WFTW Body: 

पत्रातील शेवटच्या अभिवचनांपैकी एक म्हणजे प्रभु “आपल्याला पतनापासून राखण्यास समर्थ आहे" (यहुदा 24). हे खरे आहे - परमेश्वर पतनापासून वाचवण्यास नक्कीच समर्थ आहे .परंतु जर आपण स्वतःला पूर्णपणे त्याला समर्पित केले नाही, तर तो आपल्याला पतनापासून/पडण्यापासून रोखू शकणार नाही - कारण तो कधीही कोणावरही त्याची इच्छा लादत नाहीं.

विश्वासणारे या नात्याने, ख्रिस्तासोबतच्या आपल्या नातेसंबंधाची तुलना वागदत्त कुमारिकेशी केली जाते, जी तिच्या लग्नाची वाट पाहत आहे (2 करींथ 11:2; प्रकटीकरण 19:7). पुढच्या वचनात (2 करींथ 11:3), पौल म्हणतो की जसे. सैतानाने कपट करून हव्वेला फसविले तसे सैतान आपल्याला ख्रिस्ताविशयीचे शुद्ध भक्ती ह्यापासून दूर नेईल अशी भीती त्याला वाटते. हव्वा सुखलोकात होती आणि सैतानाने तिला फसवले - आणि देवाने तिला सुखलोकातून बाहेर काढले. आज, आपण जे ख्रिस्ताशी वागदत्त आहोत ते सुखलोकाकडे जात आहोत. पण जर आपण सैतानाला आपली फसवणूक करू दिली तर आपण कधीही सुखलोकात प्रवेश करणार नाही.

जर वधू जगासोबत आणि पापाशी वेश्या सारखी वागणूक करत असेल तर तिचा वर तिच्याशी लग्न करण्यास नकार देईल. हे वेश्या मंडळी आहे ज्याला बाबेल म्हणून संबोधले जाते (प्रकटीकरण 17 मध्ये), ज्याला शेवटी परमेश्वराने नाकारले आहे.

जर तुम्ही प्रभूवर प्रेम करत असाल, तर तुम्ही स्वतःला त्याच्यासाठी शुद्ध ठेवाल, जरी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला इतर विश्वासणारे जगासोबत आणि पापाशी वेश्या सारखी वागणूक करतांना दिसतील. येशूने आपल्याला चेतावणी दिली की शेवटच्या दिवसांत, "पुष्कळांची प्रीती थंडावेल. (हे वाक्य स्पष्टपणे विश्वासणाऱ्यांना सूचित करते कारण तेच केवळ प्रभूवर प्रीती करतात) परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील त्याचे तारण होईल.” (मत्तय 24:11-13).

सैतान आपल्या सर्वांना फसवण्याचा प्रयत्न करतो. परंतु पवित्र शास्त्र आपल्याला चेतावणी देते की देव देखील आपली फसवणूक होण्याची अनुमती देईल "जेणेकरुन आपण असत्यावर विश्वास ठेवू” - जर आपण “आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरायची ती धरली नाही तर” (२ थेस्सल २:१०,११)

जर आपण देवाच्या वचनात लिहिलेले सत्य स्वीकारले आणि पवित्र आत्मा आपल्याला दाखवत असलेल्या आपल्या जीवनातील पापांविषयीच्या सत्याचा जर सामना केला आणि जर आपण त्या सर्व पापांपासून मुक्त होण्यास उत्सुक आहोत, तर आपण कधीही फसवले जाणार नाही.

परंतु जर आपण देवाच्या वचनात जे स्पष्टपणे लिहिले आहे ते स्वीकारले नाही, किंवा जर आपल्याला पापापासून मुक्त होण्याची इच्छा नसेल, तर देव आपली फसवणूक होऊ देईल आणि जे खोटे आहे त्यावर आपन विश्वास ठेवू – केवळ “सार्वकालिक सुरक्षा” ह्या बाबतितच नाही इतर बाबतीत देखील.

मग या संपूर्ण विषयाचा निष्कर्ष हा आहे:

आपण प्रभूवर प्रेम करतो, कारण त्याने प्रथम आपल्यावर प्रेम केले आणि त्याने आपल्या सर्व पापांची क्षमा केली. म्हणून, त्याच्या कृपेने, आपण आपली विवेकभाव नेहमी शुद्ध ठेवू आणि आपण त्याच्यावर प्रेम करू आणि शेवटपर्यंत त्याचे अनुसरण करू - आणि म्हणून आपण सर्वकाळ सुरक्षित आहोत.

येशूचा प्रत्येक शिष्य जो त्याचे अनुसरण करीत आहे तो सर्वकाळ सुरक्षित आहे.

परंतु आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. (१ करिंथ 10:12).

ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.