लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

उत्पत्ति ३७, ३९ या अध्यायांमध्ये आपण असे वाचतो की योसेफ देवभीरू मुलगा होता आणि म्हणून सैतानाने त्याचा द्वेष केला. आणि म्हणूनच सैतानाने त्याच्या मोठ्या बांधवांना त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी चिथावले. पण देवाने ते योसेफाचा जीव घेणार नाहीत याची काळजी घेतली. मात्र, त्यांनी त्याला काही इश्माएली व्यापाऱ्यांना विकण्यात यश मिळवले. पण त्या व्यापाऱ्यांनी योसेफाला कुठे नेले असे तुम्हाला वाटते? अर्थातच इजिप्तला! देवाच्या योजनेच्या पहिल्या पायरीची ही पूर्णता होती! इजिप्तमध्ये योसेफाला पोटीफराने विकत घेतले. हीदेखील व्यवस्था देवाने केली होती. पोटीफराची पत्नी एक दुष्ट स्त्री होती. योसेफ तिला आवडल्याने तिने त्याला वारंवार आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. शेवटी, ती यशस्वी होऊ शकत नाही हे जेव्हा तिला कळले तेव्हा तिने योसेफावर खोटा आरोप केला आणि त्याला तुरुंगात टाकले. पण योसेफाला तुरुंगात कोण भेटले असे तुम्हांला वाटते? फारोचा प्यालेबरदार! योसेफाची भेट व्हावी म्हणून देवाने फारोच्या प्यालेबरदारालाही त्याच वेळी तुरुंगात टाकण्याची व्यवस्था केली होती. देवाच्या योजनेतील ती दुसरी पायरी होती. फारोच्या प्यालेबरदाराला दोन वर्षे योसेफाचा विसर पडण्याची परवानगी देणे ही देवाची तिसरी पायरी होती. "तथापि प्यालेबरदारांच्या नायकाने योसेफाचे स्मरण ठेवले नाही; तो त्याला विसरला. पुरी दोन वर्षे लोटल्यावर फारोला स्वप्न पडले…. तेव्हा प्यालेबरदारांचा नायक फारोला म्हणाला….."(उत्पत्ति ४०:२३; ४१:१,९). देवाच्या वेळापत्रकानुसार योसेफाची तुरुंगातून सुटका होण्याची ही वेळ होती. स्तोत्र १०५:१९, २० म्हणते: "त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखले." योसेफ आता ३० वर्षांचा होता. देवाची वेळ आली होती. आणि म्हणून देवाने फारोला एक स्वप्न दाखविले. आणि देवाने प्यालेबरदारालाही आठवण करून दिली की, योसेफ हा त्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगणारा होता . अशा रितीने योसेफ फारोसमोर आला आणि तो इजिप्तचा दुसरा शासक बनला. योसेफाच्या जीवनातील घटनांची देवाची वेळ अधिक परिपूर्ण असू शकली नसती! देवाने जशी व्यवस्था केली तशीच व्यवस्था करण्याचा विचार आपण कधीच केला नसता. योसेफाच्या जीवनाचे नियोजन करण्याचा अधिकार आपल्याला असता तर कदाचित आपण लोकांना त्याचे कोणतेही नुकसान करण्यापासून रोखले असते. पण देवाने ज्या पद्धतीने केले ते अधिक चांगले होते. लोक आपल्याला जे वाईट करतात ते देवाचे उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्याकरता आपल्यासाठी वळवले जाते तेव्हा हा एक मोठा चमत्कार आहे! सैतानावर डाव उलटवताना देवाला खूप आनंद होतो, जेणेकरून त्याच्या निवडलेल्यांच्या भल्यासाठी सर्व काही एकत्र काम करते.

निर्गमाच्या पहिल्या अध्यायात आपण असे वाचतो की इस्राएल लोक गुलाम असूनही त्यांच्यामुळे फारो अस्वस्थ होता. त्यांची संख्या वाढत चालली होती आणि शेवटी ते त्याच्याविरुद्ध बंड करतील आणि त्याच्यासाठी काम करणे बंद करतील अशी त्याला भीती वाटत होती. म्हणून त्याने एक आदेश दिला की इस्राएली लोकांनी जन्म दिलेल्या सर्व पुरुष मुलांना ताबडतोब ठार मारले पाहिजे. आता ती योजना सैतानापासून सुरू झाली. यहुद्यांना ठार मारण्यासाठी सैतान नेहमीच त्यांच्या मागे राहिला आहे- मानवी इतिहासात अनेकदा. अशा प्रकारच्या प्रसंगाची ही पहिलीच वेळ होती. फारोने सर्व नर बाळांना ठार मारले पाहिजे असा आदेश दिल्यामुळे मोशेच्या आईने मोशेला एका छोट्याशा टोपलीत ठेवले आणि देवाला प्रार्थना करून नदीत सोडून दिले. जर असा दुष्ट हुकूम नसता तर तिने असे कधीच केले नसते. पण तिने तसे केल्यामुळे मोशेला फारोच्या मुलीने उचलले आणि तो फारोच्या राजवाड्यात लहानाचा मोठा झाला- जिथे त्याला त्याच्या आयुष्याची पहिली ४० वर्षे प्रशिक्षण देण्याची देवाची इच्छा होती. फारोने तो दुष्ट आदेश दिला नसता तर असे कधीच घडले नसते, कारण त्या काळात मोशे आणखी एक दास बनला असता. सैतान जे करतो त्यावरून देवाचे उद्देश कसे पूर्ण होतात हे तुम्ही पाहता का?

एस्तेरच्या पुस्तकात आपण वाचतो की देवाने यहुद्यांचा वंश ठार मारण्यापासून कसे वाचवले. पण देवाने हे कसे केले हे पाहून आश्चर्य वाटते - एका छोट्याशा घटनेच्या माध्यमातून- राजा एका रात्री झोपू शकला नाही. हामान आणि त्याची पत्नी सर्व यहुद्यांचा नाश करण्याचा प्रारंभ म्हणून दुस-या दिवशी सकाळी मर्दखयला फाशी देण्यासाठी राजाची परवानगी मिळवण्यासाठी एका रात्री कट रचत होते. पण हामान आणि त्याची पत्नी आपल्या दुष्ट योजना आखत असताना देव मर्दखयच्या वतीनेही काम करत होता. "पाहा, इस्राएलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही."(स्तोत्रसंहिता १२१:४ ) देवाने राजाला त्या रात्री झोपण्यापासून रोखले. "त्या रात्री राजाची झोप उडाली; तेव्हा त्याच्या आज्ञेने इतिहासाचा ग्रंथ आणून लोकांनी त्याच्यापुढे वाचला"(एस्तेर ६:१)" राजाने दिवस उगवू लागेपर्यंत कित्येक तास आपल्या राष्ट्राचा इतिहास ऐकला. मग वाचन त्या ठिकाणी आले जिथे असे नोंदवण्यात आले की मर्दखयने एकदा राजाला ठार मारले जाण्यापासून वाचवले होते. राजाने आपल्या सेवकांना यासाठी मर्दखयला कोणता सन्मान देण्यात आला आहे असे विचारले आणि त्यांनी उत्तर दिले की, काहीही देण्यात आलेले नाही. देवाची घटनांची वेळ पुन्हा एकदा परिपूर्ण होती. त्याच क्षणी हामान राजाकडे मर्दखयला फाशी देण्याची परवानगी मागण्याची योजना आखत आत आला. हामानाने तोंड उघडण्याआधी राजाने हामानाला विचारले की, राजाला ज्याचा सन्मान करण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी काय करता येईल? राजा त्याचा उल्लेख करत आहे असे त्याला वाटले आणि म्हणून त्याने अशा माणसासाठी एक मोठी सन्मानाची मिरवणूक सुचवली. "जा आणि लवकरात लवकर मर्दखयसाठी ते कर" राजा म्हणाला. आपला देव किती अद्भुत प्रकारे सैतानावर डाव उलटवू शकतो. अखेर हामानाला मर्दखयसाठी बनवलेल्या त्याच खांबावर फाशी देण्यात आले.

पवित्र शास्त्र म्हणते त्याप्रमाणे, "जो खाच खणतो(दुसऱ्यासाठी ) तो (स्वतःच )तिच्यात पडेल, जो धोंडा लोटतो त्याच्यावर तो उलट येईल.(त्याचा चुराडा करण्यासाठी )" (नीतिसूत्रे २६:२७). या कथेत हामान हा एक प्रकारचा सैतान आहे जो नेहमीच आपल्याविरुद्ध काही दुष्टाईचे नियोजन करत असतो. देव त्याला थांबवणार नाही, कारण देवाची योजना अधिक चांगली आहे. त्याला सैतानावर बाजी उलटवायची आहे. सैतान आपल्यासाठी जो खड्डा खोदतो त्यात तो शेवटी स्वतःच कोसळेल. सफन्या ३:१७ म्हणते (एका भाषांतरात ) की देव सतत आपल्या प्रेमात शांतपणे आपल्यासाठी नियोजन करत आहे. त्या रात्री मर्दखय शांतपणे झोपला असताना हामान आणि त्याची पत्नी त्याच्याविरुद्ध करत असलेल्या सर्व दुष्ट योजनांबद्दल अनभिज्ञ होते, पण देवही मर्दखयचे रक्षण करण्याचे योजत होता. त्यामुळे हामानाच्या दुष्ट योजना माहीत असूनही मर्दखय तितक्याच शांतपणे झोपू शकला असता. का नाही? जर देव त्याच्या बाजूने होता तर त्याच्याविरुद्ध कोण टिकू शकेल?

याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे कालवरी - जिथे सैतानाने येशूच्या शत्रूंना त्याला खिळून टाकायला लावले. पण तो क्रूस अशी जागा बनला जिथे खुद्द सैतानाचा पराभव झाला!! सैतानाची योजना त्याच्यावर उलटली- नेहमीप्रमाणे. देवाने येशूसाठी सैतानावर डाव उलटवला. आपण शुद्ध सद्सद्विवेकाने , नम्रतेने जगलो तर तो आपल्यासाठीही असेच करेल. आपले नुकसान करण्यासाठी सैतान आणि त्याचे प्रतिनिधी जे काही करतात ते त्यांच्यावर उलटवला जाईल - आणि आपल्या जीवनासाठी असलेले देवाचे उद्देश पूर्ण होतील.