WFTW Body: 

जेव्हा आपण स्वत:च्या पूर्ण शेवटास येतो, तेव्हाच आपण परमेश्वराकडे येण्यास तयार होतो. येशूने लोकांना असे आमंत्रण दिले की, "अहो जे थकलेले व ओझ्याखाली दबलेले असे तुम्ही सर्व माझ्याकडे या" (मत्तय ११:२८). येशू त्याच्याकडे येण्याचे आमंत्रण सर्वांना देत नाही. येथे आपण पाहतो की तो केवळ अशा लोकांनाच आमंत्रित करतो जे अस्वस्थ आहेत आणि त्यांच्या पाप-पराभूत जीवनाला कंटाळले आहेत. उधळ्या मुलाने जेव्हा "सर्व खर्च करून टाकले " आणि "त्याला कोणी काही न दिल्यामुळे" त्यानंतरच तो आपल्या वडिलांकडे परत आला. तेव्हाच तो "शुद्धीवर आला" (लूक १५:१४-१८). आपण तेव्हाच आध्यात्मिकरित्या वाढू शकतो जेव्हा आपल्या जीवनाच्या अशा टप्प्यावर येऊ जिथे आपण लोकांकडून सन्मानाची पर्वा करत नाही, आणि लोकांबद्दल आणि परिस्थितीबद्दल तक्रार करत नाही - आणि आता केवळ आपल्या स्वत: च्या पराभूत जीवनामुळे अस्वस्थ आणि थकलेले आहोत. हा खरा पश्चात्ताप आहे.

अन्यथा आपण अकाली जन्मलेल्या बाळांसारखे होऊ, ज्यांना सतत इनक्यूबेटरच्या आत (सतत उबदार आणि इतरांद्वारे प्रोत्साहित केले जाण्यासाठी)ठेवणे आवश्यक आहे. आपण आपली सुरक्षेची हमी मंडळीमध्येही शोधू नये, तर फक्त प्रभूमध्येच शोधली पाहिजे. यहेज्केल ३६:२५-३० मध्ये, येशू आपल्याला नव्या करारान्वये विपुल जीवन देणार होता याविषयी भाकीत करण्यात आले आहे. ३१ व्या वचनात पुढे असे म्हटले आहे की, जेव्हा आपण त्या जीवनात येऊ तेव्हा "आपल्याला आपल्या पूर्वीच्या दिवसांतील दुष्कर्माबद्दल स्वत:चाच वीट वाटेल". देवाच्या माणसाची एक प्राथमिक खूण अशी आहे की, तो नेहमी स्वत:मध्ये आक्रोश करत असे म्हणतो, "किती मी कष्टी माणूस! सर्व पापांपासून माझी पूर्णपणे सुटका कशी होईल?" (रोम ७:२४ - भिन्न शब्दात अनुवाद). तो सतत सर्व अशुद्धतेपासून आणि अगदी देहातील पापाच्या गंधापासूनही मुक्त होण्याची इच्छा बाळगतो.

संकटांच्या दिवसात तुम्ही बलवान व्हावे अशी देवाची इच्छा आहे (नीति २४:१०). परंतु संकटांच्या त्या काळात बलवान व्हायचे असेल, तर या शांतीच्या काळात तुम्ही परमेश्वराविषयीचे आपले ज्ञान वाढवायला हवे.

देवाचे मार्ग आपल्या मार्गासारखे नसतात. त्याला तुम्हाला प्रथम मोडावे लागते - अनेक निराशेतून आणि अपयशातून - आणि म्हणून त्याने तुमच्यासाठी योजलेले ते आध्यात्मिक शिक्षण तुम्ही जिथे मिळवू शकाल तेथे तो तुम्हाला पाठवतो.

मोशेला इस्राएलचा सर्वात महान पुढारी होण्यास तयार करण्यासाठी त्याला मेंढरांची काळजी घेण्यास ४० वर्षे रानात पाठवावे आणि अपमानास्पदरित्या आपल्या सासऱ्याच्या हाताखाली काम करायाला लावावे असा विचार आपल्यापैकी कोणीही केला नसता. पण हा देवाचा मार्ग आहे. याकोबाला देवाचा अधिपती (इस्राएल) बनवण्याआधी देवाने त्याच्यासोबतही असेच काहीसे केले होते. देवासाठी सर्वात कठीण काम आहे ते म्हणजे मनुष्याला मोडणे. पण जेव्हा देव ते करण्यात यशस्वी होतो, तेव्हा अशा मनुष्याच्याद्वारे निघालेली शक्ती अणू फुटल्यानंतर मुक्त होणाऱ्या शक्तीपेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल!

पौलाने आपल्या अनुभवाविषयी म्हटले आहे, "आम्ही खाली पडतो, पण आम्ही उठतो आणि पुढे जात राहतो" (२ करिंथ ४:९ - लिविंग बायबल ). देव आपल्याला अधूनमधून खाली पडण्याची अनुमती देतो. पण आपण इतरांसारखे खाली राहत नाही. आपण उठतो आणि पुढे जात राहतो. आणि यामुळेच सैतान आणखीनच चिडतो. देव आपल्याला खाली पडण्याद्वारे पवित्रीकरणाचे शिक्षणही देतो, जेणेकरून ते आपल्या सर्वोत्तमासाठी काम करेल. त्यामुळे मी त्या दिवसापासून जिथे जाईन तिथे सतत येशूच्या विजयाची आणि सैतानाच्या पराभवाची घोषणा करत राहतो. हालेलुया !!