लेखक :   झॅक पुननं
WFTW Body: 

इफिसकरांस पत्र हे कदाचित पौलाने लिहिलेले सर्वांत आध्यात्मिक पत्र आहे आणि त्यावरून असे सूचित होते की त्या काळात इफिसमधील मंडळी ही अत्यंत चांगल्या आध्यात्मिक स्थितीत होती. ती खूप चांगली मंडळी होती. पौलाने सुधारणूक करावे असे तिथे काहीही नव्हते. इफिसकरांस पत्र हे पृथ्वीवर स्वर्गीय जीवन जगण्याबद्दल सांगते. एक मंडळी आणि एक ख्रिस्ती जर स्वर्गीय विचारांचे असतील तरच पृथ्वीवर त्यांचे कार्य पूर्ण करू शकतात. आपण जितके स्वर्गीय - विचारांचे असू, तितकेच आपण पृथ्वीवरील आपल्यासाठी देवाचे उद्दिष्ट पूर्ण करू शकू. आपण जितके ऐहिक - विचारांचे असू, तितकेच आपण पृथ्वीवर देवाचे उद्देश पूर्ण करण्यास अधिक निरुपयोगी आहोत, जरी तुम्ही म्हणत असाल की आपण मरणानंतर स्वर्गात जाल. आपले घर केवळ स्वर्गीय विचारांचे घर असेल तरच ते देवासाठी आपले कार्य पूर्ण करू शकते. आपल्यासाठी परमेश्वराची इच्छा आहे की “आपले पृथ्वीवरील दिवस स्वर्गातील दिवसांसारखे असावेत ”(अनुवाद ११:२१). जुन्या कराराच्या काळात हे शक्य नव्हते. परंतु नव्या करारामुळे आपण असे जगू शकतो हे इफिसकरांस पत्र सांगते.

इफिसकरांस पत्र १:३ म्हणते, "आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे". येथे लक्षात घ्या की हे सर्व आशीर्वाद आध्यात्मिक आहेत, भौतिक नाहीत. जुन्या कराराच्या अंतर्गत इस्राएली लोकांना वचन दिले होते ते पृथ्वीवरील भौतिक आशीर्वाद होते. हे आपण अनुवाद २८ मध्ये वाचू शकतो. हेच ख्रिस्ताच्या कृपेला मोशेच्या नियमशास्त्रा पासून वेगळे करते. जुन्या करारा मध्ये असे एखादे वचन असते तर ते असे वाचले गेले असते: “धन्य असो सर्वशक्तिमान देव (आपला पिता नव्हे) ज्याने आम्हाला मोशेद्वारे पृथ्वीवरील प्रत्येक भौतिक आशीर्वाद देऊन आशीर्वाद दिला आहे.” तर जे विश्वासणारे मुख्यतः शारीरिक आरोग्य आणि भौतिक आशीर्वाद शोधत आहेत ते खरोखर जुन्या कराराकडे परत जात आहेत. असे “विश्वासणारे” खरोखर ख्रिस्ती नव्हे तर इस्त्रायली आहेत. ते ख्रिस्ताचे नव्हे तर मोशेचे अनुयायी आहेत.

याचा असा अर्थ आहे का आज देव विश्वासू लोकांना भौतिक आशीर्वाद देत नाही? तो देतो - परंतु वेगळ्या मार्गाने. जेव्हा ते प्रथम त्याचे राज्य आणि त्याच्या नीतिमत्वाचा शोध घेतात तेव्हा त्यांच्या सर्व ऐहिक गरजा त्यांच्यासाठी पुरविल्या जातात. जुन्या कराराच्या काळात लोक फक्त या ऐहिक गोष्टींचा शोध घेत असत आणि त्यांना बरेच काही मिळाले - बरीच मुले, बरीच संपत्ती, भरपूर पैसा, शत्रूंवर विजय, पृथ्वीवर मान आणि उच्च पद इत्यादी. पण नव्या कराराअंतर्गत आपण आध्यात्मिक आशीर्वाद शोधत असतो - आध्यात्मिक मुले, आध्यात्मिक संपत्ती, आध्यात्मिक सन्मान, आध्यात्मिक विजय (पलिष्टी किंवा मानव यांच्यावर नव्हे तर सैतान आणि देहावर). आपल्या पृथ्वीवरील गरजा, जसे की आरोग्य आणि पैसे आपल्याला देवाच्या इच्छेनुसार चालण्यासाठी पुरवल्या जातात. देव आपल्याला आपला नाश होणार नाही इतकेच पैसे पुरवेल. जुन्या कराराच्या काळात, देवाने काही लोकांना अब्जाधीश केले असेल. परंतु तो आज आपल्यासाठी तसे करत नाही, कारण कदाचित त्या आपल्याला वरील गोष्टी शोधण्यापासून रोखतील - आणि आमचा नाश करतील.

इफिसकरांस पत्र १:३ मधील “आध्यात्मिक आशीर्वाद” या शब्दाचे भाषांतर “पवित्र आत्म्याचे आशीर्वाद” असे केले जाऊ शकते. ख्रिस्तामध्ये पवित्र आत्म्याचा प्रत्येक आशीर्वाद देवाने आपल्याला आधीच दिला आहे. आम्हाला फक्त येशूच्या नावे त्यावर हक्क गाजवायचा आहे. रस्त्यावर भीक मागत बसलेल्या एका भिकारी मुलीची कल्पना करा. एक श्रीमंत राजपुत्र येतो आणि तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतो आणि कोट्यावधी रुपये एका बँक खात्यात ठेवतो - ज्या खात्यातून तिला पाहिजे त्या वेळी मुक्तपणे पैसे काढता येतात. ती किती भाग्यवान मुलगी आहे! एके काळी तिच्याकडे काही नाणी असलेल्या डब्याशिवाय काही नव्हते. पण आता ती उत्कृष्ट कपड्यांसह रुबाबदार शैलीत जीवन जगते. ती बँकेतून कितीही रक्कम काढू शकते, कारण तिच्याकडे राजकुमाराने सही केलेली अनेक कोरे धनादेश आहेत. आध्यात्मिकरित्या विचार केला असता हे आमचे चित्र आहे. आम्ही आता स्वर्गीय बँकेत जाऊन पवित्र आत्म्याच्या प्रत्येक आशीर्वादाचा दावा करू शकतो कारण ते आता सर्व ख्रिस्ताच्या नावात आपले आहेत. जर आपण त्याच्याबरोबर या विवाहबंधनात कायम राहिलो तर स्वर्गातील सर्व काही ख्रिस्तामध्ये आपले आहे, जर आपण असे म्हणू शकतो, “प्रभू, मी तुझी वधू म्हणून पृथ्वीवर राहताना माझे सर्व दिवस मला तुझ्याशी सत्यतेने राहायचे आहे .” मग पवित्र आत्म्याचा प्रत्येक आशीर्वाद आमचा आहे. आपण त्यापैकी एखाद्यास पात्र आहोत हे आम्हाला देवाला पटवून देण्याची गरज नाही - कारण त्यातील कोणत्याही गोष्टीस आपण पात्र नाही. आपण विचार करू शकता का की ती भिकारी मुलगी तिला मिळालेल्या सर्व संपत्तीस पात्र आहे अशी कल्पना करते? अजिबात नाही. आपण जे काही प्राप्त करतो ते देवाची दया आणि कृपेमुळे. आपण स्वर्गातील सर्व गोष्टी घेऊ शकतो कारण त्या सर्व ख्रिस्तामध्ये आम्हाला स्वेच्छेने दिल्या आहेत. आम्ही उपवास किंवा प्रार्थना करून त्या गोष्टी कमवू शकत नाही. पुष्कळांना पवित्र आत्म्याचे आशीर्वाद प्राप्त होत नाहीत कारण ते त्यांना या मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करतात! आम्ही त्यांना तसे प्राप्त करू शकत नाही. आपण हे सर्व ख्रिस्ताच्या गुणवत्तेद्वारे स्वीकारले पाहिजे.