लेखक :   झॅक पुननं श्रेणी :   शिष्य
WFTW Body: 

प्रकटीकरण 13:4 मध्ये लिहिले आहे की ते अजगराची भक्ती करीत होते कारण अजगराने श्वापदाला आपला अधिकार दिला होता आणि त्यांनी पुढील वाक्य म्हणत श्वापदाची भक्ती केली ,''ह्या श्वापदासारखा कोण आहे? ह्याच्याबरोबर कोणाला लढतां येईल?'' (प्रकटीकरण 13:4).

आता संपूर्ण जग सैतानाची भक्ती करीत आहे. सुरुवातीपासून सैतानाची हीच अपेक्षा होती. यशया 14:14 मध्ये आपण वाचतो की देवासमान होण्याची लुसीफराची इच्छा होती. देवाने लुसीफराला आधीच अद्भूत दाने दिली होती - ज्ञान, सौंदर्य, पात्रता व अलौकीक दाने दिली होती. त्याला आणखी काय हवे होते? त्याची इच्छा होती की देवासमान त्याची सुद्धा भक्ती केली जावी आणि म्हणून तो दुष्ट सैतान झाला. जेव्हा तुम्हाला वाटते की लोकांनी तुमच्याकडे बघावे व तुमचे गौरव करावे तेव्हा लक्षात ठेवा की सैतानाप्रमाणेच तुम्ही अपेक्षा करीत आहात. लोकांकडून सन्मान मिळविण्याचा प्रयत्न दुष्टाई आहे, शवे टी आपण या ठिकाणी पाहतो की संपूर्ण जगाने सैतानाची भक्ती करावी ही सैतानाची इच्छा पूर्ण झाली. आज देखील लहान प्रमाणात असे घडत आहे. परंतु, पुढे हे मोठ्या प्रमाणात घडणार.

त्यांनी ख्रिस्त विरोधकाची देखील भक्ती केली. आज अनेक लोक ख्रिस्तविरोधकाची व प्रसिद्ध लोकांची भक्ती करीत आहेत. असे मोठ्या प्रमाणात घडत आहे. ''ह्याचा समान कोण?'' असे म्हणत त्यांनी ख्रिस्तविरोधकाची भक्ती केली. देवाची भक्ती करताना आपण म्हणतो, ''प्रभू तुझ्या समान कोण?'' अशाच प्रकारे त्यांनी सैतानाकरिता ह्या वाक्याचा प्रयोग केला. लाके ख्रिस्तविरोधकाला ''ख्रिस्तविरोधक'' म्हणणार नाहीतते त्याला आदरनीय नावाने हाक मारितील.

1 योहान 2:18 मध्ये लिहिले आहे, ''मुलांनो, ही शेवटली घटका आहे, आणि ख्रिस्तविरोधक येणार असे तुम्ही ऐकले त्याप्रमाणे आतांच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत; ह्यावरून आपल्याला दिसून येतें की, ही शेवटली घटका आहे, आपल्यांतूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते''. यातून आपल्याला कळते की पहिल्या शतकातील मंडळीमध्ये देखील ख्रिस्तविरोधकाचा आत्मा असलेले लोक उपस्थित होते. आज देखील असे लोक जगामध्ये आहेत. ख्रिस्तविरोधकाचा आत्मा असलेले लोक राजकारणात आहेत, उद्योजक आहेत व ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये देखील आहेत

ख्रिस्तविरोधकाचा आत्मा असलेल्यांची ओळख कशी पटणार? पुष्कळप्रकारे ही ओळख पटते. प्रमुख चिन्ह म्हणजे इतरांनी आपल्याला बघावे व आपल्याला उंच करावे अशी त्यांची तीव्र इच्छा असते. म्हणजेच त्यांना वाटते की लोकांनी त्यांची भक्ती करावी. जी मंडळी अशा वृत्तीच्या विरोधात उभी राहत नाही त्या मंडळीमध्ये देखील ख्रिस्तविरोधकाचा आत्मा राज्य करीत आहे असे म्हणावे

आपल्या देह स्वभावामध्ये आत्मसन्मानाची तीव्र इच्छा असते की लोकांनी आपल्याला उंचवावे. ही दुष्ट वृत्ती एका लहान बीप्रमाणे असते आणि शेवटी ती मोठी होत जाते आणि मग आपल्याला वाटते की आता लोकांनी आपली भक्ती करावी. हा आपल्या ठायी असलेला ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे. जेव्हा आपल्याला हे लहानसे सापाचे अंडे आपल्यामध्ये दिसते तेव्हाच आपण त्याला जिवे मारावे. अन्यथा त्या अंड्यातून पिल्लू निघेल आणि मोठा साप शक्तीशाली स्वरूपाने काम करू लागेल. हा आत्मा जर सर्वोच्च देवदूतामध्ये पनपला तर तो आपल्यासारख्या लहानामध्ये का पनपणार नाही? ज्याला कान आहे तो ऐको

आपल्याला सांगण्यात आले आहे की संपूर्ण जग ख्रिस्तविरोधकाच्या मागे जाईल. संपूर्ण जग ख्रिस्ताच्या मागे गेले नाही. लोक ओरडले, ''त्याला वधस्तंभावर खिळा''. परंतु आता लोक ख्रिस्तविरोधकाच्या मागे जातील कारण प्राचीन अशा खोट्या संदेष्ट्यांप्रमाणे तो मऊ शब्दामध्ये बोलेल

ख्रिस्तचा आत्मा आपल्या ठायी असल्यास लोक आपला विरोध करतील. जेव्हा विश्वासणारे प्रसिद्ध होऊ पाहतात तेव्हा ते धोका असलेल्या ठिकाणी उभे असतात. ते ख्रिस्तविरोधकासोबत उभे असतात. लोक येशू ख्रिस्ताला राज मुकूट घालू इच्छित होते तेव्हा त्याला फार आनंद झाला असे नाही. येशूला माहीत होते की लोकांचे मत केरकचर्याप्रमाणे असते. म्हणून तो म्हणाला, ''जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांचा आणि आपल्या जिवाचाहि द्वेष करणार नाहीं तर त्याला माझा शिष्य होतां येणार नाहीं'' (लूक 14:26-33). अनेकांसाठी हे शब्द जड होते व आहेत. आज खर्या मंडळीमध्ये येशूचा हा संदेश सांगितल्या जातो. अनेकांना हा संदेश फार जड वाटतो. ज्याप्रकारे खिस्ताच्या दिवसांमध्ये ख्रिस्ताचा विरोध झाला त्याचप्रकारे हे सत्य सांगणार्याचा देखील विरोध होतो. परंतु, आपण ख्रिस्तविरोधकाच्या आत्म्यापासून सुरक्षीत आहोत. जगिक ख्रिस्ती लोक खिस्ताचा हा संदेश सांगणार नाहीत. त्यांचा सन्मान होईल आणि ते ख्रिस्तविरोधकाच्या गौरवाचा मार्ग तयार करतील