लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   घर
WFTW Body: 

शास्तेच्या पुस्तकातील 3-16 अध्यायांमध्ये आपण 13 शास्त्यांविषयी वाचतो की त्यांना देवाने उभे केले. चौदावा शास्ता शमूवेल ज्याच्याविषयी 1 शमूवेलमध्ये लिहिले आहे. या शास्त्यांपैकी बहुतेक शास्त्यांची नावे फार प्रसिद्ध नाहीत.

पहिल्या शास्त्याचे नाव अथनिएल जो कालेबाचा जावई व पुतण्या होता (शास्ते 3:9). ह्याठिकाणी म्हटले आहे, ''त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व तो इस्राएलाचा शास्ता झाला'' (शास्ते 3:10). हे वाक्य शास्तेच्या पुस्तकात वारंवार आढळते. देवाच्या लोकांचे नेतृत्व करण्याकरिता देवाने गिदोन व शमशोनाला सुसज्जीत करण्याकरिता प्रभुचा आत्मा त्यांच्यावर पाठविला (शास्ते 6:34; 14:6). केवळ आत्म्याच्या अभिषेकामुळे ते इस्राएलाचा राज्यकारभार सांभाळू शकले. आज देखील देवाच्या लोकांचे नेतृत्व करण्याकरिता व मार्गदर्शन करण्याकरिता केवळ अभिषेकाचीच गरज आहे.

आपला नवीन जन्म झालेला असो, नवीन जन्म होत असता पवित्र आत्म्याचे आपल्यामध्ये कार्य सुरू होते. परंतु, प्रभुचा आत्मा आपल्यावर येणे व प्रभुची सेवा करण्याकरिता त्याने आपल्याला सामर्थ्य देणे ही आणखी एक वेगळी व महत्वाची गोष्ट आहे. काही सभेंमध्ये भावना उचंबळल्यामुळे प्रोत्साहीत झाल्याचा अनुभव आला असल्यास त्यावर विसंबून राहू नका. अन्य भाषा बोलता येत असेल तर तेवढ्यावर समाधान मानू नका. अन्य भाषा बोलता आली म्हणजे आपण पवित्र आत्म्याने भरलो असे नाही. पवित्र आत्म्याचे सामर्थ्य जोपर्यंत प्राप्त होत नाही तोवर समाधान मानू नका. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याशिवाय तुम्ही देवाचे कार्य करू शकणार नाही. येशू 30 वर्षे परिपूर्ण जीवन जगला, पवित्र आत्म्याद्वारे जन्मला, पवित्र आत्म्याच्या आज्ञेमध्ये तीस वर्षे राहिला तरी देखील पित्याची सेवा करण्याकरिता त्याला पवित्र आत्म्याचा अभिषेक होण्याची गरज भासली. यार्देन नदीमध्ये प्रार्थना करीत असताना देवाचा आत्मा येशूवर आला. तुम्ही देखील येशूचे अनुकरण करावे. आत्म्याच्या ठिकाणी केवळ ज्ञानाने किंवा दानांनी काम भागणार नाही. या अभिषेकाच्या खाली आपल्याला सतत जीवन जगावे लागेल. शमशोनाचे उदाहरण आपल्यापुढे आहे, जे आपल्याला ताकीद देते की एका घटकेला आपल्याला अभिषेक झाला असला तरी पुढे आपण तो गमावू शकतो.

अथनिएलने इस्राएलचा राज्यकारभार चाळीस वर्षे सांभाळला. त्या काळात इस्राएलात शांती होती (शास्ते 3:11). परंतु, अथनिएल मरण पावल्यावर इस्राएली लोकांनी देवाच्या दृष्टीत दुष्टाई सुरू केली. त्यांनी पाप करणे सुरू केल्यावर प्रभुने मवाबच्या राजाला परवानगी दिली की त्याने इस्राएली लोकांना अठरा वर्षे गुलाम करून ठेवावे (शास्ते 3:14).

शास्तेच्या पुस्तकामध्ये असे सात चक्र आपण बघतो. लोक पथभ्रष्ट झाले, देवाने त्यांना शिक्षा केली, त्यानंतर देवाने त्यांना मुक्त करण्याकरिता शास्ते उभे केले. अनेक विश्वासणारे या चक्रामध्येच जीवन जगतात - ते पथभ्रष्ट होतात, पश्चात्ताप करतात, तारल्या जातात, पुन्हा पथभ्रष्ट होतात आणि वारंवार हे चक्र सुरूच ठेवतात. त्यांच्या या चक्राला शेवट नसतो. ते सभेंमध्ये जातात, प्रोत्साहित होतात व जीवनाचे समर्पण करतात. संजीवनाच्या सभा संपल्यावर लवकरच पथभ्रष्ट होतात. पुढे एखादा अभिषीक्त वक्ता येतो, सभेमध्ये वचन सांगतो आणि पुन्हा ते प्रोत्साहित होतात.

शेवट नसलेल्या चक्रामध्ये आपण गुरफटलेले असावे अशी देवाची इच्छा आहे का? मुळीच नाही. आज पवित्र आत्मा आपल्यासोबत सतत आहे. त्या काळी आत्मा केवळ एका पुढार्यावर येत असे व सर्व लोक त्या पुढार्यावर विसंबून राहत असे. परंतु, आज आपल्या सर्वांना आत्मा प्राप्त होऊ शकतो. आपण कोणा विशिष्ट व्यक्तीवर विसंबून राहण्याची गरज नाही. आपल्या अंतःकरणामध्ये सतत देवाचा अग्नी जळत राहू शकतो.

अठरा वर्षे मवाबी लोकांची गुलामी केल्यानंतर इस्राएली लोकांनी प्रभुकडे धावा केला (शास्ते 3:15). त्यांच्याकरिता देवाने आणखी एक मुक्तीदाता उभा केला - एहूद. तो दुसर्या क्रमांकाचा शास्ता होता. मला प्रश्न पडतो की दास्यातून मुक्त होण्याकरिता देवाकडे विनवणी करण्यापूर्वी त्यांनी अठरा वर्षांचा कालावधी का व्यर्थ घालविला असावा? गुलाम झाल्याबरोबर एकाच महिन्यात त्यांनी प्रभुला का आरोळी मारली नाही? आज एखादी व्यक्ती अठरा वर्षे पापात का राहते? (काही लोक तर चाळीस वर्षे पापात राहतात) आणि नंतर हे लोक पापावर विजय मिळविण्याचा विचार करतात. मला कळत नाही, असे का? परंतु सर्वत्र हे घडत आहे.

एहूदने मवाबी लोकांवर विजय मिळविला आणि ह्या भूमिला 80 वर्षांपर्यंत कोणी हात लावला नाही (शास्ते 3:30). परंतु पुन्हा इस्राएली लोक पथभ्रष्ट झाले आणि देवाने शमगारला उभे केले, ज्याने बैलाच्या जबड्याने सहाशे पलिष्टी लोकांना जिवे मारले होते. हे कार्य पवित्र आत्म्याच्या अभिषेकामुळे झाले होते. पुढे शमशोनाने देखील असेच केले.

इस्राएली लोकांनी पुन्हा देवाच्या दृष्टीत वाईट केले आणि कनानचा राजा याबीन ह्याने त्यांना गुलाम केले. असे देवाने घडू दिले. खरे तर इस्राएली लोकांनी कनानी लोकांना हाकून लावायला हवे होते परंतु, कनानी राजा इस्राएली लोकांवर राज्य करू लागला. विश्वासणार्यांनी पापावर जय मिळविला पाहिजे; परंतु, अनेक वेळा पाप त्यांच्यावर विजयी होऊन सत्ता चालविते. याबीनकडे 900 लोखंडी रथ होते. त्याने 20 वर्षे इस्राएली लोकांचे शोषण केले. मग इस्राएली लोकांनी प्रभुकडे आरोळी केली आणि प्रभुने दबोराला शास्ता म्हणून उभे केले (शास्ते 4:3,4).