लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   Struggling
WFTW Body: 

अनेक विश्वासणार्यांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा न होण्यामागे पाच कारणे आहेत :

1) त्यांना वाटते की त्यांचा नवीन जन्म झाला तेव्हा त्यांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला आहे. पुष्कळांना अशी शिकवण देखील देण्यात आली आहे. हे विश्वासणारे अनेक वेळा पराभूत होतात, सामर्थ्यहीन असतात, रिक्त असतात, फळरहीत असतात तरीही मनामध्ये कल्पना करतात की त्यांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा झाला आहे. खरे तर ही खोटी शिकवण आहे.

2) पुष्कळांना वाटते की पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेण्याच्या ते लायकीचे नाहीत. सत्य हे आहे की तुम्ही जेवढे स्वतःला मोठे पापी समजाल तेवढ्या प्रमाणात तुम्ही पवित्र आत्म्याचा स्वीकार करण्यास लायक आहात. कारण देवाचे दान त्यांनाच मिळते ज्यांना असे वाटते की ते लायक नाहीत. जर तुम्ही आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप केला आहे तर तेवढे पुरे आहे. तुम्ही किती लायक नाहीत किंवा योग्य नाहीत किंवा निरुपयोगी आहात हे महत्वाचे नाही. हालेलुया!

3) पुष्कळांचा असा विश्वास नाही की देव चांगला आहे म्हणून तो विनंती करणार्या प्रत्येकाला चांगली दाने देतो. त्यांना वाटते की पवित्र आत्मा प्राप्त करण्याकरिता त्यांना किंमत मोजावी लागेल - सत्कर्मे करावी लागतील, उपासतापास करावे लागेल आणि मगच त्यांना पवित्र आत्मा प्राप्त होईल.

परंतु देवाकडून सर्व दाने आपल्याला मोफत प्राप्त होतात. मग पापांची क्षमा असो वा आत्म्याचा बाप्तिस्मा असो, देव सर्व गोष्टी मोफत देतो. देवाकडून प्राप्त होणारी कोणतीही गोष्ट विकत घेतल्या जाऊ शकत नाही. अनेक विश्वासणार्यांना वाटते की विश्वास ठेवणेच सर्वप्रथम कठीण गोष्ट आहे. परंतु येशूने विश्वास ठेवण्याची तुलना पिण्याशी केली आहे (योहान 7:37,38 पाहा, ''... प्या....विश्वास ठेवा''). पवित्र आत्मा प्राप्त करणे पेय पिण्याइतके सोपे आहे. प्राचीन काळामध्ये देखील तेवढेच सोपे होते. याविषयी आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये वाचतो.

4) पुष्कळांना तहान नसते. पुष्कळ लोकांना पवित्र आत्मा प्राप्त करून घेण्याची उत्कंठा नसते. येशूने एक दाखला सांगितला की एक मनुष्य शेजारच्या दारावर ठोकीत राहिला. तो तोपर्यंत ठोकीत राहिला जोपर्यंत हवी असलेली गोष्ट त्याला प्राप्त होत नाही. मग येशूने सांगितले की स्वर्गातील पिता त्या सर्वांना पवित्र आत्मा देईल जे मागतात, शोधतात व ठोकतात (लूक 11:13 वाचा वचन 5 च्या संदर्भात).

5) पुष्कळ लोक एखाद्या विशिष्ट अनुभवाची वाट बघतात (चमत्काराची किंवा अन्य भाषेची) कारण त्यांनी तशी साक्ष ऐकलेली असते. आपल्याकरिता कोणते दान योग्य राहील त्याचा निर्णय देवाने घ्यावा याकरिता ते देवावर विसंबून राहत नाही. पवित्र आत्मा साध्या सरळ विश्वासाद्वारेप्राप्त केल्या जाऊ शकतो.

मागा म्हणजे तुम्हास मिळेल (गलती 3:2; लूक 11:9-13). भावनेंची वाट बघू नका. देवाने तुम्हाला खात्री द्यावी अशी प्रार्थना करा. तो कशारीतीेने खात्री देईल हे देवावर सोपवा. देवाने तुमच्या पापांची क्षमा केली आहे व तुम्ही त्याचे मूल आहात अशी देवाने तुम्हाला खात्री दिली ना? त्याचप्रमाणे तो तुम्हाला खात्री देईल की त्याने तुम्हाला पवित्र आत्म्याद्वारे भरले आहे. तुम्हाला अनुभवाची गरज नसून सामर्थ्याची गरज आहे (प्रेषित 1:8).

म्हणून तहान लागू द्या, विश्वास ठेवा व प्राप्त करा. आता योग्य वेळ आहे. आजच तारणाचा दिवस आहे.

''तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुजवर जोराने येईल व तूहि त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील व तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील'' (1 शमुवेल 10:6).