लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   मंदिर नेता
WFTW Body: 

प्रकटीकरण 3:7 मध्ये देवाने स्वतःविषयी सांगताना म्हटले की तो दार उघडू शकतो व बंद देखील करू शकतो. (फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिहीः जो पवित्र व सत्य आहे, त्याच्यावळ 'दावीदाची किल्ली आहे ज्यानें उघडल्यावर कोणी बंद करणार नाहीं आणि ज्यानें बंद केल्यावर कोणी उघडणार नाहीं,' तो असें म्हणतो).

जर आपण विजय मिळविणारे आहोत तर आपण कधीही बंद दारापुढे उभे राहणार नाही, जर देवाची इच्छा असेल की आपण आत जावे

परंतु, काही वेळा देव आपल्यापुढील दारे बंद देखील करतो; जेणेकरून आपण अशा वाटेवर चालू नये जी वाट देवाने आपल्याकरिता नेमली नाहीआपल्य ाकरिता जे मार्ग हिताचे नाहीत त्या मार्गांवर तो आपल्याला नेत नाही.

विजय मिळविणारे जीवन खरोखर अद्भुत असते. आपण कोणत्या दाराने जावे याविषयीचा निर्णय खुद्द प्रभू घेतो. आपण कोणते दार ठोकू नये याविषयीचा निर्णय देखील प्रभुच्या हातात असतो.

योनाच्या पुस्तकामध्ये आपण बघतो की देवाने एक दार बंद केले व दुसरे दार उघडले. देवाने त्या जहाजामध्ये योनासाठी जागा ठेवली नाही आणि योनाला बाहेर फेकण्यात आले तेव्हा देवाने माशाच्या पोटाचे दार उघडले. जेव्हा मासा इस्राएलाच्या किनार्यावर आला तेव्हा देवाने पुन्हा एकदा माशाचे तोंड उघडले जेणेकरून दासाला तीरावर पोहंचता यावे. अशाप्रकारे देवाने योनाला त्याच्या सुनियोजीत ठिकाणी पोहंचविले. देवाने पुन्हा एकदा योनाला निनवेला जाण्यास सांगितले. त्याठिकाणी योनाने देवाचा संदेश लोकांना सांगायचा होता. आता यावेळी योना निनवेला गेला.

जर देवाची इच्छा आहे की आपण विशिष्ट ठिकाणी विशिष्ट काम करावे तर तो काही दारे बंद करितो व दुसरी दारे उघडतो. तो अयोग्य दारे बंद करून योग्य दारे उघडतो. योग्य ठिकाणी पोहंचविण्याचे साधन देखील त्याच्याकडे असते. देव आपल्यासाठी हे सर्व करितो जेणेकरून आपल्या जीवनात उत्तम ते घडावे. देवाने योनासाठी जे केले ते तो आपल्यासाठी करील. कदाचित तो आपल्यासाठी त्यापेक्षाही अधिक करील.

प्रत्य के दाराची चाबी दवे ाच्या हातात आह.े जर तुम्ही प्रभुचे समपिर्त शिष्य आहात व जीवनाप्रती जगिक महत्वकाक्ष्ं ाा बाळगत नाही व देवाला गारै वू पाहता तर तुम्हाला एका गोष्टीची नक्की खात्री आहे - तुमच्या वाटेवर आडभिंत उभी होणार नाही. तुम्ही योग्य मार्गावर चालत असता तुमच्यासाठी दारे आपोआप उघडत जातील. देवाची इच्छा पूर्ण करण्याच्या तुमच्या वाटेवरील सर्व बंद दारे उघडत जातील. तुम्ही बंद दाराजवळ जाल आणि दार उघडले जाईल. तो योग्य वेळी प्रत्येक दार उघडतो. तो फार लवकर दार उघडीत नाही किंवा फार उशीरा दार उघडीत नाही. तो योग्य वेळी दार उघडतो. तुमच्या जीवनाद्वारे त्याची परिपूर्ण इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तो अशी दारे तुमच्याकरिता बंद करितो ज्या दारातून तुम्ही गेल्यास तुमच्याकडून त्याची इच्छा पूर्ण होणार नाही.