मत्तय ४:१९ मधील "मी तुम्हाला माणसे धरणारे करीन " या साध्या विधानाचा विचार करूया. तुम्हाला माणसे धरणारा कोण बनवणार आहे? ख्रिस्त. कोणताही व्यक्ति तुम्हाला माणसे धरणारा बनवू शकत नाही. तुम्ही बायबल कॉलेजमध्ये जाऊ शकता आणि तिथे वर्षानुवर्षे घालवू शकता, पण ते केल्याने तुम्ही माणसे धरणारे बनू शकणार नाही. पवित्र शास्त्राचा अभ्यास करून, धर्म प्रचारकांचे आव्हान ऐकून किंवा हात वर करून किंवा पुढे येऊन गुडघे टेकून, देवाच्या कार्यासाठी तुमचे जीवन समर्पित करून तुम्ही माणसे धरणारे बनू शकत नाही. जर तुम्हाला माणसे धरणारे व्हायचे असेल तर प्रभु म्हणतो, "माझ्या मागे या." " पवित्र शास्त्राचा अभ्यास करा" असे नाही तर, "माझ्या मागे या." असे तो म्हणतो.
सुरुवातीच्या ख्रिस्ती लोकांकडे पवित्र शास्त्र नव्हते. ते माणसे धरणारे कसे बनू शकत होते ? येशूचे अनुसरण करून. आपण हे योग्यरित्या समजून घेतले पाहिजे. आपण निश्चितच शास्त्रवचनांचा अभ्यास केला पाहिजे, जसे आपण या अभ्यासाच्या सुरुवातीला शिकलो " परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने माणूस जगेल" (मत्तय ४:४). परंतु आपण पवित्र शास्त्राचे मूर्तिपूजक बनू नये. पवित्र शास्त्राचे मूर्तिपूजक बनू नका. पवित्र शास्त्र आपल्याला येशूचे अधिक चांगल्या प्रकारे अनुसरण करण्यास मदत करण्यासाठी आहे. आपल्याला येशू ख्रिस्ताचे गौरव दाखवण्यासाठी पवित्र आत्मा वचनाचा वापर करतो. आणि येशूचे अनुसरण करणे हा माणसे धरणारे होण्याचा मार्ग आहे. कोणतीही मिशनरी बायबल प्रशिक्षण संस्था नाही तर स्वतः येशू ख्रिस्त तुम्हाला माणसे धरणारे बनवणार आहे. देव माणसांचा वापर करू शकतो, परंतु शेवटी तो ख्रिस्त आहे जो तुमच्याशी वैयक्तिक संबंध ठेवू इच्छितो आणि तोच तुम्हाला माणसे धरणारा बनवू शकतो.
माणसे धरणारे होणे, याचा काय अर्थ आहे ?माणसे धरणारे होण्याचा अर्थ असा आहे की ,जसे मासेमार समुद्रात किंवा नदीत जातात आणि मासे पकडण्यासाठी आणि किनाऱ्यावर आणण्यासाठी त्यांचे जाळे खाली ( पाण्यात) टाकतात आणी मग ते त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणतात. मासे नैसर्गिकरित्या जमिनीवर राहू शकत नाही; ते समुद्रात राहतात ! आणि एक मच्छीमार तो मासा पाण्यातून उचलून जमिनीवर आणतो, तो ज्या वातावरणात होता त्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या वातावरणात त्याला तो आणतो .
हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की ते सिंह किंवा हत्तीला पकडून पिंजऱ्यात ठेवण्यासारखे नाही, कारण सिंहाला आधीच समुद्रात नव्हे तर जमिनीवर राहण्याची सवय असते. पण जेव्हा तुम्ही मासा पकडता तेव्हा त्याला एका वातावरणातून बाहेर काढले जाते आणि पूर्णपणे वेगळ्या वातावरणात आणले जाते. जमीन आणि पाणी हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. म्हणून माणसे धरणारे बनन्यासाठी - एक खरा माणसे धरणारा होणे म्हणजे - या जगाच्या पाण्यात असलेल्या लोकांकडे जाणे, त्यांना तिथून उचलणे आणि त्यांना पूर्णपणे वेगळ्या वातावरणात आणणे म्हणजे स्वर्गाच्या राज्यात आणणे.
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला या पृथ्वीच्या राज्यातून बाहेर काढले आणि स्वर्गाच्या राज्यात आणले नसेल, तर तुम्ही खरोखर त्या माश्याला (त्या व्यक्तीला) बाहेर काढलेच नाही . कदाचित तुम्ही तो मासा ( ती व्यक्ति) तुमच्या जाळ्यात ठेवला असेल, पण जर तो अजूनही पाण्यात असेल तर तुम्ही त्याला बाहेर काढलेच नाही . तुम्ही खरोखर माणसे धरणारे झालाच नाही. कोणता मच्छीमार मासा जाळ्यात पकडतो आणि त्या माश्याला जाळ्यामध्ये पाण्यातच ठेवतो, जिथे तो मासा खूप आरामदायी असतो ? पण एकदा जेव्हा तुम्ही तो मासा जमिनीवर आणता तेव्हा तुम्ही बघू शकता तो मासा काय करतो, जेव्हा तो जमिनीवर असतो तेव्हा तो तडफडतो आणि म्हणतो, "अरे, मला इथे फारसे आरामदायी वाटत नाही!"
ज्या प्रकारे एखादा मासा पाण्यातून बाहेर पडून जमिनीवर येतो तसे एखाद्या व्यक्तीला पृथ्वीच्या राज्यातून स्वर्गाच्या राज्यात नेले जाते – तेव्हा त्याला पूर्णपणे वेगळ्या वातावरणात आणले जाते. पवित्र आत्मा आपल्याला स्वर्गाच्या राज्यात आरामदायी बनवतो. म्हणून असे समजू नका की तुम्ही शंभर लोकांना "प्रभु येशू, माझ्या हृदयात ये" असे म्हणायला लावले, म्हणजे तुमचे काम पूर्ण झाले आहे आणि म्हणून तुम्ही "माणसे धरणारे " झाले आहात. दुर्दैवाने, अनेक विश्वासणाऱ्यांसोबत असेच घडले आहे. त्यांनी माणसे धरणारे होण्याचा अर्थ काय आहे यावर मनन केलेले नाही कारण इतर मानसांनी आणि शिक्षकांनी त्यांना माणसे धरणारे बनवले आहे - ख्रिस्ताने नाही. जर ख्रिस्त तुम्हाला माणसे धरणारां बनवणारां असेल, तर ते त्याच तत्त्वावर असेल ज्यावर त्याने दोन वचने आधी उपदेश केला आहे ते म्हणजे , "पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे." आपण या 'माशांना' मागे फिरून स्वर्गाचे राज्य शोधण्यास शिकविले पाहिजे, ते ज्या वातावरणात होते त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या वातावरणात राहण्यास शिकवले पाहिजे.
मासेमार हेच करत असतात . तो समुद्रातून जमिनीवर मासे घेऊन येतो , जर आपन खरे मानसे धरणारे असु तर आपण पृथ्वीच्या राज्यातून लोकाना काढून स्वर्गाच्या राज्यात आणले पाहिजे , सैतानाच्या राज्यातून काढून देवाच्या राज्यात आणले पाहिजे -. केवळ येशूच आपल्याला माणसे धरणारे बनवू शकतो. दुसरे कोणीही ते करू शकत नाही.
फक्त सुवार्तिकच माणसे धरणारे आहेत असे नाही. सुवार्तिक त्या कामाचा फक्त एक भाग करत आहेत. संदेष्टा, प्रेषित, शिक्षक, मेंढपाळ, पाळक यांनी देखील त्यांना नवीन वातावरणात, स्वर्गाच्या राज्यात खरोखर आरामदायी बनवून ते काम पूर्ण केले पाहिजे.
संपूर्ण कार्य म्हणजे एखाद्या व्यक्तीला समुद्रातून बाहेर काढून जमिनीवर आणणे - पृथ्वीच्या राज्यातून बाहेर काढून स्वर्गाच्या राज्यात नेणे. आणि ते करण्याचा मार्ग म्हणजे ख्रिस्ताचे अनुसरण करणे. जर मी येशूचे अनुसरण करतो तर मी तेच करेन जे त्याने केले.