WFTW Body: 

1 करिंथ 11 मध्ये, जेव्हा आपण भाकरी तोडतो तेव्हा आपल्याला प्रभूच्या मृत्यूची आठवण ठेवण्यास सांगितले आहे. येशू आला आणि त्याने आपल्या जीवनाद्वारे आणि त्याच्या शिकवणीद्वारे आम्हाला दाखवले की "मृत्यू हे देवाच्या जीवनाचे प्रवेशद्वार आहे" (2 करिन्थ् .4:10 पहा). म्हणून ख्रिस्ताच्या मृत्यूच्या प्रत्येक पैलूवर मनन करणे आणि त्या मरणात सहभागी होणे (तुटलेली भाकरी खाणे) आणि ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळणे याचा अर्थ काय हे अधिक स्पष्टपणे समजून घेणे आपल्यासाठी चांगले आहे.

ख्रिस्ताच्या मृत्यूचा एक पैलू असा आहे की त्याने कधीही न केलेल्या गोष्टींसाठी त्याने वधस्तंभावर दोष स्वीकारला ("मी कधीही न केलेल्या गोष्टींसाठी मला शिक्षा झाली आहे आणि जे मी हरण केले नव्हते तेही मला द्यावे लागले " - स्तोत्रासहिंता .68:4 ) . हे आदामने जे केले त्याच्या अगदी उलट होते - त्याने, स्वतः केलेल्या चुकीचा दोष घेण्यास नकार दिला. त्याने आपल्या पत्नीला दोष दिला (उत्पत्ति 3:12). आदामची मुले आणि देवाची मुलें ही दोन पूर्णपणे भिन्न मार्गात चालतात.

आदामाची मुले स्वतःच्या चुकीचे समर्थन त्यांच्या वडिलांप्रमाणे देतात.येशूने परुश्यांना सांगितले "तुम्ही स्वतःला नीतिमान ठरविणारे आहात", (लूक .16:15). आदाम स्वतःची गरज किंवा स्वतःचे पाप पाहू शकत नव्हता. तो फक्त दुसऱ्याचे पाप पाहू शकत होता. जेव्हा कोणी इतरांना दोष देतो आणि स्वतःमध्ये काहीही चुकीचे पाहत नाही, तेव्हा तो खरोखर आरोप करणाऱ्या सैतानाच्या सहवासात असतो.

मरणासन्न चोरांचे तारण झाले, ते केवळ "प्रभू, माझे स्मरण कर." ह्या शब्दांनी नाही तर ते शब्द बोलण्याआधी त्याने स्वतःच्या पापांची जबाबदारी घेतली होती म्हणून तो वाचला.

इतरांचा न्याय करण्यासाठी देवाला आपल्या मदतीची गरज नाही. तो स्वतःहून हे सर्व करण्यास सक्षम आहे! आपण फक्त स्वतःचा न्याय करावा अशी त्याची इच्छा आहे. देव आपल्याला फक्त एकच गोष्ट करण्यासाठी बोलावतो: "स्वतःचे अधर्म मान्य करा" (यिर्मया. 3:13). असे विश्वासणारे जगातील सर्वात आनंदी लोक असतील.

परमेश्वराने यिर्मयाद्वारे यहूदा राष्ट्राला सांगितले की, इस्राएलच्या उत्तरेकडील राज्याच्या अपयशातून त्यांनी स्वतःसाठी कोणताही धडा शिकला नाही (यिर्मयाह 3:6-8). आणि मग तो म्हणाला की इस्राएल यहूदापेक्षा चांगला आहे. मृत संप्रदायातून बाहेर पडलेल्या अनेक ख्रिस्ती गटांनी देवाने त्या मृत संप्रदायांचे काय केले यापासून धडा घेतलेला नाही. म्हणून, ते त्या संप्रदायांपेक्षा अधिक परूशी वादी आणि मृत म्हणून झालेले आहेत.

येशूच्या सान्निध्यात राहा, त्याच्याकडे पाहत रहा. हे सतत तुम्हाला स्वत: चा न्याय करणाऱ्या जीवनाकडे नेईल. आणि हाच सर्व आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग आहे. हा संदेश असा नाही जो तुम्ही कोणत्याही चर्चमध्ये जाल तेथे तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यामुळे तुम्ही स्वतःला उपदेशक व्हावे. तुम्ही आत्मनिरीक्षण करू नका - कारण त्यामुळे तुम्ही स्वतः ला दोष देत राहाल व निराशेत जाल. परंतु येशूकडे पहा - आणि जसे तुम्ही त्याच्याकडे पहाल, तुम्हाला तुमचा स्वतःचा भ्रष्टपणा दिसेल, जसे यशया आणि इयोब आणि योहान (पॅटमॉसवरील) यांनी पाहिले. मग तुम्ही स्वतःचा न्याय करू शकता.

मी कधीच स्वतःचे आत्मपरीक्षण करत नाही. मी फक्त येशूकडे सतत पाहतो - त्याच्या परिपूर्ण शुद्धतेकडे (माणूस म्हणून, माझ्यासारखा मोहित होतो), त्याचे प्रेम आणि त्याची नम्रता. ती मला माझ्या गरजेची सतत जाणीव देत रहाते.