लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

देवाकडे आणि त्याच्या सेवेकडे पाहण्याच्या आत्मकेंद्रित जीवनाच्या मनोवृत्तीचे कायदेशीरपणा हे वैशिष्ट्य आहे. स्व देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा सेवेतही तो अतिशय सक्रिय असू शकतो - पण ती नेहमीच कायदेशीर सेवा असते. देवासाठी केलेल्या सेवेबद्दल ती प्रतिफळाच्या शोधात असते. मोठा मुलगा वडिलांना सांगतो: "मी तुमची एवढी वर्षे सेवा केली आहे, पण तुम्ही मला कधी करडूही दिले नाहीत." (लूक १५:२९) त्याने आपल्या वडिलांची सतत प्रतिफळासाठी सेवा केली होती, पण आतापर्यंत ते स्पष्ट झाले नव्हते. दबावाच्या या क्षणाने वस्तुस्थिती समोर आणली.

अशा प्रकारे स्वची सेवा असते - मोकळेपणाने, आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे नव्हे तर प्रतिफळ मिळण्याची आशा ठेवून केलेली सेवा असते. अपेक्षित परतफेड ही देवाकडून मिळणारा आध्यात्मिक आशीर्वाद व प्रतिफळही असू शकते. पण अशा हेतूने केलेली सेवा फक्त कायदेशीर आणि देवाला अमान्य असते.

मोठ्या मुलाने आपल्या वडिलांना कठोर व क्रूर मानले कारण या सर्व वर्षांत त्याला आपल्या सेवेचे प्रतिफळ मिळाले नाही. ज्याला एक मोहर दिली होती अशा माणसासारखा तो होता, जो हिशेबाच्या वेळी आपल्या मालकाकडे आला होता आणि म्हणाला, "मी तुमची मोहर सुरक्षित ठेवली आहे (नफ्यासाठी त्याचा व्यापार न करता), मला भीती वाटत होती(तुम्ही मला व्याज मागाल ) कारण तुम्ही कठोर माणूस आहात." (लूक १९:२१ लिव्हिंग बायबल). स्व देवाला संतुष्ट करणे इतके कठीण मानतो आणि म्हणूनच तो देवाच्या सेवेत प्रयत्न करतो आणि अशा काटेकोर देवाच्या मागण्या पूर्ण न केल्याबद्दल स्वत:ला दोष देतो.

देवाला आपल्यापैकी कोणाकडूनही अशा प्रकारची सेवा अपेक्षित नाही. पवित्र शास्त्र म्हणते, "संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो." (२ करिंथ ९:७). सेवेच्या बाबतीतही देवाला आनंदाने सेवा करणाऱ्या व्यक्तीकडून आनंद मिळतो, कुरकुरत किंवा गरज आहे म्हणून केलेल्या सेवेने नाही. अनिच्छेने केलेल्या सेवेपेक्षा काहीही सेवा न केलेली त्याला चालेल. जेव्हा एखादी व्यक्ती प्रतिफळासाठी सेवा करते तेव्हा ती देवाकडे तक्रार करते की त्याला पुरेसे आशीर्वाद मिळत नाहीत. जेव्हा दुसरा कोणी त्याच्यापेक्षा जास्त आशीर्वादित असतो तेव्हा हे प्रकरण अधिकच बिघडते.

आपल्या कार्याची आणि आपल्याला मिळणाऱ्या आशीर्वादाची तुलना आपण कधी इतरांच्या आशीर्वादाशी करतो का? हा केवळ कायदेशीर सेवेचा परिणाम असू शकतो. येशूने एकदा एका विशिष्ट मनुष्याबद्दल एक दृष्टान्त सांगितला होता ज्याने दिवसाच्या वेगवेगळ्या तासांना काही मजुरांना कामास ठेवले. दिवसाच्या शेवटी मालकाने त्यांना प्रत्येकी एक रुपया दिला. ज्यांनी सर्वाधिक वेळ काम केले होते ते मालकाकडे आले आणि तक्रार केली, "तुम्ही आम्हांला या इतर लोकांइतकेच वेतन कसे देऊ शकता? आम्ही अधिक वेतनासाठी पात्र आहोत." त्यांनी मजुरीसाठी सेवा केली आणि जेव्हा त्यांनी जे मान्य केले होते ते मिळाल्यावर त्यांनी तक्रार केली की इतरांना त्यांच्याइतकेच देऊ नये. (मत्तय २०:१-१६)

मोठ्या मुलामध्ये आपण नेमके हेच पाहतो, "हे सगळे तुम्ही माझ्या धाकट्या भावाला कसे देऊ शकता? मीच तुमची विश्वासूपणे सेवा केली आहे, त्याने नाही."

इस्राएल लोकांनी देवाची कुरकुरत सेवा केली तेव्हा त्याने त्यांना बंदिवासात पाठवले: "कारण तू आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर ह्याची सेवा केली नाही…. म्हणून तुझ्या शत्रूंचे तुला दास्य करावे लागेल." (अनुवाद २८:४७). नाही. देवाला कायदेशीर सेवेत कोणताही आनंद नाही.

सहसा आत्मकेंद्रित ख्रिस्ती इतरांच्या नजरेत अध्यात्माचा ठसा उमटवण्यासाठी देवाची सेवा करतात. ख्रिस्तावरील शुद्ध व उत्कट प्रेमामुळे ते ख्रिस्ती कार्यात सक्रिय राहतात असे नाही, तर इतर लोक त्यांना अनाध्यात्मिक समजतील या भीतीमुळे ते असे करतात. आणि जेव्हा असे लोक स्वतःसाठी सोपा मार्ग निवडतात आणि त्यांना आर्थिक फायदा मिळवून देणारा मार्ग निवडतात, देवाने त्यांना तसे चालवले आहे हे सर्वांना पटवून देण्याचा ते खूप प्रयत्न करतात!इतर आपल्या अध्यात्माला कमी समजतील अशी गुप्त भीती नसेल तरच अशा आत्मसमर्थनाची गरज भासते! अशा प्रकारे देवाची सेवा करताना किती ताण आणि बंधन आहे!

ख्रिस्ताच्या प्रेमातून झरत असलेल्या सेवेत किती आनंद आणि स्वातंत्र्य आहे! प्रेम हे आपल्या जीवनातील यंत्रसामग्रीला वंगण घालणारे तेल आहे जेणेकरून ते कुरकुरू किंवा कण्हू नये! राहेलला मिळवण्यासाठी याकोबाने सात वर्षे श्रम केले. आणि पवित्र शास्त्र म्हणते की ती सात वर्षे त्याला, त्याचे तिच्यावर प्रेम असल्याने काही दिवसांप्रमाणे वाटत होती. (उत्पत्ति २९:२०) त्याचप्रमाणे, आपल्यालाही वाटेल जेव्हा देवाची सेवा प्रेमातून उपळते. कोणतेही कष्ट आणि कोणताही ताण पडणार नाही.

पवित्र शास्त्र शिकवते की ख्रिस्ताचा त्याच्या मंडळीसोबतचा नातेसंबंध पती-पत्नीसारखा आहे. पती प्रामुख्याने आपल्या पत्नीकडून काय अपेक्षा करतो? तिची सेवा नाही. तो तिच्याशी लग्न यासाठी करत नाही की तिने जेवण शिजवावे आणि कपडे धुवावेत. त्याला प्रामुख्याने तिचे प्रेम हवे असतं. त्याशिवाय बाकी सर्व काही मूल्यहीन आहे. देव आपल्याकडूनही हेच मागतो.