लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   पुरूष
WFTW Body: 

आपणहेनेहमीलक्षातठेवावे कीजर मंडळीआध्यात्मिकरित्या वाढतनसली तरदेवकधीहीमंडळीतीलविश्वासणार्यांच्यासांख्यीक वाढीने प्रभावीत होत नाही. पौलाने करिंथ येथील ख्रिस्ती लोकांना म्हटले की करिंथ येथील लोकांच्या दैहिक गोष्टींमुळे देव पौलाला खाली पाहावयासलावील(2करिंथ12:20,21). ख्रिस्तीलोकांच्यादैहिकपापांमुळेपौलालाखेद कावाटतअसावा?कारण पौलत्यांचाआध्यात्मिक पिताहोता.लेकरांच्याआध्यात्मिकअवस्थेविषयी देवत्यांच्या वडिलांनाजवाबदार ठरवितो.आपण आपल्याचलोकांमध्ये जेव्हादैहिक गोष्टी बघतो तेव्हा देव आपल्यालाच अपयशी असा पुढारी म्हणून गणतो. त्यावेळी आपल्या भाऊ बहिणींना दोष देण्यापेक्षा आपल्यालाच खाली पाहावे लागेल. जेव्हा आपण आपल्या मुलांमध्ये जगिकता बघतो, तेव्हा देव आपल्याला दाखवितो की पिता या नात्याने आपण अपयशी झालो आहोत. आपल्या लेकरांना दोष देण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःलाच नम्र करावे. जर आम्ही एखादे काम करीत आहोत तर आपण आपल्याच भावा बहिणींचे अपयश बघून त्यांना दोष लावू. परंतुजर आपण देवाचे लोक आहोत तर आपण देवासमोर नम्र होऊ व देवाला म्हणू, '्य्रभो, मी अपयशी झालो, मला क्षमा कर.'

पौलाला मोठे ओझे होते की परराष्ट्रीयांना त्याने ख्रिस्ताकडे आणावे, 'ट्टीं परराष्ट्रीयांसाठीं येशू ख्रिस्ताचा सेवक होऊन देवाच्या सुवार्तेचा याजक व्हावें; अशासाठीं कीं, परराष्ट्रीय हेंच अर्पण पवित्र आत्म्यानें शुद्ध होऊन मान्य व्हावें'' (रोम 15:16). जुन्या करारात, याजकाला लोकांनी आणलेल्या प्रत्येक अर्पणाचे परीक्षण करावे लागत असे की त्यात काही दोष तर नाही (अनुवाद 17:1). ती याजकाची जबाबदारी होती. थोडा तरी दोष असेल तर तो त्याचे अर्पण करीत नव्हता (देवाच्या दृष्टीत पाप किती गंभीर आहे हे समजण्याकरिता मलाखी 1 व 2 वाचा). आता नवीन करारात, ज्यांना मंडळीत देवाच्या सेवेचे पाचारण देवाने केले आहे त्यांचेही हेच कार्य आहे. ज्या लोकांना ते देवापुढे आणतात ते लोक देवाला ग्रहणयोग्य असले पाहिजे. ह्याच करिता पौलाने परिश्रम घेतले, '्य्रत्येक माणसाला ख्रिस्ताच्या ठायी पूर्ण असे उभे करावे'' (कलस्सै 1:28). ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर सर्वकाही उघडे होईल. आपण देवाचे महान कार्य करीत आहोत असा अनेक लोक आपल्याबद्दल समज करीत असले तरी आपला काय फायदा, कारण जेव्हा ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर असे दिसून येईल कीआपलेश्रमहे उथळव दैहिकहोते? सार्दीसयेथील वडीलजनमूर्खहोतेकारण तेमानवानेकेलेल्याआदरामुळेसमाधानीहोते.आपल्या लेकरांद्वारे आपले नाव मोठेव्हावे अशीआपली इच्छाआहे का?कदाचित तेचांगले असतील.त्याकरिता देवाचीस्तुती असो.परंतुइतरांना ते कळावे अशी आपली इच्छा आहे का? तर मग आपण त्याद्वारे आपलेच गौरव करू इच्छितो. आपली इच्छा आहे का की आपण किती उत्तम वडील आहोत हे लोकांना कळावे? आपण आपल्याच गौरवाकरिता आपल्या लेकरांनावाढवीत आहोत की त्यांच्याद्वारे देवाचे गौरव व्हावे अशारीतीने त्यांनावाढवीत आहोत?नक्कीच, आपल्या सर्वांना हेचवाटते की आपली लेकरेपूर्णमनाने ख्रिस्ती म्हणून मोठी व्हावीत. परंतुजेव्हा देव हे बघेल तेव्हा हे पुरेसे ठरेल का? आणि जर देवाने हे बघितले तर आपल्याला इतर लोकांच्या मताची काय गरज आहे? आपली लेकरे जगिक आहेतअसा जर इतर लोक विचार करीतअसतील तरीत्याची कापर्वाकरावी?शेवटी आपल्याला देवालाच उत्तर द्यायचे आहे. आपल्याविषयी आपले व आपल्या मंडळीचे चांगले मत असणे चांगले आहे.

आपल्या श्रमाची निपज इतरांनी बघावी ह्याची हाव आपल्या दैहिक शरीरात आहे. जर आपण आपल्यातील त्या हावेला मारत नाही तर सैतान आपल्यातील त्या गोष्टीचा गैरफायदा घेईल. वडील लोकांच्या मनातत्यांचे नावकमविण्याची थोडीजरी इच्छा सैतानाला आढळून आली तर तो त्या संधीचा फायदा घेईल आणि त्याला फसवेल; मग ती व्यक्ती शिष्यत्वाचे, पवित्रतेचे व ख्रिस्ताच्या शरीराचे शिक्षण देत असली तरी तो त्या व्यक्तीला फसवेल. असे वडीलजन केवळ बाबेलच्या मंडळीची आणखी शाखाच उभारतील!

जर आपण आपले नाव उंच करण्याची इच्छा बाळगत असू तर ख्रिस्ताच्या शरीराची बांधणी करणे अशक्य आहे. लोकांमध्ये नाव व प्रसिद्धीची जो व्यक्ती हाव धरीतनाही तोनवीन करारातील मंडळीची बांधणीकरू शकेल.अनेक वर्षांच्याकष्टानंतर जर तुमच्या मंडळीत तीनचसदस्य असतीलपरंतुतेपूर्णमनानेशिष्य असतीलतर तुम्हालात्याविषयी लाजवाटू देण्याचीगरज नाही.देव एकेदिवशी तुम्हाला म्हणेल, ''शाब्बास, भल्या व विश्वासू दासा.''

ज्यांच्याद्वारे देवाच्या नावाची निंदा होईल अशा तडजोड करणार्या 3000 लोकांपेक्षा गावात चांगली साक्ष असलेले तीनच शिष्य असले तर ते पुरे आहेत. परंतु जेव्हा आपण संख्येने कमी असतो तेव्हा आपण खालच्या पातळीला जाण्याकरिता आपली परीक्षा होऊ शकते जेणेकरून उत्तम आंकड्यांद्वारे इतरांनी प्रभावीत व्हावे. जर आपण हे हावेचे युद्ध लढत नाही तर आपलाही शेवट सार्दीस येथील वडीलजनांसारखा होईल.

याठिकाणी मीअशा पुढार्यांनाताकीद देऊइच्छितो जेयामध्ये खोटेसमाधान मिळवूपाहतात. शक्यआहे कीतुमची मंडळीसंख्येने वाढत नसेल कारण देव तसे होऊ देत नसेल.

देव मंडळीत लोकांची भर घालतो (प्रेषित 2:47). प्राचीन काळात, त्याने मंडळीत पुष्कळ लोकांची भर केली (प्रेषित 6:7).

पुढीलप्रकारे प्रार्थना करणे तुमच्याकरिता चांगले आहे, '्य्रभो, तडजोड करणार्या लोकांच्या संख्येद्वारे आमच्या मंडळीच्या संख्येत वाढ करावी असे आम्ही तुला म्हणत नाही. परंतु आम्ही गावातील अशा सर्व लोकांकरिता प्रार्थना करितो जे देवभिरू जीवन जगू इच्छितात. प्रभो, पुढील तीन गोष्टींपैकी एक गोष्ट कर : (1) त्यांना आमच्याकडे आण जेणेरून आम्ही त्यांची मदत करू शकू; किंवा (2) आम्हाला त्यांच्याकडे ने; किंवा (3) त्यांना आमच्याकडे तू का आणीत नाहीस हे तू आम्हाला दाखवून दे.''

नंतर कदाचित देव तुम्हाला हे दाखवून देईल की तुमच्या नियमकायद्यांमुळे, तुमच्या थंडपणामुळे व परूश्यांसारख्या तुमच्या वृत्तीमुळे तो मंडळीला अशा लोकांपर्यंत नेत नाही. तुमची मंडळी अशी का आहे हे देखील तो तुम्हाला सांगेल की तुम्ही स्वतः तशा वडीलजनांसारखे आहात. नंतर तुमच्याकडे एकच गोष्ट उरते आणि ती म्हणजे तुम्ही शोक करावा व पश्चात्ताप करावा.