लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

आपल्या नवीन वर्षाची सुरूवात करताना आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक आणि शर्यत पूर्ण करणारा येशू यावर आपले डोळे ठेवून धैर्याने आपल्या पुढे धावण्याची शर्यत निश्चित करूया. (इब्री १२: १, २) आम्ही त्याच्याकडे पाहतो आणि धावतो. आम्ही स्थिर उभे राहत नाही. विश्वासाची शर्यत अशी एक गोष्ट आहे ज्यात आपण स्थिर उभे राहू शकत नाही. वेळ कमी आहे आणि म्हणून तुम्ही धावले पाहिजे. जर तुम्ही खाली पडलात तर, ऊठा आणि धावणे चालू ठेवा. असे बरेच धावपटू आहेत जे शर्यतीत खाली पडले, जे उठले, त्यांनी धावणे चालू ठेवले आणि तरीही ते पहिले आले. म्हणूनच तुम्ही परमेश्वराबरोबर चालत असता कधी पडलात तर निराश होऊ नका. तेथे पडून राहू नका. उठा, आपल्या पापाची कबुली द्या आणि धावत राहा.

आपला जन्म होण्यापूर्वीच देवाने आपल्या आयुष्याचा प्रत्येक दिवस आखून ठेवलेला आहे. स्तोत्र १३९:१६-१८ (लिविंग बायबल) असे लिहिले आहे: "प्रभु, मी जन्मास येण्यापूर्वी तू मला पाहिले आणि माझ्या श्वास घेण्यापूर्वी माझ्या जीवनाचा प्रत्येक दिवस ठरवला. प्रत्येक दिवस तुझ्या पुस्तकात लिहिलेला आहे. प्रभू तू माझ्याबद्दल सतत विचार करतो ही जाणीव किती मौल्यवान आहे. दिवसातून किती वेळा तुझे विचार माझ्याकडे वळतात हे देखील मी मोजू शकत नाही. आणि जेव्हा मी सकाळी उठतो, तेव्हा देखील तू माझा विचार करतोस.”

आपल्या जीवनातील प्रत्येक दिवसासाठी देवाने त्याच्या मनामध्ये योजना तयार केलेली आहे. आपल्‍याला समृद्ध आध्यात्मिक शिक्षण देण्यासाठी या नवीन वर्षात आपल्यासाठी आखलेल्या चाचण्या त्याने निश्चित केल्या आहेत. यावर्षी आपण करणार असलेल्या घोडचुका आमच्या चांगल्यासाठी काम कसे करतील हे देखील त्याने तेथे लिहून ठेवले आहे. या वर्षात आपण काय करावे हे देखील त्याने नियोजित केले आहे. ती योजना मनापासून शोधण्याचा प्रयत्न करा.

जेव्हा येशू पृथ्वीवर चालत होता, तेव्हा लोकांनी स्वर्गातील जीवन त्याच्यामध्ये पहिले. त्याची करुणा, इतरांबद्दलची त्याची आस्था, त्याची शुद्धता, त्याचे निःस्वार्थ प्रेम आणि त्याची नम्रता ही देवाच्या जीवनाची तंतोतंत अभिव्यक्ती होती. पवित्र आत्मा आता देवाचे हे जीवन आणि स्वर्गातील वातावरण आपल्या हृदयात आणण्यासाठी आला आहे. हे स्वर्गीय जीवन या जगाला प्रकट करण्यासाठी देवाने आम्हांला पृथ्वीवर ठेवले आहे. आपण येणाऱ्या वर्षात आपल्या घरात आणि आपल्या मंडळीमध्ये आनंद, शांती, प्रीती, शुद्धता आणि स्वर्गातील चांगुलपणाचा पूर्वानुभव घ्यावा अशी देवाची इच्छा आहे.

येशू या पृथ्वीवर एक स्वर्गीय जीवन जगला. जर तुम्ही तुमचे डोळे त्याच्याकडे लावले आणि त्याला अनुसरले तर या वर्षाचा पृथ्वीवरील प्रत्येक दिवस तुमच्यासाठी स्वर्गातील दिवसासारखा असेल. येशू या पृथ्वीवर चाललेला सर्वांत सुखी मनुष्य होता. त्याचे सुख त्याच्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यातच होते - आणि जीवनात सोप्या मार्गाचा अवलंब न करता. त्याला त्याच्या पित्याचे परिपूर्ण प्रेम माहित होते आणि म्हणूनच त्याने पित्याने जे काही पाठविले त्याला पूर्ण आनंदाने स्विकारले. हेच त्याच्या जीवनाचे रहस्य होते. विश्वास असणे म्हणजे देवावर विश्वास ठेवणे जो प्रीतीत परिपूर्ण आहे आणि ज्याच्या योजना सगळ्या आपल्या भल्यासाठी आहेत.

स्तोत्र १६: ८ म्हणते, "मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे; तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही". येशू अशाच प्रकारे जगला (प्रेषितांची कृत्ये २: २५). तो कधीही हादरला नाही कारण तो नेहमी त्याच्या पित्याच्या उपस्थितीत राहिला. आणि म्हणूनच, तो नेहमी आनंदाने भरलेला होता (स्तोत्र१६: ११). आपणही असेच जगावे अशी देवाची इच्छा आहे. येशूला पित्याला आवश्यक असलेल्या किमान गोष्टी शोधण्यात रस नव्हता, परंतु तो आपल्या पित्यासाठी जास्तीत जास्त काय करू शकतो यात होता.

आमची मनोवृत्ती देखील अशीच असावी: "येणाऱ्या वर्षात देव माझ्या एका ऐहिक जीवनातून जास्तीत जास्त काय मिळवू शकेल?" स्वतःची इच्छा नाकारण्याद्वारे आणि दररोज देवाच्या इच्छेचे सातत्याने पालन करण्याद्वारे खरी आध्यात्मिकता प्राप्त होते. पित्याच्या इच्छेनुसार सातत्याने दररोज आज्ञापालन केल्याने येशू त्याच्या पित्यासाठी अतिशय संतोष देणारा होऊ शकला. या नवीन वर्षाच्या प्रत्येक दिवशी हा मार्ग निवडल्यास आपणसुद्धा देवाला संतोष देणारे होऊ शकतो.

देव आपल्या डोक्यावर तेलाचा अशा प्रकारे अभिषेक करून आशीर्वाद देऊ इच्छितो की आपले पात्र इतर अनेकांसाठी आशीर्वादात ओसंडून वाहू शकेल. अलीशाच्या काळात, जेव्हा देवाने एका गरीब विधवेच्या भांड्यात तेल भरले तेव्हा तिने ते तिच्या शेजार्‍यांच्या भांड्यात ओतले (२ राजे ४: १-७). या वर्षी आपल्या मार्गावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण आशीर्वाद द्यावा यासाठी देवाच्या अभिषेकात गरजेपेक्षा अधिक आशीर्वाद आणि सामर्थ्य आहे. या विधवेप्रमाणे आपण यावर्षी आपल्या शेजाऱ्यांना आशीर्वाद देऊ शकता. म्हणून इतरांच्या जीवनात आशीर्वादांचा वर्षाव करीत रहा. जो इतरांना पाणी देतो त्याला देव स्वत: पाणी पाजेल (नीतिसूत्रे ११:२५).

जेव्हा प्रेषित योहान "आत्म्यात" होता तेव्हा त्याने प्रभूचा आवाज कर्ण्याप्रमाणे मोठा ऐकला (प्रगटीकरण १: १०) जर आपण येत्या वर्षाच्या प्रत्येक दिवशी आत्म्याने जगला तर आपणसुद्धा परमेश्वराचा आवाज दररोज स्पष्टपण ऐकू शकाल, जो आपल्याला मार्गदर्शन करेल आणि प्रोत्साहन देईल. प्रत्येक दिवशी पापाबद्दल संवेदनशील राहून आणि देवासमोर नम्रतेने चालून स्वतःला दररोज आत्म्यात राखा.

या नवीन वर्षात परमेश्वर तुम्हांला भरपूर आशीर्वाद देवो.