WFTW Body: 

१. तो येशूचा दास होता: आपण प्रकटीकरण १:१ मध्ये वाचतो - हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. ते देवाने ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहेत, त्या आपल्या दासांना दाखविण्यासाठी ख्रिस्ताला दिले, आणि ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला (चिन्हे देऊन) कळविण्यास सांगितले. हे प्रकटीकरण ख्रिस्ताच्या दासांना देण्यात आले होते. ते प्रत्येकासाठी नाही. हे केवळ परमेश्वराच्या इच्छुक दासांसाठी आहे. पगारी नोकर आणि दास यांच्यात फरक आहे. नोकर मजुरीसाठी काम करतो. पण दास म्हणजे गुलाम जो आपल्या मालकाचा असतो आणि त्याला स्वत:चा कोणत्याहीबाबतीत कोणताही अधिकार नसतो. मग परमेश्वराचे दास कोण आहेत? ज्यांनी आपल्या स्वत:च्या सर्व योजना आणि महत्त्वाकांक्षा आणि आपले सर्व अधिकार आनंदाने सोडून दिले आहेत आणि ज्यांना आता आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात फक्त देवाची इच्छा पूर्ण करायची आहे. केवळ असे विश्वासणारेच खरे दास असतात. परमेश्वराकडे पुष्कळ सेवक आहेत, पण स्वेच्छेने होणारे दास फार कमी आहेत. देवाचे वचन केवळ त्याच्या दासांनाच अचूकपणे समजू शकते. एखादा पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करतो त्याप्रमाणे इतरांना त्याचा बौद्धिक अभ्यास करता येईल. परंतु त्यात दडलेल्या आध्यात्मिक वास्तवाचे आकलन त्यांना कधीच होणार नाही. येशूने योहान ७:१७ मध्ये हे स्पष्ट केले आहे की देवाच्या इच्छेचे पालन केल्यामुळेच एखाद्याला सत्य कळू शकते.

२. तो एक बंधू म्हणून शेवटपर्यंत राहिला: प्रकटीकरण १:९ मध्ये आपण असे वाचतो:मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व सहनशीलता ह्यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे, तो मी देवाच्या वचनामुळे आणि येशूच्या साक्षीमुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो . येथे योहान स्वत: ला "आपला बंधू" असे म्हणवून घेताना आपण वाचतो. त्या वेळी येशूने निवडलेल्या बारा जणांपैकी योहान हा एकमेव जिवंत प्रेषित होता. परमेश्वराने त्याला पात्म बेटावर हे प्रकटीकरण दिले तेव्हा तो सुमारे ९५ वर्षांचा होता. तोपर्यंत तो ६५ वर्षांहून अधिक काळ देवासोबत चालला होता. पण तरीही तो बंधूच होता. तो पोप योहान किंवा रेव्हरंड योहान नव्हता. तो पाळक योहानसुद्धा नव्हता! तो फक्त एक सामान्य बंधू होता. येशूने आपल्या शिष्यांना सर्व पदव्या टाळण्यास आणि स्वतःला नेहमी केवळ बंधू म्हणून संबोधण्यास शिकवले होते (मत्तय २३:८-११). आणि आजच्या अनेक लोकांपेक्षा निराळे, प्रेषितांनी त्याच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले. आपल्याकडे एकच मस्तक आणि पुढारीदेखील एकच आहे - ख्रिस्त. बाकीचे सगळे जण बंधू आहोत; मग आपले सेवाकार्य किंवा मंडळीमधील आपला अनुभव काहीही असो.

३. तो आत्म्यामध्ये होता: प्रकटीकरण १:९,१० मध्ये आपल्याला असे दिसून येते की योहान "आत्म्यात" होता आणि म्हणूनच त्याला परमेश्वराची वाणी ऐकू आली. आपणही ती वाणी ऐकू शकतो - जर आपण आत्म्यामध्ये असू तर. आपले चित्त कोठे लावले आहे यावर हे सर्व अवलंबून आहे. जर आपले मन पृथ्वीवरील गोष्टींवर केंद्रित असेल, तर आपण जी वाणी ऐकतो ती पृथ्वीवरील गोष्टींविषयी असेल.

४. तो एक नम्र बंधू होता: प्रकटीकरण१: १७ मध्ये आपल्याला असे दिसून येते, की शेवटल्या रात्रीच्या भोजनाच्या वेळी येशूच्या उराशी टेकलेला योहान आता मरण पावलेल्या मनुष्यासारखा त्याच्या पायाशी पडतो. योहान ६५ वर्षे देवाबरोबर चालला होता. तो निःसंशयपणे त्या वेळचा पृथ्वीवरील सर्वात संतपुरुष होता. तरीही परमेश्वराच्या सान्निध्यात तो ताठ उभा राहू शकला नाही. जे परमेश्वराला सर्वात जास्त ओळखतात, ते त्याचे अधिक भय धरतात. जे लोक त्याला कमीत कमी ओळखतात, ते त्याच्याशी फार ओळख असल्याचे भासवतात. स्वर्गातील सराफीम परमेश्वरासमोर आपले मुख झाकून ठेवतात (यशया ६:२,३). ईयोब व यशया यांनी आपली पापीवृत्ती पाहिली आणि देवाचे वैभव पाहून शोक व्यक्त केला (ईयोब ४२:५,६; यशया ६:५). परंतु "जिथे देवदूत चालायला घाबरतात तेथे मूर्ख लोक पळत जाऊन गर्दी करतात"!! दैहिक विश्वासणारे असाच मूर्खपणा करतात. आपण परमेश्वराला जितके जास्त ओळखू, तितके आपण आपले मुख धुळीत लपवून प्रीतीपूर्ण भयाने त्याच्या पायाशी पडू. प्रभूचे वैभव आपण सतत पाहू, तेव्हाच आपल्याला आपले स्वतःचे ख्रिस्तासारखे नसणे दिसेल. तरच आपण इतरांचा न्याय करणे थांबवू आणि स्वत:चा न्याय करण्यास सुरवात करू. आणि तरच योहानाने पात्म बेटावर अनुभवलेला त्याचा सामर्थ्यशाली स्पर्श आपण अनुभवू शकू.

५. तो छळातून गेला : प्रकटीकरण १:९ मध्ये योहान स्वतःला "येशूमध्ये असलेल्या क्लेशामध्ये सहभागी होणारा" असेही संबोधतो. येशूच्या प्रत्येक खऱ्या शिष्याने जोपर्यंत तो या जगात आहे तोपर्यंत "येशूमध्ये असलेल्या क्लेशामध्ये" भाग घेण्यास तयार असले पाहिजे. आरामात राहत असताना योहानाला हे प्रकटीकरण मिळाले नाही. पात्म येथे संकटाचा अनुभव घेत असताना त्याला ते मिळाले, कारण तो "देवाच्या वचनाशी व येशूच्या साक्षीशी" विश्वासू राहिला होता (प्रकटीकरण १:९). अखेरच्या काळात ख्रिस्तविरोधकांकडून आलेल्या मोठ्या क्लेशाचा अनुभव घेणाऱ्या संतांविषयी लिहिता यावे म्हणून त्याला स्वत:ला क्लेश अनुभवावे लागले. संकटाचा सामना करत असलेल्या इतरांची सेवा करण्याआधी देव सर्वात आधी आपल्याला परीक्षा व संकटांतून नेतो.