WFTW Body: 

देवाचे पुष्कळ लोक आज बाबेलमध्ये आहेत— जसे की प्रकटीकरण १८:४ मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. देव त्यांना त्या वचनात म्हणतो, "माझ्या लोकांनो, तिच्यामधून निघा". ही समस्या त्यांचे पुढारी आणि धर्मोपदेशकांशी संबंधित आहे जे कळपाची दिशाभूल करतात. येशूच्या काळाप्रमाणे, आजही देवाचे पुष्कळ लोक "खरा मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे" आहेत (३६). येशूने दर वर्षी तीन वेळा यरूशलेम येथील मंदिरात आणि दर आठवडी नासरेथ येथील सभास्थानात जे काही पाहिले असेल, ज्यामुळे देवाचा अनादर झाला त्याचा विचार करा, जेव्हा तो वयाच्या १२ व्या वर्षापासून ३० व्या वर्षापर्यंत या ठिकाणी जात असे. पण त्या सगळ्याबद्दल तो काही बोलला नाही किंवा काहीही करत नसे, कारण अजून देवाने ठरवलेली वेळ आली नव्हती . परंतु ती वर्षे आणि ते अनुभव, त्याच्या नंतरच्या सेवाकार्यासाठी त्याने नासरेथ येथे घेतलेल्या शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग होता.

मत्तय १९:२७ (लिविंग बायबल) यातील पेत्राने येशूला म्हटलेल्या शब्दांवरून बाबेलच्या आत्म्याचे सार दिसून येते: "आम्हांला यातून काय मिळेल ?" जर आपण परमेश्वरासाठी अनेक गोष्टी सोडल्या असतील,आपणही असा विचार करू शकतो की, तर तो आपल्याला प्रतिफळ कसे देईल - येथे पृथ्वीवर आणि नंतर स्वर्गात. यावरून हे सिद्ध होईल की, पापभिरुपणाचा विचार आपण स्वत:साठी लाभाचे साधन म्हणून करीत आहोत आणि आपण आपल्या विचारसरणीत आत्मकेंद्री आहोत. काहीजण आपल्या प्रचाराद्वारे आणि प्रभूसाठी केलेल्या सेवेद्वारे पृथ्वीवर पैसा किंवा सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. इतर जण स्वर्गातील एखादे प्रतिफळ किंवा ख्रिस्ताच्या वधूमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. ते काहीही असो, जोपर्यंत आपण स्वतःसाठी काहीतरी शोधत आहोत तोपर्यंत आपल्यामध्ये बाबेलचा आत्मा आहे. ही बाबेलच्या आत्म्याची मलीनता आहे ज्यापासून आपण स्वत: ला शुद्ध केले पाहिजे.

पेत्राने प्रभूची सेवा केल्यामुळे आपल्याला काय मिळणार असे विचारले तेव्हा येशूने मत्तय २०:१-१६ मधील एका दाखल्याद्वारे उत्तर दिले. तेथे त्याने दोन प्रकारच्या कामकऱ्यांबद्दल सांगितले : (१) ज्यांनी बक्षिसासाठी (पगारासाठी) काम केले - एका चांदीच्या नाण्यासाठी (वचन २) आणि काहींनी "जी काही योग्य मजुरी असेल त्यासाठी " (वचन ४) - परंतु दोन्हीही वेतनासाठी; (२) मजुरीचे कोणतेही आश्वासन न देता कामावर गेलेले कामकरी (वचन ७). या प्रकारातील कामकऱ्यांना सर्वाधिक वेतन मिळाले - तासाला एक चांदीचे नाणे. बाकीच्या सर्वांना कमी मिळाले - पहिल्यांना दर तासाला फक्त ०.०८ चांदीची नाणी मिळत होती, कारण त्यांनी एका चांदीच्या नाण्यासाठी १२ तास काम केले. अशारितीने, येशूने तेथे सांगितल्याप्रमाणे, आता शेवटले असलेले पुष्कळ लोक सार्वकालिक काळात पहिले असतील- कारण परमेश्वर "प्रत्येक मनुष्याच्या सेवेची प्रत व हेतू पारखून घेईल" (१ करिंथ.३:१३ व ४:५) आणि त्यांच्या कार्याची संख्या नव्हे.

जे लोक यरुशलेममधील बाजारपेठेत स्वतःसाठी पैसे कमवत होते त्यांना येशूने कधीही हाकलून दिले नाही. नाही. कारण बाजारपेठ ही पैसे कमावण्याची योग्य जागा आहे. जॉन वेस्ली म्हणतात की, ख्रिस्ती लोकांनी कठोर परिश्रमांद्वारे शक्य ते सर्व कमावले पाहिजे. मी या गोष्टीशी सहमत आहे. येशूने केवळ त्यांनाच हाकलून लावले जे देवाच्या घरात स्वतःसाठी नफा मिळवण्याचा प्रयत्न करत होते. आजही; जे लोक मंडळीमध्ये स्वतःसाठी आदर, कीर्ती किंवा पैसा किंवा इतर कोणत्याही प्रकारचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांना येशू मंडळीमधून काढून टाकेल. मंडळी ही त्यागाचे ठिकाण असायला हवी. जखऱ्याच्या शेवटल्या वचनात असे म्हटले आहे की, परमेश्वर परत येईल तेव्हा "परमेश्वराच्या मंदिरात ओरबाडून घेणारे व्यापारी असणार नाहीत" (जखऱ्या १४:२१ - लिविंग बायबल ). आपण परमेश्वरासाठी करत असलेल्या आपल्या सेवेमध्ये आपण कधीही स्वतःसाठी काहीही मिळवण्याचा प्रयत्न करू नये.

नव्या करारात मत्तयापासून प्रकटीकरणापर्यंत प्रभूने अभिवचन दिल्याप्रमाणे, त्याची विश्वासूपणे सेवा करणाऱ्यांना प्रतिफळे मिळणार असली तरीसुद्धा आपण प्रतिफळासाठी सेवा करू नये. प्रभूने आपल्यासाठी कालवरीवर जे काही केले त्याबद्दल त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही सेवा करतो. जे प्रतिफळासाठी काम करतात त्यांना काही मिळणार नाही!