WFTW Body: 

रोम ७:१४-२५ हा परिपूर्णतेकडे नेटाने वाटचाल करू इच्छिणाऱ्यांकरता एक महत्त्वाचा उतारा आहे. नवा जन्म झालेला ख्रिस्ती या नात्याने आपल्या अनुभवाविषयी पौल तेथे बोलत आहे, कारण एक परिवर्तन न झालेला मनुष्य असे म्हणत नाही की, "माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो;" (रोम ७:२२).

पौलाने रोमकरांस लिहिलेले पत्र एका अनुक्रमाने लिहिले आहे, ज्याची सुरुवात पहिल्या अध्यायात , "सुवार्ता ही तारणासाठी देवाचे सामर्थ्य आहे" (रोम १:१६). अध्याय ३, ४ आणि ५ मधील विश्वासाच्या आधारावर नीतिमान ठरण्याविषयी बोलल्यानंतर पौल रोम ६ मध्ये पापावर विजय मिळवण्याविषयी बोलतो. मग पौल अध्याय ७ मध्ये पुढच्या टप्प्यावर जातो. तो त्या क्षणी त्याच्या मागच्या परिवर्तन न झालेल्या आयुष्यात परत जात नाही. नाही. तो आपले सुवार्तेचे वर्णन पुढे चालू ठेवत आहे. आता तो परिपूर्णतेकडे वाटचाल करण्याची आवड असलेल्या व्यक्तीच्या आंतरिक जीवनात जो संघर्ष घडत असतो त्याबद्दल तो बोलतो. त्याने जाणीवपूर्वक यानंतर केवळ देवाची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला विजय मिळवायचा आहे आणि गरजेच्या वेळी त्याला मदत करण्यासाठी त्याला कृपा मिळाली आहे. तरीही त्याला दोन गोष्टी दिसतात: (१) एका बेसावध क्षणी तो अजूनही अशा एका क्षेत्रात पडतो जिथे त्याला आधीच प्रकाश प्राप्त झाला आहे(जाणीवपूर्वक केलेले पाप); आणि (२) की कधीकधी तो ख्रिस्ती दर्जापेक्षा कमी पडला आहे आणि तो पडल्यानंतरच त्याला त्याची जाणीव झाली आहे (एक नवीन क्षेत्र जेथे पडण्यापूर्वी तिथे त्याला प्रकाश प्राप्त झाला नव्हता - नकळत घडलेले पाप).

ज्याला समग्र परिपूर्णतेत रस नसतो, त्याला असा संघर्ष नसतो, कारण तो रोम ५ मध्ये थांबला आहे. जो पापावर संपूर्ण विजय मिळवू पाहतो आहे (रोम ६:१४), जो हा संघर्ष पाहतो आणि स्वत:शीच म्हणतो, "किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील?” (रोम ७:२४).

जे अशा संघर्षाची कबुली देत नाहीत, ते आपल्या आंतरिक जीवनाबद्दल अप्रामाणिक आहेत. यामुळेच, आपण दुर्बलतेच्या क्षणी पडलो असलो, जरी हे एक असे पाप आहे ज्याचा आपण पश्चात्ताप केला पाहिजे आणि त्याचा त्याग केला पाहिजे आणि ख्रिस्ताला त्याच्या रक्तात शुद्ध करण्यास सांगितले पाहिजे, तरीही आपल्याला विपुल आशा मिळते की आपण ते जाणीवपूर्वक निवडले असते असे काही नाही. त्यानंतरची आपल्याला लगेच वाटणारी त्याबद्दलची खंत हे अगदी स्पष्टपणे दर्शवते. कारण आपण अशा पापकर्मांचा तिरस्कार करत राहतो आणि त्यांच्यावर शोक व्यक्त करत राहतो, त्यामुळे एक ना एक दिवस आपण त्यांच्यावर विजयही मिळवू.

रोमकरांस पत्र ७ काळजीपूर्वक वाचा आणि देवाला विनंती करा की तुम्हांला त्याबद्दल प्रकाश प्राप्त व्हावा. रोम ७:१-१३ मध्ये नियमशास्त्र हा आपला मार्गदर्शक यापासून मुक्त होण्याविषयी सांगितले आहे. आता आपण ख्रिस्ताशी लग्न केले आहे, जेणेकरून आपण नियमशास्त्रापेक्षा उच्च दर्जाचे जीवन जगू, पण देवाच्या आज्ञांविषयी कायदेशीर मनोवृत्तीने नव्हे. आपण "जुन्या शास्त्रलेखास धरून नव्हे तर आत्म्याच्या नावीन्याने आपण सेवा करतो" (रोम ७:६).

जे लोक आपल्या संघर्षाबद्दल अप्रामाणिक आहेत त्यांच्यासाठी विजय नाही. मुख्यतः रोम ७ बरोबर समजून घेण्याचा हा प्रश्न नाही, तर एखाद्याच्या संघर्षांबद्दल पूर्णपणे प्रामाणिक असण्याचा हा प्रश्न आहे. मी तुम्हाला विनंती करतो की, जे लोक आपल्या आंतरिक संघर्षांबद्दल प्रामाणिक नाहीत अशा सर्वांना टाळावे - कारण ते ढोंगी आहेत. तुम्ही समजूतदार असले पाहिजे. सापांसारखे धूर्त व्हा आणि कबुतरांसारखे साळसूद व्हा (मत्तय १०:१६). लक्षात असू द्या की देव तुमच्याकडून ज्याची सर्वात महत्त्वाची अपेक्षा करतो ती म्हणजे प्रामाणिकपणा. ती शुद्धतेची पहिली पायरी आहे.