लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   पुरूष
WFTW Body: 

शिक्षा करण्याकरिता देवाने आज्ञा केली होती की कनानमधील लोकांना जिवे मारावे. ही शिक्षा सदोम व गमोरातील लोकांना झाली तशीच होती. त्याचप्रमाणे अशीच शिक्षा नोहाच्या दिवसातील लोकांना सुद्धा झाली. नोहाच्या दिवसांमध्ये संपूर्ण जग लैंगिक पापाने भ्रष्ट झाले होते (उत्पत्ती 6:11). कनानी लोक सुद्धा लैंगिक पापाने भ्रष्ट झाले होते व सैतानाची भक्ती करीत होते. म्हणूनच, ''देशाने आपल्या रहिवाशांचा त्याग केला'' (लेवीय 18:24,25). देवाने कनानी लोकांचा नाश केला त्यामागील कारण अनुवाद 9:4 व 18:10-12 मध्ये आपल्याला स्पष्टपणे सांगितले आहे. ज्या राष्ट्रामध्ये राष्ट्राला भ्रष्ट करणार्या8 गोष्टी असतात त्या गोष्टींद्वारे इतर लोक भ्रष्ट होऊ नये व प्रभावीत होऊ नये म्हणून देव भ्रष्ट झालेल्या लोकांना शिक्षा करितो, तिथून काढून टाकतो किंवा त्यांचा नाश करितो.

देव राष्ट्रातील काही लोकांचा याकरिता नाश करितो कारण देवाची लोकांवर प्रीती आहे. संपूर्ण शरीर सडल्या जाऊ नये म्हणून सडलेला पाय काढून टाकण्याप्रमाणे हे आहे. जो डॉक्टर रूग्णाला वाचवू पाहतो तो त्या रूग्णाचा सडलेला पाय काढून टाकितो. डॉक्टरला त्या रूग्णाची काळजी असते. जेव्हा देव राष्ट्रातील भ्रष्ट लोकांना काढून टाकतो तेव्हा देव राष्ट्रावरील आपले प्रेम व्यक्त करीत असतो. महाजलप्रलयाच्या वेळी देवाने सर्व लोकांचा नाश केला व ही देवाची कृती प्रेममय होती. जगातील पुढील पिढीने पूर्णपणे सैतानाच्या नियंत्रणात असू नये म्हणून मानव जातीला राखण्याकरिता देवाने महाजलप्रलय आणला (उत्पत्ती 6:2 मध्ये 'देवपुत्रांचा' उल्लेख आहे. हे देवपुत्र देवाने निर्माण केलेले दूत आहेत ज्यांचे पतन झाले). प्रेषित पौलाने एका व्यक्तीला अंध केले कारण तो लोकांना पथभ्रष्ट करीत होता (प्रेषित 13:8-12). मी ऐकले आहे की काही लोकांनी देवाकडून आलेल्या संजीवनाचा विरोध केल्यामुळे त्यांना मरावे लागले. म्हणून यहोशवामध्ये आपण वाचतो तो कनानी लोकांचा खून किंवा घात नाही तर ती जगाची शस्त्रक्रिया आहे.

अनेक वर्षांपूर्वी जेव्हा अब्राहाम कनानमध्ये राहत होता तेव्हा तिथे कनानी लोक होते. तेव्हा देवाने कनानी लोकांचा नाश केला नाही. देवाने अब्राहामाला सांगितल्याप्रमाणे दवे ाने चारशे वर्षे वाट बघितली जेणके रून कनानी लाके ांचे पाप टिकनू न्यायाप्रत पाहे ंचले . तावे र कनानी लाके ांचे पाप पूर्ण पिकले नव्हते (उत्पत्ती 15:16). आंबे पिकल्यावर आपण ते तोडतो. न्याय करावा म्हणून देव सुद्धा मानवाचे पाप पिकण्याची वाट बघतो. सदोम व गमोराचे पाप पिकल्यावर देवाने त्या शहरांचा नाश केला. त्याचप्रमाणे देवाने कनानी लोकांचा सुद्धा नाश केला.

इस्राए ली लोकांनी कनान काबीज करून 700 वर्षे लोटल्यावर इस्राएली लोकांनी सुद्धा कनानी लोकांप्रमाणे पाप केले. तेव्हा देवाने इस्राएली लोकांना सुद्धा बाहेर काढले. अश्शूरी लोकांनी इस्राएली लोकांवर विजय मिळवून कनान काबीज केले. 125 वर्षांनंतर दक्षिण राज्य यहूदाने देवाच्या संदेष्ट्यांच्या संदेशाचा नकार केला व त्यांचे पाप सुद्धा न्याकरिता पिकले. त्यावेळी देवाने बाबेलच्या लोकांना पाठवून यहूदाचा नाश केला. देव भेदभाव करीत नाही. कनानी लोक असो, इस्राएली लोक असो वा यहूदाचे लोक असो, तो सर्वांवर सारखीच शस्त्रक्रिया करितोदेव आपल्यावर देखील अशीच शस्त्रक्रिया करणार. देव तुमच्यावर प्रीती करितो म्हणून तो तुम्हामध्ये पनपत असलेल्या पापाकडे दुर्लक्ष करणार नाही. एखादा बाप आपल्या लेकरांच्या आजाराकडे दुर्लक्ष करीत असेल तर समजावे की तो लेकरांवर प्रीती करीत नाही.