WFTW Body: 

आपल्याला 2 करिंथकरांस 7:1 मध्ये देवाचे भय बाळगून पवित्रतेला पूर्णता आणण्याची आज्ञा दिली आहे. म्हणून, जर आपली पवित्रता गेल्या वर्षाच्या तुलनेत आज अधिक परिपूर्ण नसेल, तर हे सिद्ध होईल की आपण देवाचे पुरेसे भय बाळगले नाही. त्याबाबतीत वडील या नात्याने आपण एकमेकांना मदत केली पाहिजे - कारण आपण आपल्या भावाचे राखणदार आहोत. म्हणूनच देव प्रत्येक मंडळीत एकापेक्षा जास्त वडिलांची नियुक्ती करतो. इब्री 3:13 आपल्याला दररोज एकमेकांना उत्तेजन देण्यास सांगते, नाही तर पापाच्या फसव्यापणामुळे आपण कठोर होऊ. अशा प्रकारे फसवणूक होण्यापासून वाचण्यासाठी आपण एकमेकांना मदत करू शकतो.

आपण यशया 11:3 मध्ये वाचतो की देवाच्या आत्म्याने येशूला "देवाच्या भयाबद्दल संवेदनशील" बनवले. जर आपण त्याला परवानगी दिली तर पवित्र आत्मा आपल्याला देखील देवाच्या भयाबद्दल संवेदनशील बनवू शकतो. जर आपण खरोखर पवित्र आत्म्याने भरलेले असलो, तर आपण देवाच्या भयाने परिपूर्ण होऊ. देव नेहमीच आपल्या बाजूने असतो आणि आपली जेवढी पवित्र आत्म्याने भरण्याची इच्छा आहे त्यापेक्षा जास्त तो आपल्याला पवित्र आत्म्याने भरण्यास उत्सुक आहे. आपल्या सर्व कमकुवतपणातुनही तो आपल्यापैकी कोणाच्याही माध्यमातून एक उत्तम कार्य करू शकतो. आपण फक्त स्वतःला नम्र करणे आणि त्याचा सतत शोध घेणे आवश्यक आहे. देव नेहमी आपल्या शरीराविरुद्ध आणि सैतानाविरुद्ध आपल्या बाजूने असतो.

आपण अशा काळात जगत आहोत जेव्हा ख्रिस्ती लोकांमध्ये दुसरा येशू (जो शिष्यत्वाची मागणी करत नाही) घोषित केला जात आहे, दुसरा आत्मा प्राप्त होत आहे (जो बनावट दान देतो परंतु लोकांना पवित्र बनवत नाही) आणि दुसरी सुवार्तेचा (आरोग्य आणि संपत्तीची) प्रचार केला जात आहे (2 करिंथ. 11:4). त्यामुळे खरा येशू, पवित्र आत्मा आणि देवाच्या कृपेची सुवार्ता यांना उन्नत करण्यासाठी आपण आपल्या काळात विश्वासू असले पाहिजे.

स्वतःचे समर्थन न करता माफी मागणे:

जर आपण तुटलेल्या किंवा भग्न ह्रिदयाचे नसलो तर, आपण काहीतरी चुकीचे केले आहे याची जाणीव होताच आपण सर्व नम्रतेने माफी मागण्यास अनिच्छुक असू (किंवा संकोच करू.)

बहुतेक मानवांसाठी सर्वात कठीण आकरा शब्द आहेत: "मला क्षमा करा. ती माझी चूक होती. कृपया मला क्षमा करा."

एक भग्न न झालेला आत्मा क्षमा मागतांना स्वतःला नीतिमान ठरवू पाहतो. पण माफी मागणे हे माफी मागणे नाही, जर त्यात आपण स्वतःला नीतिमान ठरवत असू तर. जर आमच्या माफीमध्ये स्वतःच्या नीतिमत्तेचा गंध असेल तर खात्रीने आपण भग्न ह्रीदयी नाही. स्वतःला नीतिमान ठरवणे, येशूने म्हटले, हे परूश्यांचे चिन्ह आहे (लूक 16:15). जेव्हा आपल्याला कळते की आपण काहीतरी चुकीचे केले आहे, तेव्हा आपण ते ताबडतोब कबूल केले पाहिजे आणि ताबडतोब ती चुक सुधारली पाहिजे. भग्न ह्रिदयी माणसाला हे करण्यात काहीच अडचण येणार नाही. एक भग्न ह्रिदयी नसलेला मनुष्य मात्र या दोन्ही गोष्टी करण्यास विलंब करेल. आणि जेव्हा तो माफी मागेल तेव्हा तो दुसऱ्यालाही दोष देईल. जेव्हा आदामाने पाप केले तेव्हा त्याने कबूल केले की त्याने निषिद्ध फळ खाल्ले, परंतु स्वतःला नीतिमान ठरवण्यासाठी तो म्हणाला की देवाने जी स्त्री त्याला दिली होती तीनेच त्याला ते फळ खायला दिले. त्याद्वारे त्याने पत्नीला दोष दिला; आणि त्याला अशी पत्नी दिल्याबद्दल त्याने देवालाही दोष दिला! हा कोणतेही पाप किंवा चूक कबूल करण्याचा मार्ग नाही.


तथापि, स्तोत्र 51 मध्ये दाविदाने त्याच्या पापाची कबुली कशी दिली याकडे लक्ष द्या. आम्हाला तेथे स्वतःला नीतिमान ठरवण्याचे गंधही जाणवत नाही. ती खऱ्या अर्थाने तुटलेल्या माणसाची खूण आहे. मी शिफारस करतो की तुम्ही स्तोत्र 51 वर दीर्घकाळ मनन करा आणि तुटणे म्हणजे काय आणि तुम्ही तुमच्या पापांची कबुली कशी द्यावी हे प्रभूकडून समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुढे, स्वतःला न्याय देण्यासाठी, तुम्ही खोटे बोलू शकता. खोटे हे फक्त एक लहानसे असू शकते - अतिशयोक्ती किंवा काही घटना लपविण्याच्या स्वरूपात, स्वतःला चांगल्या प्रकाशात सादर करण्यासाठी असू शकते. एक खोटे बोलणे सोपे आहे, परंतु फक्त एकदाच खोटे बोलणे कठीण आहे - कारण एकदा आपण एक खोटे बोलले की पहिल्या खोट्याला समर्थन देण्यासाठी आपल्याला आणखी खोटे बोलावे लागतील. आपण खोट्याचा तिरस्कार केला पाहिजे आणि सत्यावर मनापासून प्रेम केले पाहिजे. अन्यथा आपण आपल्या जीवनावरील अभिषेक आणि देवाचा आनंद गमावू - आणि हे आपण कधीही भरून ना काढू शकणारे सर्वात मोठे नुकसान आहे.

जेव्हा देव आपल्यामध्ये गर्व पाहतो ज्याला उघडकीस आणणे आणि नष्ट करणे आवश्यक आहे, तेव्हा तो आपल्या जीवनात एखादी लहान घटना घडवून आणतो ज्यामुळे आपण अडखळतो आणि पडतो (यहेज्केल 3:20 पहा: "...जेव्हा मी त्याच्यापुढे अडथळा ठेवला...."). आणि जेव्हा आपण पडतो, तेव्हा प्रभू आपली परीक्षा घेतो की आपण (1) आपला गर्व कबूल करतो - ज्यामुळे आपण पडलो आहोत, (2) आपल्या पापाची कबुली करतो, (3) त्याच्यासमोर स्वतःला नम्र करतो आणि (4) माणसांबरोबर आपले नाते नीट करतो . जर आपण स्वतःचा न्याय केला आणि या गोष्टी केल्या तर आपला न्याय होणार नाही. परंतु जर आपण स्वतःला नीतिमान ठरवले तर आपण ना तुटलेले (भग्न ह्रीदयी ना झालेले) राहू आणि एके दिवशी जगाबरोबर आपलीही दंडाज्ञा होईल (2 करिंथ. 11:31,32).