WFTW Body: 

मत्तय १४:१९ मध्ये आपण इतरांसाठी आशीर्वाद बनण्याच्या तीन पायऱ्या पाहतो:

(१) येशूने सर्व भाकरी व मासे घेतले;
(२) त्यांना आशीर्वादित केले; आणि
(३) त्याने त्या मोडल्या.

मग त्या समुदायाला भोजन दिले गेले. अशा प्रकारे प्रभू तुम्हालाही इतरांसाठी एक आशीर्वाद बनवू इच्छितो. तुम्हाला प्रथम तेथील लहान मुलाने केले तसे त्याला सर्वकाही द्यावे लागेल. मग तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला आशीर्वादित करील. मग तो तुम्हाला अनेक परीक्षा, निराशा, सफल न झालेल्या आशा, अपयश, आजारपण, विश्वासघात इत्यादीमधून मोडेल आणि तुम्हाला नम्र करेल आणि मनुष्यांच्या नजरेत तुम्हाला हीन करून टाकेल. मग, तो तुमच्याद्वारे इतरांना आशीर्वाद देईल. म्हणून तुमच्या त्याच्याद्वारे मोडण्याच्या अधीन व्हा. पवित्र शास्त्र म्हणते की येशूला प्रथम ठेचले गेले आणि नंतर पित्याचा मनोरथ त्याच्या हातून सफल झाला(पाहा यशया ५३:१०-१२).

येशूने आपल्या जीवनातील निरनिराळ्या परिस्थितींमध्ये आपली मानवी स्व-इच्छा मोडू दिली. केवळ अशाप्रकारेच तो आपल्या पित्याला, निष्कलंक असे स्वतःचे अर्पण करू शकला. याच हेतूने आत्म्याने त्याला सामर्थ्य दिले (इब्री ९:१४). फक्त जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याला तुमच्या स्वतःच्या इच्छेची ताकद तोडण्याची अनुमती देता, तेव्हाच तुम्ही आध्यात्मिक व्हाल. जेव्हा तुम्हाला देवाची जी इच्छा आहे ती करण्याऐवजी, तुमच्या स्वत:च्या मजबूत स्व-जीवनाला जे करायला आवडेल ते करण्याचा मोह होतो, त्या वेळी तुमची स्व-इच्छा मोडली पाहिजे.

ज्या ठिकाणी देवाची इच्छा तुमच्या स्व-इच्छेच्या आड येते, अशा ठिकाणी तुम्हांला तुमचा वधस्तंभ सापडेल. तिथे स्वत:च्या इच्छेला वधस्तंभावर चढवले पाहिजे. तेथे आत्मा तुम्हाला मरायला सांगेल. जर तुम्ही आत्म्याच्या वाणीचे सातत्याने पालन केले, तर तुम्ही सतत मोडलेले राहाल; आणि जे आत्म्यात सतत मोडलेले असतात त्यांना सतत संजीवन देण्याचे देवाने अभिवचन दिले आहे. प्रभू असे म्हणतो : “मी उच्च व पवित्रस्थानी वसतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठायीही मी वसतो; येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो." (यशया ५७:१५).

आपल्या स्वत: च्या गरजेच्या जाणीवेने - "आत्म्याने दीन" राहणे नेहेमी चांगले आहे. पण तुम्ही असाही विश्वास ठेवला पाहिजे, की जे लोक त्याचा झटून शोध घेतात त्या सर्वांना देव मोठ्या प्रमाणात प्रतिफळ देतो. आत्म्यात दीन असणे व्यर्थ ठरेल जर तुम्ही त्यासोबत असा विश्वास ठेवला नाही की देव तुम्हाला आशीर्वाद देईल आणि तुम्हाला त्याच्या सामर्थ्याने भरून टाकेल.

प्रत्येक मंडळीमध्ये गरीब आणि दुर्बल लोकांशी सहभागिता जोडण्यास पहा आणि त्यांना प्रोत्साहन द्या. लहान मुलांशी बोला आणि त्यांना प्रोत्साहन द्या, कारण बहुतेक लोक मुलांकडे दुर्लक्ष करतात. नेहमी कमी प्रतीच्या, दुर्लक्षित जागेचा आणि मंडळीमधील लक्षात न येणाऱ्या सेवाकार्यांचा शोध घ्या. कोणत्याही मंडळीमध्ये कधीही प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करू नका आणि आपली दाने किंवा आपल्या प्रतिभेने कोणत्याही प्रकारे कोणालाही प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नका. परंतु प्रत्येक सभेत साक्ष देण्यासाठी आणि मंडळीमध्ये शक्य त्या सर्व प्रकारे सेवा करण्यासाठी नेहमी धैर्यवान रहा - मग ते फरशी साफ करणे असो किंवा पियानो वाजवणे असो. कधीही कोणाशी, कोणत्याही सेवेसाठी स्पर्धा करू नका. तुम्ही विश्वासू असाल तर योग्य वेळी देव तुमच्यासाठी त्याने ठरवलेली सेवा खुली करील.