WFTW Body: 

आपण आपल्या ख्रिस्ती जीवनाचा आलेख काढला तर त्यात चढ-उतार येतील. तसा प्रत्येकाचा अनुभव असतो. परंतु जसजशी वर्षे सरत जातील तसतशी सर्वसाधारण दिशा वरच्या बाजूकडे असावी. चढ-उतार आणि मध्येच पठारावस्था असे आपण हळूहळू वरच्या दिशेने वाटचाल करतो. आपले पडणे कमी वेळा होत जाते आणि पठारे हळूहळू लांब होत जातात. चढ एकापाठोपाठ एक आणि तीव्र असतीलच असे नाही - जरी कधीकधी ते तसे असू शकतात. परंतु सर्वसाधारणपणे चढ अधिक क्रमाक्रमाने होत राहतात. परंतु ज्यांचा विश्वास नाही, किंवा विजयाचा शोध घेत नाहीत, त्यांचा आलेख खाली जात राहील - कारण ते देवाचे भय बाळगत नाहीत किंवा त्याच्या अभिवचनांवर विश्वास ठेवत नाहीत.

पाप गंभीरपणे घ्या आणि प्रत्येक अपयशानंतर शोक करा. अशा प्रकारे तुम्हाला समजेल की तुम्ही खरोखरच देवाचे भय बाळगता. तुम्ही मला असे म्हणताना अनेकदा ऐकले आहे की, आपण पापात पडल्यानंतर शोक करीत नाही ही वस्तुस्थिती आपण पापात पडतो त्यापेक्षा अधिक गंभीर आहे . तुम्ही पापात पडल्यानंतर लगेच पश्चात्ताप करा आणि शोक करा (किंवा कोणत्याही प्रकारे देवाकडे दुःख व्यक्त करा) असे आव्हान जर मी तुम्हाला दिले असेल तर मी माझे कर्तव्य पार पाडले आहे.

आपल्या गरजेपोटी अलीशाकडे आलेल्या विधवेला आपल्या शेजाऱ्यांकडून भांडी उधार घेण्यास आणि तेलाचा लहानसा घडा त्यांच्यात ओतून ते भरण्यास सांगण्यात आले. (२ राजे ४) अशा प्रकारे ती आपले कर्ज फेडू शकली. तिने तसे केले . शेवटी तिची मुले म्हणाली, "आता एकही भांडे उरले नाही". मग आपण "मग तेल वाढायचे थांबले" हे शब्द वाचतो.

येथील तेल हे पवित्र आत्म्याचे चित्र आहे. आणि आत्म्याचा बाप्तिस्मा (आत्म्याने भरणे) अनुभवणाऱ्या पुष्कळांच्या बाबतीत नेमके हेच घडते. ते खऱ्या अर्थाने सुरुवातीला भरले जातात. पण मग त्यांच्यापैकी अनेकांच्या आयुष्यात अशी वेळ येते, जेव्हा गरजेची जाणीवच उरत नाही (आणखी भरण्यासाठी भांडी नाहीत). मग आत्मा त्यांच्या जीवनात वाहत जाणे थांबवतो. ही रिकामी पात्रे आपल्या जीवनातील अशा क्षेत्रांना सूचित करू शकतात जिथे आपण ख्रिस्तासारखे नाही. आपल्या सर्वांच्या आयुष्यात अशी अनेक, अनेक क्षेत्रे आहेत जी अगदी काठोकाठपर्यंत भरण्याची गरज आहे - आणि केवळ अंशतः नाही.

काही क्षेत्रांत, जिथे तुम्हाला पापावर विजय मिळाला असेल, तेथे पात्रे अर्धवटच भरलेली आहेत - कारण ख्रिस्तासारखे असणे (किंवा दैवी स्वभावात सहभागी होणे) पापावरील विजयापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. उदाहरणार्थ, एखाद्याविरुद्ध कटुता न बाळगणे आणि त्याच्यावर प्रीती करणे यात खूप फरक आहे. आधीचे(पापावरील विजय) केवळ नकारात्मक आहे. नंतरचे (दैवी स्वरूप) सकारात्मक आहे. त्याचप्रमाणे राग न येणे आणि आशीर्वाद देणारे चांगले शब्द बोलणे यात खूप फरक आहे. असे इतर अनेक क्षेत्रांतही आहे. एखाद्या क्षेत्रात आपण पापावर मात केली, याने समाधान झाले, तर 'यापुढे पात्रे शिल्लक नाहीत ', अशी कल्पना करून आपण समाधानी राहतो. मग तेल वाहणे थांबते - आणि आपण मागे पडू लागतो.

आपण सतत पश्चात्ताप करून स्वत:चे जीवन जगले पाहिजे आणि इतरांचा न्याय करू नये. आमचे कर्तव्य फक्त हे पाहणे आहे की आपल्याकडे नेहमीच रिकामी भांडी भरण्यासाठी तयार असली पाहिजे. अशा प्रकारेच आपण आपले कर्ज फेडू शकतो (त्या विधवेप्रमाणे). रोम १३:८ मध्ये आपल्या कर्जाचे वर्णन केले आहे - "तुम्ही सर्व माणसांवर प्रीती करण्याबद्दल ऋणी आहात" अशा प्रकारे आपण इतरांसाठी एक आशीर्वाद बनू शकता. प्रत्येक परिस्थिती ही आपल्याला 'स्व'च्या कोणत्या ना कोणत्या क्षेत्रापासून वाचवण्यासाठी आणि आपल्याला इतरांसाठी आशीर्वाद देण्यासाठी तयार केलेली असते. जर आपली स्वतःची रिकामी भांडी आधी भरली गेली नाहीत, तर इतरांना आपल्याद्वारे आशीर्वादित केले जाऊ शकत नाही.