WFTW Body: 

आपल्याला मदत करणारा म्हणून आपण नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे:

(१) आपल्या शरीरातील प्रत्येक वासनेवर विजय मिळवण्यासाठी,
(२) प्रत्येक परीक्षेत आपल्यासाठी त्याचा जो उद्देश आहे तो पूर्ण करण्यासाठी,
(३) प्रत्येक परिस्थितीत मात कारण्यासाठी, आणि
(४) प्रत्येक वाईटावर ख्रिस्ताचे गुण प्रकट करण्यासाठी

मग आपण कधीही निराश होणार नाही.

आपण अविश्वासू पिढीसाठी आणि तडजोड करणार्‍या ख्रिस्ती जगासाठी एक जिवंत साक्ष बनले पाहिजे की स्वर्गात आपला एक प्रेमळ पिता आहे जो आपल्यासाठी चमत्कार करतो. तुमच्या जीवनासाठी देवाची योजना आहे. दिवासेंदिवस जसा तुम्ही त्याचा सन्मान कराल, तेव्हा तुम्हाला ती योजना कळेल. योग्य वेळी, तो तुमच्यासाठी, प्रत्येक क्षेत्रात - संगतीसाठी, नोकरीसाठी, घरासाठी आणि लग्नासाठी (जेव्हा वेळ येईल तेव्हा) तो योग्य दरवाजे उघडेल. जे लोक त्याचा सन्मान करतात मग त्यांचे महाविद्यालयातील त्यांचे गुण कितीही असो, त्यांच्याकडे कितीही प्रभाव किंवा आर्थिक संसाधने नसली तरीही आणि कोणत्याही देशात कितीही मंदी असली तरीही त्यांना प्रत्येक क्षेत्रात सर्वोत्कृष्ट मिळते.

पौगंडावस्थेतील आणि किशोर अवस्थेतील मुलांमध्ये मूर्खपणा खूप सामान्य आहे. केवळ देवाची कृपा तुम्हाला गंभीर चुका करण्यापासून रोखू शकते, ज्याचे परिणाम तुम्हाला आयुष्यभर भोगावे लागू शकतात. म्हणून तुम्ही नेहमी देवाच्या भीतीने आणि अत्यंत सावधगिरीने जगले पाहिजे.

तुमच्या जीवनासाठी देवाची योजना चुकवू नका. मी 19½ वर्षांचा होतो तेव्हा मी माझे स्वतःचे जीवन पूर्ण मनाने परमेश्वराला अर्पण केले. आता, बर्‍याच वर्षांनंतर, मी आनंदाने मागे वळून बघू शकतो की, जर मी "माझ्या नजरेत योग्य वाटते" तसे केले असते त्याहीपेक्षा देव माझ्या आयुष्यात खूप काही चांगले करु शकला. असे नाही की मी एवढ्या वर्षांत कधीही पाप केले नाही, किंवा कधीही कोणतीही मूर्खपणाची गोष्ट केली नाही किंवा कधीही कोणतीही चूक केली नाही. मी ते सर्व केले आहे - आणि मी आता माझ्या आयुष्याकडे मागे वळून पाहत असताना माझ्या मूर्खपणाची आणि माझ्या घोड चुकांची मला पूर्णपणे लाज वाटते. पण देव माझ्यावर दयाळू होता आणि त्याने ते सर्व पुसून टाकले आणि मला पुढे आणले. मला वाटते की त्याने पाहिले की माझ्या चुका असूनही, मी प्रामाणिकपणे त्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. अनेक चुका केल्या तरीही, जे त्याला परिश्रमपूर्वक शोधतात त्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. मला खात्री आहे की देवाचा तो चांगुलपणा आणि त्याची दया तुमचे सर्व दिवस तुमच्या बरोबर असेल (स्तोत्र.23:6).

तुमच्यासाठी आनंददायी आश्चर्ये वाट पाहत आहेत, कारण तुम्ही देवाचा सन्मान करू पाहतात, कारण "तो नेहमी तुमच्यासाठी प्रेमात शांतपणे योजना आखत असतो" (सफन्या. 3:17-भावानुवाद). त्यामध्ये तुमच्या भविष्यातील प्रत्येक तपशिलाचा समावेश आहे - पृथ्वीवरील आणि आत्मिक दोनीही. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी देवाचा सन्मान करण्याचा निश्चय केलात तर तुमच्याकडे देवाचे जे सर्वोत्कृष्ट आहे ते असू शकते. सांसारिक लोकांप्रमाणे आपण आपल्या भविष्याची योजना करत नाही. देव आपल्या बाजूने काम करतो आणि आपल्याला विशेष लाभ देतो ज्याला आम्ही पात्र नाही, अगदी रोजगार इत्यादीसारख्या ऐहिक बाबींमध्येही. त्यामुळे आप्ल्याला भविष्याची अजिबात चिंता नाही. येशूने आपल्याला शिकवल्याप्रमाणे, आपण हवेतील पक्ष्यांप्रमाणेच, चिंता आणि तणावापासून मुक्त, एका वेळी एक दिवस जगतो. परमेश्वराचे स्तवन करा!

पौलाने आपले जीवन देखील मौल्यवान मानले नाही, जर तो आनंदाने आपला मार्ग पूर्ण करू शकला (प्रेषित 20:24- के.जे.वि.अनुवाद). जेव्हा पालक आपल्या लहान मुलाला शाळेत घालतात तेव्हा ते त्या दिवसाची वाट पाहतात जेव्हा तो शाळेतून पदवीधर होऊन बाहेर पडेल. देवाचेही तसेच आहे. त्याने आपल्या जीवनमध्ये आपल्यासाठी एक अभ्यासक्रम आखला आहे. देवाने पृथ्वीवर आपल्यासाठी दिलेला अभ्यासक्रम आपण पूर्ण केला पाहिजे. आपल्या पृथ्वीवरील जीवनात, आपण चुका करू शकतो आणि घोडचुका करू शकतो आणि मूर्खपणाने वेळ वाया घालवू शकतो. पण देवाचे आभार की, त्या चुका फक्त आपण शाळेत, गणितात काही प्रश्न चुकीचे केलेल्या चुकांसारख्या असतील. देवाची आपल्यासाठी एक परिपूर्ण योजना आहे - नोकरी, लग्न इत्यादीसारख्या प्रमुख बाबींमध्ये. परंतु या सर्व गोष्टी तेव्हाच पूर्ण होऊ शकतात जेव्हा आपण पवित्रतेच्या क्षेत्रात त्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. जर आपण मनापासून पावित्रतेचा पाठपुरावा केला, तर देव हे सुनिश्चित करेल की इतर सर्व पृथ्वीवरील बाबींमध्ये, आपल्या जीवनासाठी त्याची योजना पूर्ण होईल.