध घ्या. जीवन अशा प्रकारे जगा की, जेव्हा तुम्ही न्यायाच्या दिवशी शेवटी परमेश्वरासमोर उभे राहता, तेव्हा तुम्ही ज्या प्रकारे जगलात त्याबद्दल तुम्हाला पश्चात्ताप होणार नाही. त्या शेवटच्या दिवशी महाविद्यालयातील जीपीए ['(ग्रेड पॉइंट अॅव्हरेज ) -सरासरी अंक श्रेणी]' महत्त्वाचा नसेल, तर 'देवाची स्तुती आणि मान्यता(गॉड्स प्रेज अँड अप्रूव्हल) महत्वाचा असेल (१ करिंथ ४:५). आपले त्यातील गुण ही एकमेव गोष्ट असेल जी तेव्हा महत्त्वाची असेल.

देव आपल्या जीवनाची योजना अशा अद्भुत पद्धतीने करतो. हीच गोष्ट मला माझ्या स्वत:च्या आयुष्यात पुन्हा पुन्हा सापडली आहे, ज्यामुळे मला येत्या काही दिवसांत त्याच्या सेवेला माझे जीवन अधिक मनापासून देण्याची इच्छा निर्माण झाली आहे, "जो कोकरा वधला गेला त्याच्या दुःखाचे प्रतिफळ त्याच्यासाठी जिंकावे म्हणून". १८ व्या शतकातील मोरावियन ख्रिस्ती लोकांचे (सध्याचे चेकोस्लोव्हाकिया) हे ब्रीदवाक्य होते, ज्यांचा पुढारी काउंट झिंझेंडॉर्फ होता.

देवाने तुमच्या जीवनाकरता जी परिपूर्ण योजना आखली आहे ती कोणत्याही पृथ्वीवरील पात्रतेच्या अभावामुळे अडथळा आणू शकत नाही. त्याची पूर्ती केवळ तुमच्या मनाची नम्र वृत्ती आणि विश्वास असण्यावरच अवलंबून असते. तर मग ते सद्गुण तुमच्यात सदैव असो.

आपल्यापैकी कोणीही मूर्खपणाच्या चुका न करता आपले जीवन जगू शकलेले नाही. परंतु मी माझ्या स्वत:च्या जीवनातून साक्ष देऊ शकतो की, आपण केलेल्या अनेक मूर्खपणाच्या गोष्टींकडे देव दुर्लक्ष करतो, जेव्हा आपण आपले पाप मान्य करण्याइतपत नम्र असतो, इतरांना दोष देत नाही आणि विश्वासाने म्हणतो, "प्रभु, मी जे काही केले आहे ते असूनही, मी तुझ्या दयेवर विश्वास ठेवतो की, तू माझ्या जीवनाची तुझी योजना पूर्ण करशील". पुष्कळ विश्वासणारे लोक हे शब्द कधीच परमेश्वराला बोलत नाहीत कारण ते आपल्या अपयशामुळे इतके निरुत्साही होतात आणि देवाच्या दयेवर भरवसा ठेवत नाहीत. अशा रितीने ते देवाच्या सार्वभौम सामर्थ्य व दयेपेक्षा आलेल्या अपयशाचे उदात्तीकरण करण्याद्वारे देवाचा अनादर करतात. तुम्ही देवावर भरवसा ठेवला पाहिजे आणि त्याच्या महान दयेचे गौरव केले पाहिजे. मग तुमच्याबरोबर खरोखरच चांगले होईल - प्रत्येक वर्ष मागील वर्षापेक्षा चांगले असेल.