WFTW Body: 

जुन्या करारामध्ये संदेष्ट्यांनी देवाच्या उरलेल्या लोकांबद्दल सांगितले. देवाच्या लोकांमध्ये आध्यात्मिक अवनतीच्या काळात देवाशी विश्वासू राहणारे काहीच लोक असतील याबद्दल ते बोलले. संदेष्ट्यांचा विषय पुनर्स्थापना हा होता.

उदाहरणार्थ, होशेयाने आध्यात्मिक व्यभिचार आणि देवाच्या न बदलणाऱ्या प्रीतिबद्दल सांगितले. हबक्कूकने विश्वासाचा झगडा आणि विश्वासाच्या विजयाबद्दल सांगितले. जखऱ्याचे ओझे म्हणजे देवाच्या लोकांचे बाबेलातून यरुशलेमात स्थित्यंतर. हाग्गयाचे ओझे मंदिराची उभारणी हे होते. प्रत्येक संदेष्ट्याला देवाने दिलेले एक अनोखे ओझे होते - परंतु त्या सर्वांना देवाच्या लोकांमध्ये असलेल्या पवित्रतेच्या अभावाची चिंता होती.

पवित्रता आणि देवाची न बदलणारी प्रीती हे सर्व संदेष्ट्यांचे ओझे होते: देवाच्या लोकांमध्ये पवित्रता आणि आध्यात्मिक व्यभिचारात असतानाही आणि ते भरकटले तरी देवाची त्याच्या लोकांबद्दलची असलेली न बदलणारी प्रीती.आपल्या लोकांना परत आणण्याची देवाची इच्छा नेहमीच होती. तो त्यांना शिस्त लावतो; पण नंतर शिस्त लावून झाल्यानंतर त्याला त्यांना पुन्हा त्याच्याकडे आणायचे आहे.

मंडळीमध्येही खऱ्या संदेष्ट्यांनी असेच कार्य केले पाहिजे. आज मंडळीमधील एका खऱ्या संदेष्ट्याला देवाच्या लोकांमध्ये पवित्रतेसाठी जुन्या कराराच्या संदेष्ट्यांना जे ओझे होते तेच ओझे असेल. आणि तोसुद्धा देवाच्या न बदलणाऱ्या, सहनशील, दयाळू प्रीतिमुळे भारावून जाईल, अशी प्रीती जी त्याच्या पापाकडे फिरलेल्या लोकांना त्याच्याकडे परत आणण्याची आणि खऱ्या पवित्रतेकडे परत आणण्याची सतत इच्छा करत धरते. जर मंडळी जिवंत ठेवायची असेल आणि तिच्यात देवासाठी पाहिजे तसे कार्य करायचे असेल तर प्रत्येक मंडळीमध्ये संदेष्ट्यांची सेवा असली पाहिजे.

देव आपल्या हृदयावर जे ओझे टाकतो ते जवळजवळ नेहमीच त्याने आपल्यासाठी आखलेल्या सेवेचे संकेत असते. म्हणून परमेश्वराकडून ओझे मिळविण्यासाठी थांबा. जर तुम्ही भार नसताना परमेश्वराची सेवा केली, तर तुम्हाला काही काळानंतर परमेश्वराच्या कामाचा कंटाळा येईल आणि तुम्ही पैसे, माणसाकडून सन्मान किंवा पृथ्वीवरील सोयीसुविधा शोधत बसाल. आज परमेश्वराची सेवा करण्याचा दावा करणाऱ्या अनेकांना त्यांच्या सेवेसाठी देवाने दिलेला भार नाही, हे दुर्दैव आहे.

देव एका माणसाला मुलांमध्ये काम करण्याचे ओझे देऊ शकतो आणि दुसऱ्याला सुवार्ता सांगण्याचे ओझे देऊ शकतो. आणखी एकाला देवाच्या लोकांना शिकवण्यासाठी ओझे दिले जाऊ शकते. ख्रिस्ताच्या शरीराच्या विविध सदस्यांना देव वेगवेगळे ओझे देतो. आपण दुसऱ्याच्या सेवेचे अनुकरण करू नये किंवा त्याचे ओझे घेण्याचा प्रयत्न करू नये. इतरांवर आपले ओझे घेण्याची सक्ती करू नका; आणि इतर कोणालाही त्याचे ओझे तुम्हांला देण्याची परवानगी देऊ नका. देवाला स्वत:च तुम्हाला एक ओझे देऊ द्या - ज्याची त्याने तुमच्यासाठी योजना आखली आहे.

आपण जितके देवाच्या हृदयाशी सहभागिता राखू, तेवढे आपण त्याचे ओझे वाटून घेणार आहोत. देवाने जर तुम्हाला सुवार्तिक म्हणून पाचारण केले असेल तर तो तुम्हाला हरवलेल्या आत्म्यांबद्दल करुणा देईल. देवाने तुम्हाला शिक्षक म्हणून पाचारण केले असेल तर तो तुम्हाला आंधळे आणि फसलेल्या, विजयाच्या जीवनात प्रवेश न करणाऱ्या विश्वासणाऱ्या लोकांबद्दल करुणा देईल. आपली सेवा प्रभावीपणे पूर्ण करायची असेल तर त्याच्या करुणेचे भागीदार होण्यासाठी देवाच्या हृदयाशी सहभागिता राखणे आवश्यक आहे.

बऱ्याच लोकांनी मला त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी - सहसा सुवार्ताकार्यासाठी ओझे बाळगण्याचे आवाहन केले आहे. पण मी नेहमीच अशा दबावांचा प्रतिकार केला आहे. देवाने दुसऱ्याला दिलेले ओझे वाहण्यात मला रस नाही. देवाने मला एक विशिष्ट ओझे दिले आहे आणि मी हे निश्चित केले आहे की मी ही एकमेव सेवा पूर्ण करेन. संदेष्ट्यांनी कोणालाही त्यांना ओझ्यापासून आणि देवाने त्यांना दिलेल्या सेवेपासून बाजूला करू दिले नाही.जर तुमच्यावर अजिबात ओझे नसेल तर तुम्ही देवाकडे जाऊन त्याला तुम्हाला ओझे देण्यास सांगितले पाहिजे. ख्रिस्ताच्या शरीरात पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे तुमच्यासाठी निश्चित एक काम आहे आणि ते काय आहे हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.

अनेक धर्मोपदेशक एका सेवेकडून दुसऱ्या सेवेकडे भटकतात - ज्या ख्रिस्ती संघटनेत त्यांना सर्वाधिक पगार मिळतो त्यात सामील होतात. उदाहरणार्थ, रेडिओ सेवेसाठी ते वरकरणी वाटणाऱ्या "ओझ्यापासून" सुरुवात करू शकतात. पण जर एखाद्या मुलांमध्ये सुवार्ताकार्य करणाऱ्या संस्थेने त्यांना जास्त पगार दिला, तर अचानक बाल-सुवार्तावादासाठी"ओझे" निर्माण होते! थोड्या काळाने , जर एखाद्या ख्रिस्ती साहित्य संस्थेने त्यांना अजून जास्त पगार दिला, तर त्यांचे "ओझे" अचानक साहित्य सेवेकडे वळते!! असे प्रचारक परमेश्वराची सेवा करत नाहीत. ते असे धार्मिक पुरुष आहेत जे बाबेलातील "व्यवसायात" गुंतले आहेत.

जेव्हा देव तुम्हाला ओझे देतो, तेव्हा एखाद्या संस्थेने तुम्हाला पृथ्वीवर चांगले फायदे देऊ केले म्हणून तुम्ही ते सोडू शकत नाही.