WFTW Body: 

प्रेषित योहानाने १ योहान १:३ मध्ये लिहिले, "आपली सहभागिता तर पित्याबरोबर आहे". खरी सहभागिता वधस्तंभाच्या दोन बाजूंप्रमाणे दोन दिशांना असते. वधस्तंभाच्या माध्यमातूनच आपण देवाबरोबर आणि एकमेकांबरोबर सहभागितेत येतो. ख्रिस्त आणि आपल्यामध्ये एक वधस्तंभ आहे ज्यावर तो मरण पावला. त्यामुळे आपली प्रभूसोबत सहभागिता होवू शकते. त्याशिवाय आपण देवाशी कधीही सहभागिता करू शकत नाही, कारण आपण स्वतःमध्ये कधीही पुरेसे चांगले होवू शकणार नाही. आणि आपल्यामध्ये विश्वासणारे म्हणूनही, एक वधस्तंभ असणे आवश्यक आहे ज्यावर आपण प्रत्येकजण स्वत:ला मारतो, जर आपल्याला एकमेकांशी सहभागिता हवी असेल तर. वधस्तंभावरील या मृत्यूशिवाय सहभागिता अशक्य आहे - उभ्या आणि आडव्या दोन्ही दिशांमध्ये. वधस्तंभ हे जीवन आणि सहभागितेचे गुपित आहे. वधस्तंभाशिवाय जीवन नाही आणि वधस्तंभाशिवाय सहभागिता शक्य नाही. हा वधस्तंभ अनंत काळापासून देवाच्या मनात होता."जगाच्या स्थापनेपासून" कोकरा वधलेला होता (प्रकटीकरण १३:८ - केजेव्ही). देवाला सुरुवातीपासूनच शेवट माहीत असतो आणि म्हणून त्रैक्याला सर्व अनंत काळापासून माहीत होते की, त्यांच्यातील दुसऱ्या व्यक्तीला मनुष्य म्हणून पृथ्वीवर यावे लागेल आणि मनुष्याच्या पापांसाठी वधस्तंभावर खिळून घ्यावे लागेल. देवाने हे काही आदामाने पाप केल्यानंतर ठरवले असे नाही. हे अनंत काळापासून पूर्वज्ञात होते. आदामाने पाप केल्यावर देवाने जीवनाच्या झाडासमोर तलवार ठेवली. ती तलवार येशूवर पडली आणि त्याला वधले. आणि ती तलवार आपल्यातील आदामाच्या जीवनावरही पडली पाहिजे - आपण आपले स्थान "ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला" म्हणून स्वीकारले पाहिजे (गलतीकरांस पत्र २:२०) - जर आपल्याला जीवनाच्या झाडाकडे येऊन व देवाशी आणि एकमेकांशी ही सहभागिता हवी असेल तर.

योहान म्हणतो की सहभागितेचा परिणाम परिपूर्ण आनंदात होईल (१ योहान १:३,४) परिपूर्णता मिळेल. आनंद हा ख्रिस्ती जीवनाचा एक प्रमुख भाग आहे, कारण आनंद म्हणजे स्वर्गीय वातावरण. स्वर्गात कसलेही औदास्य नाही. देवदूत कधीही निराश होत नाहीत. ते नेहमीच जीवनाने परिपूर्ण असतात आणि आनंदाने परिपूर्ण असतात. आणि जर आपली देवाशी सहभागिता असली तर आपल्यालाही तो आनंद मिळू शकतो. स्वर्गाचे वातावरण आपल्या हृदयात आणण्यासाठी पवित्र आत्मा आला आहे - आणि त्याचा एक भाग म्हणजे परिपूर्ण आनंद. सैतान तुम्हाला सांगेल की, जर तुम्ही तुमचे जीवन पूर्णपणे देवाला दिले तर तुम्ही दुःखी, उदास, निराश आणि लांब चेहर्‍याचे व्हाल. दुर्दैवाने हे खरे आहे की काही ख्रिस्ती लोक त्यांच्या दिसण्यातून अशीच छाप पाडतात. मी एका लांब चेहर्‍याच्या ख्रिस्ती व्यक्तीची गोष्ट ऐकली जो कोणाला तरी साक्षीद्वारे विचारात होता की, "तुम्ही तुमच्या हृदयात ख्रिस्ताचा स्विकार कराल का?" त्या व्यक्तीने ख्रिस्ती माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि उत्तर दिले, "नाही, धन्यवाद. मला आधीच भरपूर समस्या आहेत!" आपल्या अद्भुत प्रभुसाठी हा एक दीन साक्षीदार आहे. जर तुमचे आयुष्य आणि तुमचे घर प्रभूचा आनंद प्रसारित करत नसेल, तर तुमच्या आयुष्यात काहीतरी गडबड आहे. तुम्ही कुठेतरी देवाची इच्छा गमावली आहे.

योहान पुढे जाऊन असे म्हणतो की, जर तुम्हाला हे जीवन, सहभागिता आणि आनंद हवा असेल, तर तुम्हाला सर्वात आधी हे समजून घेण्याची गरज आहे की देव प्रकाश आहे आणि त्याच्याठायी मुळीच अंधार नाही (१ योहान १:५) - शून्य खोटारडेपणा, शून्य अशुद्धता, शून्य द्वेष, शून्य गर्व इ. तुम्हाला असे जीवन हवे आहे का जिथे तुम्ही कधीही खोटे बोलत नाही, कोणाचा द्वेष कधीच करत नाही, जिथे तुम्हाला कोणाचाही हेवा वाटत नाही आणि गर्व वाटत नाही? जर तुम्ही ते जीवन निवडाल, तर तुम्ही कधीही उदास किंवा निराश होणार नाही. प्रभूमध्ये तुम्ही सर्वदा आनंदी जीवन जगू शकाल. या पाप - शापित पृथ्वीवर असे जीवन जगणे शक्य आहे का? होय आहे. फिलिप्पैकरास पत्र ४:४ आपल्याला प्रभूमध्ये सर्वदा आनंद करण्याची आज्ञा देते. हे पृथ्वीवरील लोकांसाठी लिहिले गेले होते, स्वर्गातील लोकांसाठी नाही! तुमचा आनंद इथे पृथ्वीवर परिपूर्ण होवू शकतो, मग जरी तुमचा पात्म बेटावर योहानासारखा छळ होत असेल किंवा तुम्ही घरी आरामात बसला असाल. जर तुम्ही नेहमी देवाच्या प्रकाशात चालणे पसंत कराल तर तुमचा आनंद तुमच्या परिस्थितीवर कधीही अवलंबून राहणार नाही.

पण जर आपण म्हणतो की त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे आणि अंधारात चालतो, तर आपण सत्य आचरित नाही. असे अनेक ख्रिस्ती आहेत जे म्हणतात की त्यांची देवाशी सहभागिता आहे पण ते पापात चालतात. तुम्ही त्यांचा चेहरा पाहून समजू शकता की त्यांच्यात प्रभूचा आनंद नाही. त्यांच्या पावलात उत्साह नाही, त्यांच्या ओठांवर गीत नाही आणि त्यांच्या डोळ्यात चमक नाही. देवाबरोबरच्या सहभागितेचा आनंद त्यांनी गमावला आहे. जर आपण देवाबरोबर चालत असलो तर ,आपण विश्वासणारे म्हणून जितके मोठे होऊ तितका मोठा आनंद आपल्याकडे असेल.