लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

यहोशवा १:१-२ म्हणते, "परमेश्वराचा सेवक मोशे ह्याच्या मृत्यूनंतर नूनाचा मुलगा यहोशवा ह्याला परमेश्वराने सांगितले की, “माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे; तर आता ऊठ; ही यार्देन ओलांडून जा.”" खुद्द देवानेच यहोशवाला मोशेनंतर उन्नत करून पुढारी म्हणून नेमले. देवाने स्वत: आपल्याला एखाद्या पदावर नेमले नसेल तर नेतृत्वाचा प्रभावीपणे वापर करता येत नाही. प्रभूने यहोशवाला सांगितले की जे जे ठिकाण तुझे पाऊल तुडवील ते ते ठिकाण तुला दिले जाईल (वचन ३) आणि तुझ्या आयुष्यात तुझ्यापुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही (वचन ५). रोम ६:१४ मध्ये आम्हांला दिलेल्या नव्या कराराच्या अभिवचनाचे हे प्रतीक आहे, "तुम्ही कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही." कनान देशावर पूर्वी अनेक महाकायांचे राज्य होते. पण त्या सर्वांचा पराभव होणार होता. एकही पाप (कितीही शक्तिशाली असले तरी) आपल्यावर मात करू शकणार नाही. ही आपल्यासाठी देवाची इच्छा आहे. पण यहोशवाला खरोखर त्या प्रांतावर पाय ठेवून त्यासाठी प्रभूच्या नावात दावा करावा लागला. तरच तो प्रदेश त्याचा होणार होता. आमच्याबरोबरही तसेच आहे. आपण विश्वासाने आपल्या वारशाचा दावा केला पाहिजे. जर आपण देवाने दिलेली अभिवचने जर आपली म्हणून धरली नाहीत तर ती आपल्या जीवनात कधीच पूर्ण होणार नाहीत.

पौलाने येशूच्या नावात शुभवर्तमानातील आपले हक्क मिळवले आणि परिणामी तो वैभवशाली जीवनात आला. तो २ करिंथ २:१४ मध्ये म्हणतो: " देवाची उपकारस्तुती असो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हास विजयात नेतो." "नेहमी विजयात" हे पौलाचे विजयगीत होते आणि ते आपलेही गीत असू शकते. पण बहुतेक ख्रिस्ती कधीही या विजयाच्या जीवनात प्रवेश करत नाहीत. ६,००,००० इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आले; पण त्यांपैकी फक्त दोन - यहोशवा आणि कालेब कनानमध्ये दाखल झाले. आजही ख्रिस्ती लोकांपैकी सुमारे याच प्रमाणात (६,००,००० पैकी २) ख्रिस्ती विजयाच्या जीवनात प्रवेश करतात. यहोशवा आणि कालेब यांनी वचनदत्त देशात प्रवेश केला कारण त्यांची मनोवृत्ती अशी होती: "देवाने आम्हांला देश ताब्यात घेण्यास सांगितले असेल तर आम्ही ते करू शकतो." (गणना १३:३०, १४:८). हाच विश्वास आहे. विश्वास केवळ देवाच्या अभिवचनाचा विचार करतो आणि आपल्यासमोर येणाऱ्या अडचणींचा कधीही नाही. इतर इस्राएली लोक म्हणाले, "हे अशक्य आहे. महाकाय इतके धिप्पाड आणि शक्तिशाली आहेत."(गणना ३:३१). आजही राग आणि डोळ्यांच्या वासनेवर मात करणे अशक्य आहे असे ख्रिस्ती लोकांना वाटते कारण या वासना इतक्या शक्तिशाली आहेत आणि त्यांनी इतके दिवस त्यांच्यावर राज्य केले आहे. असे विश्वासणारे आयुष्यभर पराभूत होत राहतात आणि (आध्यात्मिकरित्या म्हणता) अरण्यात नष्ट होतात.

प्रभूने यहोशवाला "मी तुझ्याबरोबर असेन" अशी खात्री दिली. (यहोशवा १:९) म्हणूनच कोणताही माणूस यहोशवासमोर टिकू शकणार नव्हता. काही धर्मसिद्धान्तावर विश्वास ठेवण्याने किंवा काही अनुभव असणे यामुळे आपण पापावर मात करू शकत नाही. नाही. केवळ आपल्यासोबत प्रभूच्या, त्याच्या आत्म्याच्या माध्यमातून असलेल्या सतत उपस्थितीमुळेच फक्त आपण त्यावर मात करू शकतो. आज देव ख्रिस्ती धर्मजगतातील अशा पुढाऱ्यांचा शोध घेत आहे ज्यांचे हृदय शुद्ध असल्याकारणाने त्यांना तो पाठिंबा देऊ शकतो आणि त्यांचे समर्थन करू शकतो. कारण प्रभूने यहोशवाला सांगितले: "बलवान हो, धैर्य धर, कारण जो देश त्यांच्या वैर्‍यांच्या आधिपत्या खाली बर्‍याच काळापासून होता तो तू त्यांना वतन म्हणून मिळवून देशील." (यहोशवा १:६). आपण कोणत्याही पापाला घाबरू नये. आपण बाहेर जाऊन देवाच्या लोकांना त्यांच्या शरीरातील पापांवर मात करण्यास सक्षम करायला हवे - ज्यावर वर्षानुवर्षे पापाने राज्य केले आहे. केवळ त्यांना विश्वासात आणणे आणि दोन बाप्तिस्मे घेणे पुरेसे नाही- दरवाज्यांवर रक्त लावणे, तांबडा समुद्र ओलांडणे आणि मेघाने आच्छादले जाणे पुरेसे नाही. ती फक्त सुरुवात आहे. हा फक्त बालवाडीचा धडा आहे. बालवाडीचा वर्ग उत्तीर्ण झाल्यावर आपण आपल्या मुलांचे शिक्षण थांबवतो का? नाही. पण आज ख्रिस्ती धर्मजगतात हेच घडत आहे.

मेघ स्तंभ - पवित्र आत्म्यातील बाप्तिस्मा - त्यांना वचनदत्त देशात नेण्यासाठी आला. त्यांनी दोन वर्षांत प्रवेश करायला हवा होता, पण त्यांनी ४० वर्षे प्रवेश केला नाही, कारण त्यांचे पुढारी अविश्वासणारे होते. "विश्वास वार्ता ऐकण्याने होतो." (रोम १०:१७). मंडळीच्या सभांमध्ये विश्वासणाऱ्या बांधवांना ही सत्ये शिकवली जात नसतील तर ते विश्वास कसा ठेवतील ? मग ते पापावर मात कशी करतील ?

प्रभूने यहोशवाला सांगितले: " तू खंबीर हो व हिम्मत धर, आणि नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ; ते सोडून उजवीडावीकडे वळू नकोस.(यहोशवा १:७). जर देवाचे वचन म्हणते, "पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही" (रोम ६:१४) तर त्यावर विश्वास ठेवा आणि ते कबूल करा. डावीकडे किंवा उजवीकडे वळू नका. याचा अर्थ: त्या वचनाची व्याप्ती कमी करू नका. फक्त काही पापांचा समावेश करून त्याची व्याप्ती कमी करू नका. त्याचबरोबर ते जे म्हणते त्यापेक्षा जास्त अर्थ लावू नका. या पृथ्वीवर आपण ख्रिस्ताइतकेच परिपूर्ण असू शकतो असे म्हणू नका. या पृथ्वीवर आपण पापरहित परिपूर्ण असे असू शकत नाही. ते वचन तसे काही म्हणत नाही. याचा अर्थ इतकाच आहे की आपल्याला जे माहीत आहे की ते पाप आहे (जाणीव असलेले पाप) त्यावर विजय मिळवणे. तो परत येईल तेव्हाच आपण ख्रिस्तासारखे होऊ शकतो. १ योहान ३:२ यावर अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे आपण शास्त्रवचनांच्या पलीकडे जाऊ नये आणि शास्त्रवचनांत दिलेल्या अभिवचनांवर कमी विश्वास ठेवू नये.